Nipun Maharashtra Assessment App व SQAAF Portal करिता मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक यांची शालार्थ प्रणालीवर नोंद करावी लागणार!

 माननीय शिक्षण आयुक्त यांनी दिनांक 20 मार्च 2025 रोजी व्हीसीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार शाळेचे मुख्याध्यापक / प्रभारी मुख्याध्यापक यांची शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन नोंदकरणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.

Nipun Maharashtra Assessment App व SQAAF Portal याकरिता व इतरही प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने राज्यातील शाळांमध्ये आजरोजी कार्यरत असलेले मुख्याध्यापक / प्रभारी मुख्याध्यापक यांची वस्तुनिष्ठ माहिती शासनास उपलब्ध होणेकरिता SHALARTH प्रणालीवर आररोजी कार्यरत असलेले मुख्याध्यापक / प्रभारी मुख्याध्यापक व ते या पदावर कधीपासून कार्यरत आहेत याबाबतची माहिती SHALARTH 2.0 मध्ये दिनांक 22.03.2025 पर्यंत नोद करण्यात यावी. याकरिता जिल्हा समन्वयक यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक PPT चा उपयोग करावा.

सदर बाबीवर मा. आयुक्त महोदय स्वतः वैयक्तीक लक्ष देऊन आहेत व सदर काम पुर्ण करण्याकरिता उद्या दिनांक 22.03.2025 पर्यंतचाच वेळ दिलेला असल्याने गटशिक्षणाधिकारी यांनी वैयक्तीकरित्या लक्ष देऊन सर्व मुख्याध्यापकांकडून SHALARTH प्रणालीवर नोंद करणेबाबत आपले अधिनस्त कार्यान्वयीन यंत्रणेकडून पाठपुरावा करून सर्व मुख्याध्यापक / प्रभारी मुख्याध्यापक यांची नोंद करून घ्यावी व नोंद झालेबाबतचा कार्यपुर्ती अहवाल या कार्यालयास उद्या दिनांक 22.03.2025 ला सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत SHALARTH BULDHANA या कार्यालयीन Whats App Group वर किंवा shalarthbuldhana0026 @gmail.com या कार्यालयीन ई मेल वर पाठविण्यात यावा.

(बी.और. खेरात) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, बुलडाणा.


मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक यांची शालार्थ प्रणालीवर नोंद कशी करावी याबाबत मार्गदर्शिका..

Download

वारंवार उद्भवणारे प्रश्न व त्यांचे उत्तर


१. एखा‌द्या कर्मचाऱ्याचे नाव निर्माण केलेल्या वेतनदेयकामध्ये दिसत नसल्यास काय करावे ?

उत्तर :

जर एखा‌द्या कर्मचाऱ्याचे नाव निर्माण केलेल्या वेतनदेयकामध्ये दिसत नसल्यास खालील नमूद केलेल्या बाबी करावे:

१. सर्वप्रथम तपासा कि सबंधित कर्मचाऱ्याची माहिती हि खालील नमूद केलेल्या स्क्रीनवर बरोबर दिसत आहे कि नाही.

मार्ग: Worklist>>Reports > Payroll > Employee Statistics (Level- डीडी

२. सबंधित कर्मचाऱ्याची 'Date of Service Expiry' ही खाली नमूद केलेल्या स्क्रीनवर तपासून पहा.

मार्ग: Worklist > Reports > Payroll > Employee Statistics. (Level-१ डीडीओ) (टीपः संबंधित कर्मचा-याची 'Date of Service Expiry' हि चालू महिनेच्या अगोदरची नसावी नसावी.)

३. सबंधित कर्मचाऱ्याची 'Post End Date' खाली नमूद केलेल्या स्क्रीनवर तपासून पहा.

मार्ग: Worklist > Reports > Payroll > Employee Statistics. (Level-१ डीडीओ) (टीपः संबंधित कर्मचाऱ्याची 'Post End Date' हि चालू महिनेच्या अगोदरची नसावी.)

४. जर सबंधित कर्मचाऱ्याची "Post End Date" हि चालू महिन्याच्या अगोदर संपलेली दाखवत

असल्यास ती "Entry Of Post" या स्क्रीन मधील "Renewal Of Post" या लिंकचा वापर करून वाढवावी.

मार्ग: Worklist > Payroll >Master screens Order master>Entry of post >Renewal of post link ( Level-2 डीडीओ) ter screens Orde

५. सबंधित कर्मचाऱ्याची 'Cadre' खाली नमूद केलेल्या स्क्रीनवर तपासून पहा.

(टीपः जर संबधित कर्मचाऱ्याची चुकीच्या Cadre मध्ये नोंद झाली असेल तर त्या कर्मचाऱ्याचे नाव निर्माण केलेल्या वेतनदेयकामध्ये दिसणार नाही.)

मार्ग: Worklist > Reports > Payroll > Employee Statistics. (Level-१ डीडीओ)

६. सबंधित कर्मचाऱ्याचे नाव खाली नमूद केलेल्या स्क्रीनवर तपासून पहा.

मार्ग: Worklist > Payroll > Organization/Office Profile Attach Employee to Bill Group.

(Level-१ डीडीओ)

७. सबंधित कर्मचाऱ्याची "With Effective From Date" हि फिल्ड खाली नमूद केलेल्या स्क्रीनमध्ये.रिकामी दाखवत दिसत आहे कि नाही ते तपासून पहा.

जर सबंधित कर्मचाऱ्याची "With Effective From Date" हि फिल्ड 'Change Details'या स्क्रीन मध्येरिकामी दाखवत असल्यास ती भरून तो फोर्म मान्यतेकरिता पुढे Level-2 डीडीओ कडे पाठवावा.

मार्ग: Worklist > Payroll > Changes > Change Details (Level-१ डीडीओ)

(टीप: संबधित कर्मचाऱ्याची "With Effective From Date" हि निर्माण केलेल्या वेतनदेयकाच्या अगोदरची नसावी.)

२. वेतनदेयकामध्ये कर्मचाऱ्यांच्या वजतीची रक्कमा दिसत नसल्यास किंवा वेतनदेयकाचे पान अर्धवट दिसत असल्यास काय करावे?

उत्तरः

वेतनदेयकामध्ये कर्मचाऱ्यांच्या वजतीची रक्कमा दिसत नसल्यास किंवा वेतनदेयकाचे पान अर्धवट दिसत असल्यास खाली बाबी करावे,

१. सर्वप्रथम खाली नमूद केलेल्या स्क्रीनवर तपासा कि सर्व कर्मचारी हे वेतनदेयाकाला जोडलेले आहे कि नाही.

मार्ग: Worklist > Payroll > Organization/Office Profile >Attach Employee to Bill Group.

(Level- डीडीओ)

२. त्यापेकी काही कर्मचारी है DCPS या प्रकारचे असून देखील त्यांना DCPS Id खाली नमूद केलेल्या स्क्रीनवर दिसत नाही. अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना वेतनदेयकातून 'Attach/Detach'

३. स्क्रीनचा वापर करून अलग करा व त्यांची खाली नमूद केलेल्या स्क्रीनचा वापर करून सेवा निवृत्त करा आणि पुन्हा configure करा.

मार्ग: Worklist > Payroll > Employee Information > Employee Service End Date.

(Level-१ डीडीओ)

(टीप: Consolidated Pay वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्याचे configuration करताना खाली गोष्टी कराव्यात. 

-'DCPS' चा 'NO' हा पर्याय निवडा

-'PF Detail' च्या dropdown मधून Not Applicable' हा पर्याय निवडा.)

३. जर वेतनदेयकामध्ये 'No Data Available' असा संदेश दाखवत असेल तर काय करावे?

उत्तरः

जर वेतनदेयकामध्ये 'No Data Available' असा संदेश दाखवत असेल तर खालील नमूद केलेल्या बाबी करावे;

१. खाली नमूद केलेल्या स्क्रीनवर जाऊन वेतनदेयकाचे सर्व पर्याय निवडले आहे कि नाहि ते तपासा. मार्ग: Worklist > Payroll > Organization/Institution Profile > Bill Group Maintenance.

(Level-१ डीडीओ)

(टीप वेतनदेयक निर्माण केल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला 'Attach/Detach' या स्क्रीनचा वापर करून वेतनदेयकातून वेगळे करू नका कारण त्यामुळेहि वरील दर्शविलेली समस्या उदभवु शकते)

४. जर निर्माण केलेल्या वेतनदेयकामध्ये कर्मचाऱ्यांची वाहन व घरभाडे भत्त्याची रक्कम दाखवत नसल्यास किंवा चुकीचे दाखवत असल्यास काय करावे ?

उत्तर :

जर निर्माण केलेल्या वेतनदेयकामध्ये कर्मचाऱ्यांची वाहन व घरभाडे भत्त्याची रक्कम दाखवत नसल्यास किंवा चुकीचे दाखवत असल्यास खालील नमूद केलेल्या बाबी करावे;

१. सर्वप्रथम तपासा कि सर्व कर्मचाऱ्यांना TA व HRA भत्ता प्रकार हा खालील नमूद केलेल्या स्क्रीनवर चेक केले आहे कि नाही

मार्ग: Worklist > Payroll > Employee Eligibility for Allowances and Deductions. (Level -१ डीडीओ)

TA व HRA है भत्ता प्रकार City Class व कर्मचाऱ्याच्या Basic वर अवलंबून असल्यामुळे त्यांचे' Percentage of Basic'खाली नमूद केलेल्या स्क्रीनवर तपासून पहा किंवा

त्यांची 'Change Details या स्क्रीनमधील" With Effective From Date" हि फिल्ड भरून ती पुढील कडे मान्यतेसाठी पाठवावी

मार्ग: Worklist > Payroll > Changes > Change Percentage of Basic (Level-१ डीडीओ)

किंवा

मार्ग: Worklist > Payroll > Changes > Change Details. (Level-१ डीडीओ)

२. जर कर्मचाऱ्यांचा City Class हा चुकीचा दाखवत असल्यास त्यांचा खाली नमूद केलेल्या स्क्रीनवर तपासून पहा व चुकीचा असल्यास तो दुरुस्त करा.

मार्ग: Worklist > Payroll > Organization/Institution Profile > Organization/Institution Details.

(Level-१ डीडीओ)

५. कर्मचाऱ्याचे GPF वाजतीची रक्कम वेतनदेयकामध्ये दिसत नसल्यास काय करावे?

उत्तरः

कर्मचाऱ्याचे GPF वाजतीची रक्कम वेतनदेयकामध्ये दिसत नसल्यास खालील बाबी करावे; १. सबंधित कर्मचाऱ्याला खाली नमूद केलेल्या स्क्रीनवर त्याच्या संवर्गनुसार (cadre) किंवा

गटानुसार (Group) वजाती निवडलेला आहे कि नाही ते तपासा

(टिप: एखादा कर्मचाऱ्याचा संवर्ग किंवा गट हा A,B,C असेल तर त्याच्यासाठी GPF GRP ABC हा वाजती प्रकार निवडा व तो Dया संवर्गाचा असेल तर त्याच्यासाठी GPF GRP D हा वाजती प्रकार निवडा.)

मार्ग: Worklist > Payroll > Emp. Eligibility for Allowances and Deductions. (Level-१ डीडीओ)

२. तसेच 'Employee Statistics' या स्क्रीनवर जर कर्मचाऱ्याचे संवर्ग किंवा गट चुकीचा दाखवत असेल तर तो 'Change Details'या 'स्क्रीनचा वापर करून पुढील स्तरावरून मान्य करून घ्या. मार्ग: Worklist > Reports > Payroll > Employee Statistics. (Level-१ डीडीओ)

मार्ग: Worklist > Payroll > Changes > Change Details. (Level-१ डीडीओ)

मार्ग: Worklist > Payroll >Master screens >Approve forwarded changes. (Level-२ डीडीओ)

६. 'Bank Statement' व 'Acquittance Roll' या अहवालमध्ये (Report) कर्मचाऱ्यांचे नाव दिसत नसल्यास काय करावे?

उत्तरः

'Bank Statement' व 'Acquittance Roll'या अहवालमध्ये (Report) कर्मचाऱ्यांचे नाव दिसत नसल्यास खाली नमूद केलेल्या बाबी करावे;

१. वेतनदेयकाची 'Created' अशी स्थिती ठेवून संबंधित कर्मचाऱ्यांची खाली नमूद केलेल्या स्क्रीनवरून वाजतीची रक्कम पुन्हा भरा व संबंधित कर्मचाऱ्यांचे वरील नाव 'Bank Statement' व 'Acquittance Roll'या अहवालमध्ये तपासा.

मार्ग: Worklist > Payroll > Employee Information > Non Government.(1 el-१ डीडीओ)


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.