शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उन्हाळी सुट्टीतील कामकाजाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उन्हाळी सुट्टीत खालील कामकाजासाठी शालेय कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
१. ११ वी ऑनलाईन कामकाज.
२. आधार / अपार आयडी कामकाज.
३. स्कूल मॅपिंग कामकाज.
४. संचमान्यता दुरुस्ती व इतर अनुषंगिक महत्वाचे कामकाज.
वरील सर्व कामकाज करणेसाठी उन्हाळी सुट्टीत शाळेतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित राहून कामकाज करणेबाबत आपल्या विभागातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांना तात्काळ आदेशित करावे.
(डॉ. श्रीराम पानझोडे)
प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments