शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांनी दिनांक 28 मार्च 2025 रोजी उन्हाळयामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करणेबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.
उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन जिल्हा स्तरावरुन उष्णतेचा लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधीत प्रशसकीय विभाग, महानगरपालिका / नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्र ३ च्या पत्रासोबत असलेल्या मार्गदर्शक सूचनामधील अ.क्र. ४ नुसार निर्देश दिलेले आहेत.
राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेली आहेत. तसेच काही जिल्हयांनी सकाळ सत्रात शाळा भरविणेबाचत आदेश निर्गमित केले आहेत. तथापि या सर्व जिल्हयांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक / शाळेची वेळ यामध्ये एकवाक्यता असणे आवश्यक आहे.
सदर बाब विचारात घेता, राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी ०७.०० ते ११.१५ व माध्यमिक शाळांसाठी ०७.०० ते ११.४५ अशी करण्यात यावी. (सोबत वेळापत्रक जोडले आहे.) स्थानिक परिस्थितीनुसार
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल. संदर्भ क्र ३ मधौल उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यालाठी खाली नमूद सूचना विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्यास्तरावरुन सर्व शाळांना कळविण्यात यावे.
१. उन्हाळयात विद्यार्थ्यांनी मैदानी / शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.
२. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.
३. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे.
४. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे.
५. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.
६. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
७. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करणे,
८. उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे,
९. उन्हात बाहेर पडणे टाळणे
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक (माध्य व उच्च माध्य) महाराष्ट्र राज्य, पुणे
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments