ड्रेसकोडसाठी शासन निधी देणार? आता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात! शिक्षण मंत्री दादा भुसे..
राज्यात शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी असे सूतोवाच केले आहे. ड्रेसकोडसाठी शासन निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे दादा भुसे म्हणाले. आता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत.
महाराष्ट्रातील शिक्षकही आता गणेवशात दिसणार आहेत. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. ड्रेसकोडसाठी खारीटा वाटा म्हणून शासननिधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं सुतोवाच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितल आहे.
मालेगावच्या अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी दादा भुसे बोलत होते. आता शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत ओएनजीसी व अवंत फाऊंडेशनच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले यावेळी मंत्री भुसे बोलत होते. शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे, पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलींसारखे उपक्रम राबवावेत, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी आवाहन केले.
भंडारा जिल्ह्याच्या दिघोरी/मोठी येथे जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिका प्रमाणे शिक्षकांची नियुक्ती केली आहे. यात तीन शिक्षक कार्यरत आहेत. परंतु येथे पगार बिल मात्र पाच शिक्षकांचे काढण्यात येत असल्याची तक्रार पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना तक्रारदार करण्यात आली आहे.
शासनामार्फत नियमित शिक्षक भरती न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे/विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त केले जातात. परंतु भंडारा जिल्ह्यातील दिघोरी/मोठी येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे घड्याळी तासिका नियुक्ती तीन शिक्षकांची मात्र पगार बिल पाच शिक्षकांचे अशी तक्रार पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना तक्रार देण्यात आली. त्या तक्रारीच्या अनुसगाने गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देट चौकशी केली आहे. त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत.
हायस्कूलच्या शिक्षकांचा पगार माध्यमिक मधून काढत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या संदर्भात मुख्याध्यापक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती दिली नाही. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाला तसा अहवाल पाठवून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी यांनी सांगीतले आहेत. तर हे संपूर्ण आरोप खोटं असल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे. त्यामुळे भंडारा जिल्हयात शिक्षण विभागात आलबेल असल्याचे दिसून येत आहे. याच शाळेत असे प्रकार नाहीत तर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये असे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Educational Updates
1
https://chat.whatsapp.com/GqI0WLNXXbLG6o18HNDI0S
2
https://chat.whatsapp.com/C7vvbJckb550361VzVTVxg
3
https://chat.whatsapp.com/EmR4trLaXRa0h4EZye5q7w
4
https://chat.whatsapp.com/HqkehpM3EZkJqOhUwlG2i4
5
https://chat.whatsapp.com/DN80S2LWNL4Kq6KTnB8FaG
6
https://chat.whatsapp.com/EdqFV9qJcx4ENMyZCqyRke
7
https://chat.whatsapp.com/C2y1BeQYgorE28fgrAcBoN
8
https://chat.whatsapp.com/G3f2AHCID952u7jL6zQw1r
9
https://chat.whatsapp.com/FaAWJLSmSPDKakiZ0ugzx9
0 Comments