महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 21 मार्च 2025 रोजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी निवेदनानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा - २०२५ आयोजनाबाबत पुढील प्रमाणे सूचना जारी केली आहे.
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन माहे मे व जून २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी.
ठिकाण : पुणे
दिनांक: २७/०३/२०२५
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०१,
वरील प्रसिद्ध निवेदनानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 यावर्षीच्या मे व जून महिन्यात आयोजित केली जाणार असून याबाबतच्या अधिकृत सूचना व नियमित अपडेट जाणून घेण्यासाठी परीक्षा परिषदेच्या
या संकेतस्थळा वर परीक्षेबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. वरील संकेतस्थळावर पुढील प्रमाणे सूचना दिसते.
यावरून असे लक्षात येते की यावर्षी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT 2025 यासाठी परीक्षा परिषदेच्या स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे जे उमेदवार शिक्षक पदासाठी पात्रता धारक आहे त्यांनी सदर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे सुरू ठेवावे म्हणजे परीक्षेची अधिसूचना जारी झाल्यानंतर त्यांना परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळणार नाही.
अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणतः 45 दिवसात परीक्षा होत असते.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments