निपुण महाराष्ट्र उन्हाळी शिबिर - स्वयंसेवक नोंदणी लिंक, शिबिरा बाबत माहिती.

उन्हाळी शिबिर कार्यक्रम

स्वयंसेवकांचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) या लिंक मध्ये करावी.👇🏻

https://app.prathaminsights.in/

 नोंदणी करतांना काही अडचण आल्यास 8830756049 / 96739 16044यावर संपर्क साधावा.


निपून महाराष्ट्र अभियान कृत्ती कार्यक्रम मे व जुन महिन्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वयंसेवकांमार्फत उन्हाळी शिबिर राबविणेबाबत  विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिनांक 25 मार्च 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


राज्यातील २ री ते ५ वी च्या वर्गार्तील शालेय विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता वृध्दीगत करण्याकरीता निपून महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषगांने शालेय वेळेमध्ये कृत्ती कार्यक्रम सर्व शाळेमध्ये सुरु आहे. या उपक्रम अंतर्गत शालेय वेळे व्यतिरीक्त वेळ वापरणे आणि सुटटीच्या कालावधीचा सदुउपयोग करता येइल. त्याकरीता विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी गाव व शाळा पातळीवर उन्हाळी शिबिर अयोजीत करण्याचा मानस आहे. अशा अल्पकालीन शैक्षणिक शिबीराद्वारे विद्यार्थ्यांमधील संभाव्य शैक्षणिक तफावत भरुन काढण्यास मदत होईल. आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सातत्य राखले जावू शकेल. या शिबीरामुळे विद्यार्थ्यांची पायाभुत, शैक्षणिक, कौशल्य, अधिक सक्षम होवून पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक तयारी होवू शकेल. या उपक्रमाअंतर्गत इयता २ री ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, अंकज्ञान व गणितीयक्रीया सोडविता यावी या साठी प्रयन्त करण्यात येईल. दररोज किमान आपल्या वेळेनुसार लिडरमाता किंवा सदस्यमाता मार्फत शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केल्यास हे उद्दिष्ठ सहज साध्य करता येईल.

सदर शिबिर स्थानिक युवक युवतीच्या निवड माता पालक लिडर माता यांच्या सक्रीय सहभागाद्वारे राबविण्यात येणार असून भाषा व गणित या विषयावर आवश्यक किमान, ज्ञान, कौशल्य व आवड असणे अपेक्षित आहे. प्रत्येक गावातुन किमान २ ते ३ लिडरमाता किवा सदस्यमाता यांना आवश्यक प्रशिक्षण साहित्य हे प्रथम संस्थेद्वारे दिल्या जाईल. व सातत्यपूर्वक मार्गदर्शन प्रदान करण्यात येईल. या अभियानाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी ग्रामपंचायत, शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी आणि स्थानिक संस्था यांची सक्रीय सहभागीता ठरवू शकते. या माध्यमातून पुढे समुदायाच्या शैक्षणिक भागीदारीचा आर्दश घालवून देण्यासोबतच मुलांच्या शैक्षणिक प्रगती प्रभावी सुनिश्चित करता येईल.

या उपक्रमात जिल्हा परीषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या विभागाने (शिक्षक, आरोग्य, महिला व बालविकास आणि उमेद) इतर शैक्षणिक संघटना व महाविद्यालयाने सक्रीय सहभाग घेवून गाव पातळीवर लिडरमाता व सदस्य माता यांचे जाळे तयार  करावे. यासाठी सर्व मुख्याध्यापक यांनी आपल्या गावातील २ ते ३ लिडरमाता किंवा सदस्यमाता (स्वयंमसेवक) यांची निवड करुन केंद्र प्रमुख यांच्या कडे माहिती दयावी. केंद्र प्रमुख गांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळेमधून हे लिडरमाता किया सदस्यमाता (स्वयंमसेवक) दिनांक १५ एप्रिल २०२५ या महिन्या तयार होतील, यासाठी शिक्षकाच्या मदतीने प्रर्यन्त करावे. गटशिक्षणाधिकारी यांनी उन्हाळी शिबीराकरीता सर्व केंद्र प्रमुख यांची दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी सभा घेवून आपल्या तालुक्याचे उन्हाळी शिबीराचे नियोजन करावे.

सदर लिडरमाता किंवा सदस्यमाता यांची माहिती संकलन देण्यात आलेल्या लिंक वर करावे. तयार केलेले लिडरमाता किंवा सदस्यमाता सदर शिबीराच्या अनुषगांने ऑनलॉईन किया प्रत्यक्ष स्वरुपात उध्दबोधन करणे आणि अंमलबजावणी साठी सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, व प्रथम संस्थेच्या प्रतिनिधीचे सहकार्य घ्यावे,

उन्हाळी शिबिराच्या नियोजन संदर्भातील तपशिल खालील प्रमाणे

उन्हाळी शिबिराचे नियोजन खालीलप्रमाणे असेल

1. शिबिर कधी होणार?

कालावधी: 6 आठवडे.

आठवडा- 1: मोबिलायजेशन, बॉर्म-अप कृती आणि मूल्यांकन.

आठवडा 2-5: निर्देशात्मक अध्ययन कृती.

महाबा आठवडाः उत्सव.

. प्रारंभ : मोबिलायझेशन मार्च-एप्रिलमध्ये सुरू होईल; एप्रिल ते में 2025 च्या मध्यात अभियानाला सुरुवात होईल. 1 यामध्ये विविध सहभागी घटकांचा समावेश असलेल्या संघटनेच्या माध्यमातून व्यापक लिडरमाता किया सदस्यमाता महभाग सुनिश्चित केला जाईल तसेच शिबिर वेळेत प्रारंभ होण्याची व्यवस्था करण्यात येईल. यामुळे अध्ययन-

अध्यापन कृतींसाठी अधिक वेळ उपलब्ध होईल. N


2. लक्ष केंद्रित करणारी क्षेत्रे कोणती असतील?

प्राथमिकः खेळ, गप्पागोष्टी आणि प्रकल्पांद्वारे मूलभूत वाचन आणि आकलन, माध्यमिकः मजबूत विलेपणात्मक आणि गणितीय कौशल्यांचा विकास.


३. डेटा कसा गोळा केला जाईल?

साधनः तालुका समन्वयक, भागीदार समन्वयकासाठी व्यापक वन-स्टॉप डेटा सिस्टम वेब जिंक, लिडरमाता किंवा सदस्यमाता इतर कसा फायदा होईल?

शिक्षणाच्या संधी

डिजिटल तयारी कौशल्ये (उदा., गुगल सूट टूल्स).

'एज्युकेशन फॉर एज्युकेशन' (ईएफई) या अभ्यासक्रमांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रवेश व प्रमाणपत्र कोर्स

उपलब्ध करून दिला जाईल.

मोशन मीडियाला गुंतवून ठेवणे ('रील्म' विकसित करणे इ.)

लिडरमाता किंवा सदस्यमाता, इतर यांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही


(राजेश मनवर 

शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालय

अमरावती विभाग अमरावती


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.