आता राज्यस्तरावर व विभाग स्तरावर देखील होणार जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धा!

 जिल्हा परिषदांच्या क्रीडा स्पर्धा विभागीय व राज्यस्तरावर सुरु करणे या मागणीच्या अनुषंगाने तपासणी व अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी क्रीडा समिती गठित करणेबाबत  महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभाग दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.


प्रस्तावना -

ग्रामविकास, विभागाच्या विविध विषयांबाबत मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज), यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४.०२.२०२५ रोजी आयोजित बैठकीत जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा विभागीय व राज्यस्तरावर सुरु करण्यासाठी अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठी वाचा येथील इतिवृत्तान्वये दिलेल्या निर्देशास अनुसरून, या मागणीच्या अनुषंगाने तपासणी व अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी क्रीडा समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

उपरोक्त प्रस्तावनेस अनुसरुन जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा विभागीय व राज्यस्तरावर सुरु करण्यासाठी तपासणी व अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठी खालील प्रमाणे क्रीडा समिती गठीत करण्यात येत आहे.

तपशील

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा,

पद अध्यक्ष

श्री. सुहास पाटील, उप संचालक, शिव छत्रपती क्रीडा पीठ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य.

सदस्य

उप सचिव, जि.प. आस्थापना (आस्था-७), ग्राम विकास विभाग

सदस्य

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद, सातारा

सदस्य सचिव

सदर समितीच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार विभागीय/जिल्हास्तरावरील क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी यांना बैठकीस आमंत्रित करता येईल.

२. क्रीडा समितीची कार्यकक्षा सदर समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे आहे.-

१. जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा विभागीय व राज्यस्तरावर सुरु करण्यासाठी आवश्यकता व त्याची कारणमीमांसा स्पष्ट करणे.

२. समितीने धोरण ठरवितांना शासनाच्या इतर विभागांतर्गत चालणाऱ्या (उदा. महसुल विभाग व गृह विभाग) यांच्या क्रीडा स्पर्धाविषयी माहिती घेवून स्पर्धा कशा असाव्यात, त्याची रुपरेषा ठरवावी.

३. विभागीय व राज्यस्तरावर कोणत्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा असाव्यात याबाबत रुपरेषा ठरविणे.

४. क्रीडा स्पर्धाकरीता आवश्यक निधीची उपलब्धतता कशाप्रकारे करता येईल याबाबत सविस्तर अहवाल देणे.

५. समितीने उपरोक्त कार्यकक्षेच्या अनुषंगाने तपासणी व अभ्यास करून तीन महिन्यांच्या मुदतीमध्ये शासनास अहवाल सादर करावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०४१११४४४१५८६२० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(सीमा जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.