Badali Update 2025 - ऑनलाईन बदली प्रक्रिया पोर्टल वर शिक्षक प्रोफाइल माहिती दुरुस्ती व सबमिट कशी करावी? मोबाईलवर ओटीपी येत नसेल तर?

जिल्हाअंतर्गत बदली-2025 अपडेट महत्त्वाचे कालमर्यादित

अत्यंत महत्त्वाचे कालमर्यादित असल्यामुळे सर्व शिक्षकांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी

📣शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया 2025

2️⃣ शिक्षकांसाठी सूचना 

🔹 प्रोफाइल मधील माहीती दुरुस्त करणे.

आपली प्रोफाईल माहिती मध्ये एखादी दुरुस्ती करावयाचे असल्यास खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

बदली पोर्टल लिंक 


https://ott.mahardd.com/


▪️आपला मोबाईल नंबर टाकून Send OTP वर टच करा. 

▪️आलेला OTP टाका व Captcha टाकून लॉगीन करा.

▪️Login केल्यानंतर OTP मोबाईल तसेच Email वर येतो.

▪️बदली पोर्टलवर लॉगीन झाल्यावर वरील डाव्या कोपर्‍यात तीन आडव्या रेषांवर टच करून Profile वर टच करा. 

▪️आपली माहिती तपासून बघा.

▪️सर्व माहिती तपासून पहा. 

▪️जी माहिती बदलायची आहे तेथे हिरव्या वर्तुळातील ✔️या चिन्हावर क्लिक करा. ❌असे चिन्ह दिसताच माहिती edit करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याचे दिसून येईल.

▪️आता आपली माहिती अचूक नोंदवा.

▪️खाली Save बटनावर क्लिक करा.

▪️आता Next बटनावर क्लिक करावे. या पानावर आपली सर्व माहिती Preview मध्ये दिसेल, सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे.

OTP बाबत🎈

ज्यांना मोबाईल क्रमांकावर OTP येत नाही आहे किंवा मोबाईल क्रमांक बदलले आहे, त्यांनी email वर सुद्धा OTP पाहू शकता. जर ई-मेल व मोबाईल दोन्हीवर ओटीपी येत नसेल तर गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी लॉगिन मधून ते दुरुस्त करून घ्यावे लागतील.

मोबाईल नंबर किंवा ई-मेल दोन्हीपैकी एका वर जरी ओटीपी आला तरी लॉगिन केल्या जाऊ शकते.

https://ott.mahardd.com/


 ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रीया 

 सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की, Online Teacher Transfer Portal वर शिक्षकांना स्वतःचे प्रोफाईल अपडेट करण्याची सुविधा Active करण्यात आली आहे.

शिक्षकांना आपले प्रोफाईल मधील Employment details मध्ये असलेल्या माहिती मध्ये त्यांना दुरुस्ती करता येईल. दुरुस्ती करून आपला प्रोफाईल डाटा शिक्षकांनी आपले लॉगीन मधून दिनांक ०८ मार्च २०२५ पूर्वी सबमीट करावा.

दुरुस्ती नसेल तरीही आपला आहे तो डाटा सबमीट करावा.

शिक्षकांनी सबमीट केलेला डाटा  गटशिक्षणाधिकारी लॉगीन वरून शिक्षकांनी यापुर्वी दिलेल्या दुरुस्ती फॉर्म नुसार व सेवापुस्तकानुसार बरोबर असलेबाबत खात्री करून verify करावे.

एकही शिक्षकांचे लॉगीन पेंडींग राहणार नाही  तसेच डाटा सबमीट करणे बाकी राहणार नाही याकरिता सर्व गटशिक्षणाधिकारी महोदय यांनी तालुकास्तरावरून समन्वय करण्याबाबत नियोजन करावे.

दिलेल्या मुदतीमध्ये profile Data Submit न झाल्यास व सदर सुविधा बंद झाल्यास व यामुळे बदली करिता आवश्यक माहिती चुकीची राहिल्यास त्यास जिल्हा कार्यालय जबाबदार राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.


जिल्हा बदली नियंत्रण कक्ष

जिल्हा परिषद बुलडाणा


सेव आणि सबमिट TAB पोर्टलवर उपलब्ध


बदली पोर्टल महत्वाचे

सर्वाना सुचित करण्यात येते की, बदली पोर्टल मधील Profile Edit, Save आणि Submit हि सेवा चालू झालेली आहे. या स्तव सर्व शिक्षकांनी खालील प्रकारा नुसार प्रोफाईल वर काम करावे.

प्रोफाईल मधील Personal Details मध्ये कसलाही बदल करता येणार नाही.

फक्त Employment Details मध्येच बदल करता येतील. ( त्यातही Udise Code मध्ये बदल सध्या चालू नाही)

प्रकार - 1) ज्याच्या प्रोफाईल मधील माहिती बरोबर आहे : 

      ज्यांच्या Profile मध्ये काहिही दुरुस्ती नाही त्यांनी त्यांची प्रोफाईल एक वेळेस चेक करून Save करावी व Verification साठी Submit करावयाची आहे.

       या करिता कोणतेही कागदपत्र भरून देण्याची आवश्यकता नाही.

प्रकार - 2) ज्यांच्या Profile मध्ये दुरुस्ती आहे :  

 ज्यांच्या Profile मध्ये दुरुस्ती आहे, अश्या शिक्षकांनी स्वत: ची प्रोफाईल चेक करून त्यात जी दुरुस्ती असेल ती दुरुस्ती करून प्रथम प्रोफाईल Save करावी व नंतर ती Submit करावी. प्रोफाईल Submit केल्यानंतर त्यात जे बदल केलेले असतील त्या बदला संबंधीत कागदपत्र केंद्रीय मुख्याध्यापक यांचे मार्फत ( प्रपत्र 3 ज्यांनी या पुर्वी भरून दिले आहे ते सोडून) गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे  जमा करायचे आहे. तसेच या पुराव्यांची शहनिशा केंद्रीय मुख्याध्यापक यांनी स्वतः करणे अपेक्षीत आहे. हि प्रोफाईल गटशिक्षणाधिकारी स्तरावर याच कागदपत्रांच्या आधारे Verify करण्यात येईल व बदल करून देण्यात येईल.

ज्यांची कागदपत्रे प्राप्त नसतील त्यांची Profile Verify न करता Reject करण्यात येईल.

प्रकार - 3)

ज्यांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल संबंधीत अडचण आहे असे. 

ज्यांचा मोबाईल क्रमांक बदलला आहे किंवा ई- मेल बदलला आहे. त्यांचे संदर्भात प्रपत्र 1 व 2 केंद्रप्रमुख यांचे मार्फत जमा करावयाचे आहे.

 यावर वरिष्ठांच्या सुचने नुसार लवकरच कार्यवाही अनुसरली जाईल.

टिपः Profile Submit करताना गांभिर्य पुर्वक Submit करावी एकदा Profile Verify झाल्यानंतर त्यात बदल करणे सहज शक्य नाही. 


ऑनलाईन बदली प्रक्रिया साठी पोर्टल वर आपली माहीती तपासत असतांना घ्यावयाची काळजी.


🔴 आपल्या मोबाईल नंबरचा वापर करून लॉगीन केल्यांनतर आपले प्रोफाईल तपासून घ्यावे. सर्व बाबी काळजीपुर्वक तपासून घ्याव्यात.

🔴 त्यामध्ये काही दुरूस्ती असल्यास कार्यालयाने आपणास दिलेल्या फॉर्म मध्ये योग्य माहीती भरावी.फॉर्म भरत असतांना ज्या माहीतीमध्ये दुरूस्ती करावयाची आहे त्या रकान्यातच माहीती भरावी.उर्वरीत रकाने कोरे सोडावे.

🔴 सन 2023 मध्ये ज्यांची ऑनलाईन बदली झालेली आहे त्यांनी माहीती तपासत असतांना Last Transfer Ty‍pe  व त्या बदली संदर्भाने आणखी काही रकाने आहेत ते  रकाने तपासून घ्यावेत त्यामध्ये आपल्या 2023 च्या बदलीची कोणतीच माहीती असणार नाही त्यामुळे सन 2023 मध्ये ऑनलाईन बदली झालेल्या सर्वांनी आपला दुरूस्ती फॉर्म भरणे गरजेचे आहे.

📌  या सर्व फॉर्मनुसार आपल्या प्रोफाईल मध्ये दूरूस्ती करून दिल्यानंतर आपले प्रोफाईल पुन्हा आपणास पडताळणीसाठी उपलब्ध होणार आहे.त्यानंतर त्यामधील माहीती तपासून आपला प्रोफाईल ओटीपी व्दारे व्हेरीफाय करावा लागणार आहे.आपण व्हेरीफाय केल्यानंतरच आपली माहीती ही बदली साठी वापरली जाणार आहे याची नोंद घ्यावी.

➡️ तरी आपल्या प्रोफाईल मध्ये काही दूरूस्ती असल्यास व सन 2023 मध्ये बदली झालेल्या शिक्षकांनी लवकरात लवकर आपला दुरूस्ती फॉर्म कार्यालयात जमा करावा.


🚨 ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रीया 🚨

सर्व गटशिक्षणाधिकारी महोदय यांना विनंती की, आपले पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्रत्येक शिक्षकांना  Online Teacher Transfer Portal वर मोबाईल क्रमांक चा उपयोग करून लॉगीन करणेबाबत आपले स्तरावरून सुचित करावे.

एकही शिक्षकांचे लॉगीन पेंडींग राहणार नाही याकरिता आपण तालुकास्तरावरून समन्वय करण्याबाबत नियोजन करावे

ज्या शिक्षकांना मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून लॉगीन होत नसेल त्यांनी पंचायत समिती मार्फत जिल्हा बदली नियंत्रण कक्षामध्ये संपर्क करावा.


जिल्हा बदली नियंत्रण कक्ष 

जिल्हा परिषद बुलडाणा


 शिक्षक बदली विशेष 2025

सर्व शिक्षकांनी आपले प्रोफाइल स्वतः च्या लॉगिन वरून दिनांक 02/03/25 पासून 09/03/25 पर्यंत अपडेट करावे.. 

प्रोफाइल अपडेट केल्यानंतर खालील प्रमाणे कार्यवाही करावी 

 👉प्रोफाइल अपडेट केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढावी 

 👉आपण प्रोफाईल मध्ये केलेले बदल (प्रिंटवर )पिवळ्या रंगाने हायलाईट करावे.

👉जे आपण बदल केले आहेत त्याचे सक्षम पुरावे सोबत जोडावेत.

👉 स्वतःपुराव्यावर सही करावी.      

   👉प्रोफाइल ची प्रिंट स्वतः व मुख्याध्यापकांनी साक्षाकिंत करावी.

👉 एखाद्या कर्मचाऱ्याच्या  प्रोफाईल मध्ये कोणताही बदल नसेल तरी प्रोफाइल अपडेट करून  प्रोफाईलची प्रिंट काढून मुख्याध्यापक मार्फत BEO ऑफिसला जमा करावी.

 👉केंद्रीय मुख्याध्यापक यांनी दररोज फॉर्म ऑफिस ला तात्काळ सादर करावेत... सर्वांचे फॉर्म येण्याची वाट बघू नये

👉 केंद्रीय मुख्याध्यापक यांनी केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांची प्रोफाइलच्या प्रती जमा झाले आहे किंवा नाही हे तपासून पहावे 

👉 चुकीची माहिती अपडेट होणार नाही याची दक्षता घ्यावी. चुकीची माहिती अपडेट केली अथवा विहित मुदतीत माहिती पूर्ण न झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार आपणास धरण्यात येईल.

 👉शक्यतो सर्वांनी लवकर काम करावे 9 तारखेची वाट बघू नये.7 तारखेपर्यंत आपल्या तालुक्याचे काम पूर्ण होईल असे सर्वांनी प्रयत्न करू.

  👉प्रोफाईल मध्ये केलेल्या बदलाचे सबळ पुरावे असतील तरच आपलं प्रोफाईल BEO लॉगिन वेरीफाय केले जाईल  याची सर्व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी.


 गटशिक्षणाधिकारी

 यांच्या आदेशान्वये 

 सोबत बदली पोर्टल लिंक 👇

     https://ott.mahardd.com/



बदली प्राधान्य विशेष

प्रति,

गटशिक्षणाधिकारी ,

पंचायत समिती सर्व

 विषय : बदली पोर्टल वर प्राथमिक शिक्षकांच्या प्रोफाईल अद्ययावत करणे बाबत .

 संदर्भ : बदली पोर्टल वरील वेळापत्रक दिनांक 01-03-2025.

वरील संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास सुचित करण्यात येते की,  प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे . 

   या बदल्यांसाठी बदली पोर्टलवर  शिक्षकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण आणि पडताळणी करण्यासाठी बदली पोर्टल दिनांक 02-03-2025 ते 09-03-2025 या कालावधीत सुरू होणार आहे तरी आपल्या अधिनिस्त सर्व पदोन्नत मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर / विषय शिक्षक व प्राथमिक शिक्षक यांना आपल्या प्रोफाईल अद्ययावत करण्यास अवगत करावे व शिक्षकांनी अद्ययावत केलेल्या प्रोफाईलची त्यांच्या मूळ सेवापुस्तीका वरून पडताळणी करावी . पडताळणी झाल्यानंतर व अंतिम पुष्टी झाल्यानंतर कोणताही आक्षेप येणार नाही याची गांभीर्याने  घ्यावी .

तसेच आक्षेप , अपिल, आक्षेप निकली काढणे या सर्व प्रक्रिया वरील तारखा दरम्यानच आहे.

आणि त्या तारखांचे वेळापत्रक सर्व स्तराच्या लॉगिन ला उपलब्ध आहे.

  तरी बदली पोर्टलवरील वेळापत्रकानुसार विहित मुदतीत  आपल्या अधिनिस्त शिक्षकांना अवगत करून सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी .

  वरील सर्व प्रक्रियेला व विलंबास आपण सर्वस्वी जबाबदार आहात ही बाब लक्षात घेऊन योग्य नियोजन करून  प्रक्रिया पूर्ण करावी .


प्रतिलिपी,

1.मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना माहितीस्तव सविनय सेवेत सादर

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणींविषयी द्यावयाच्या मार्गदर्शनबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी उद्भवलेल्या समस्यांबद्दल ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागेविले होते. दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामविकास विभागाने सदर समस्यांवर पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.

शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे :-

१) मुद्दा क्र. १ व २ :- अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये समाविष्ट झाल्यास, त्यापूर्वी एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रातील शाळेमध्ये केलेली सेवा ही अवघड क्षेत्रातील सेवा समजण्यात यावी व सदर अवघड क्षेत्रातील कालावधी खंडीत सेवा धरुन या शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीबाबत कार्यवाही करावी.

२) मुद्दा क्र. ३ व ४ :- विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट असून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

आपली,

(ज्योत्स्ना अर्जुन) 

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन


प्रत :- १) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व). २) मे. विन्सीस आयटी प्रा.लि., पुणे.



जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणीविषयी मार्गदर्शन मिळणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी प्रधान सचिव ग्राम विकास विभाग यांना पत्र लिहून पुढील प्रमाणे विनंती केली आहे.


संदर्भ -ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क. जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ दि. १८/०६/२०२४

२) कार्यासन अधिकारी, ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील पत्र क्र. न्यायाप्र/प्र.क्र.१०५/आस्था-१४ दि. ०७/११/२०२४

३) उपसचिव, ग्रामविकास विभाग यांचेकडील पत्र क्रमांक जिपब २०२२/प्र.क्र २९/आस्था-१४ दि. २३/०३/२०२२ नूसार दि. १७/०३/२०२२ च्या VC चे इतिवृत्त

महोदय, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण संदर्भ क्र. १ चे दि. १८/०६/२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. संदर्भ क्र. २ अन्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक व बदल्यांच्या अनुषंगाने करावयाची पूर्वतयारी याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदलीपात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयातील मुददा क्र. १.७ मधील अधिकार प्राप्त शिक्षक व त्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवेची करावयाची गणना तसेच संदर्भ क्र. ३ मधील मुददा क्र. ७ नुसार अवघड भागातील शाळेतील सेवा कालावधी गणण्याबाबत प्राप्त निर्देश पुढीलप्रमाणे आहेत

अ) शासन निर्णयातील मुददा क्र. १.७.२ मध्ये अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणा-या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा ३ वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राहय धरण्यात येईल.

ब) संदर्भ क्र. ३ मधील इतिवृत्तातील मुददा क्र. ७ अवघड भागातील शाळेतील सेवा कालावधी गणण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्देश आहेत-यापूर्वी अवघड क्षेत्रात असलेल्या शाळा, आता सुधारित अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीतून वगळण्यात आल्या असल्या तरी तेथे सुधारणेपूर्वी कार्यरत असलेल्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सेवा केलेली असल्याने विशेष बाब म्हणून केवळ २०२२-२३ च्या बदल्यांमध्ये अवघड शाळांमध्ये सेवा केल्याबद्दल त्यांचा विचार करण्यात यावा.

ठाणे जिल्हा परिषदेमार्फत अवघड क्षेत्राची यादी यापूर्वी दि. २३/०८/२०२२ रोजी घोषित करण्यात आली होती. सदर यादीनंतर सुधारित यादी प्रसिध्द केली तर यापूर्वीची दि. २३/०८/२०२२ ची व सुधारित या दोन्ही यादीतील अवघड क्षेत्रातील शाळांवरील सेवेचा लाभबदली अधिकार प्राप्त शिक्षक ठरविताना देता येईल. मात्र सन २०२२-२३ च्या बदल्यांमध्ये सन २०२२ पूर्वी घोषित अवघड क्षेत्राच्या यादोचा लाभ देऊन बदली अधिकार प्राप्त शिक्षक निश्चित करण्यात आले होते. मात्र सन २०२२ पूर्वीच्या अवघड क्षेत्राच्या यादीचा लाभअवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करण्यासाठी द्यायचा किंवा नाही याचा कोणताही स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात नाही. त्यामुळे बदलो अधिकार प्राप्त व बदलीपात्र शिक्षक ठरविताना पुढीलप्रमाणे अडचणी निर्माण होत आहे-

१) सन २०१९ च्या अवघड यादीप्रमाणे सन २०२२-२३ मध्ये अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक :

सन २०२२-२३ मध्ये मुददा क्र. २ मध्ये नमूद केल्यानूसार सन २०२२ पूर्वीच्या अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना ०३ वर्षे सेवा पूर्ण झाल्याने बदली अधिकार प्राप्त ठरवून सदर शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रात बदल्या झाल्या आहेत. मात्र त्या यादोतील काही शाळा सन २०२२ मध्ये प्रसिध्द केलेल्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांची सन २०१९ ते सन २०२२ पर्वतची सेवा अवघड क्षेत्रातील म्हणून ग्राहय धरावी किंवा सन २०२२ च्या यादीत हया शाळांचा समावेश सर्वसाधारण क्षेत्रात समावेश झाल्याने सन २०१९ ते २०२५ पर्यंतची सलग सेवा सर्वसाधारण क्षेत्रात ग्राहय धरावी याबाबत संदिग्धता निर्माण होत आहे.

उदाहरणार्थ, एक शिक्षक सन २००९ ते २०१९ पर्यंत सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेवर कार्यरत होता. सन २०१९ मध्ये सदर शिक्षकाची बदलीपात्र म्हणून अवघड क्षेत्रातील शाळेवर बदली झाली. सन २०२३ मध्ये सदर शिक्षक बदली अधिकार प्राप्त ठरून त्याची बदली सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेवर झाली आहे. मात्र सन २०१९ मध्ये ज्या अवघड क्षेत्रातील शाळेवर सदर शिक्षकाची बदली होऊन त्याने सन २०१९ ते २०२२ या तीन वर्षाची सेवा पूर्ण केली ती शाळा सन २०२२ च्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समाविष्ट झाली आहे. अशावेळी सन २०२२ पूर्वीच्या अवघड क्षेत्र यादीचा लाभ विशेष बाच म्हणून केवळ २०२२-२३ च्या बदल्यांमध्ये अवघड शाळांमध्ये सेवा केल्याबद्दल विचार करावयाचा असल्याने सदर शिक्षकाची सन २००९ ते २०२५ पर्यतची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात गणना करावयाची की सन २००९ ते २०१९ (सर्वसाधारण क्षेत्र), सन २०१९ ते २०२२ (अवघड क्षेत्र) व सन २०२२ ते २०२५ (सर्वसाधारण क्षेत्र) अशी गणना करावयाची याबाबत संदिग्धता आहे.

२) सन २०१९ च्या अवघड यादीप्रमाणे सन २०२२-२३ मध्ये बदली अधिकार प्राप्त ठरूनही बदली न झालेले शिक्षक : याशिवाय सन २०१९ मध्ये अवघड क्षेत्रातील शाळेवर बदली झालेल्या शिक्षकाने सन २०२२-२३ मध्ये बदली

अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून विनंती अर्ज करूनही त्या शिक्षकाची बदली झाली नसेल अशा शिक्षकास दि. १७/०३/२०२२ च्या इतिवृत्तातील मुददा क्र. ७ नुसार विशेष बाब म्हणून लाभ मिळाला नाही. मात्र सन २०१९ मध्ये अवघड क्षेत्रात असणारी सदर शाळा सन २०२२ च्या सुधारित यादीत सर्वसाधारण क्षेत्र यादीत समाविष्ट झाल्याने संबंधित शिक्षकाची सन २०१९ ते २०२५ पर्यंतची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात गणना करावयाची की सन २०१९ ते २०२२ (अवघड क्षेत्र) व सन २०२२ ते २०२५ (सर्वसाधारण क्षेत्र) अशी गणना करावयाची याबाबत संदिग्धता आहे.

अशा शिक्षकांची सन २०२२-२३ मध्ये अवघड क्षेत्रातून विनंतीने बदली न झाल्याने काही शिक्षकांनी मा. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका क्र. ९४९५/२०२३ हनुमंत साकलावे वि. महाराष्ट्र शासन दाखल केली आहे. सदर याचिकेचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. मात्र या याचिकेच्या दि. २२/०१/२०२४ च्या सुनावणीत मा. उच्च न्यायालयाने पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत-

२. In spite of the detailed order, no reply is filed. The learned AGP states that in spite of communicating the same to the State Government no instructions are received to file reply. That be the position while we grant further time to the State by way of indulgence to file reply affidavit, it is further directed that if any transfer of teachers from the difficult areas where the Petitioners are working are to be made such transfers would be made strictly on the basis of seniority amongst the teachers,

३) सन २०१९ मध्ये सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक :

शासन निर्णय दि. १८/०६/२०२४ मधील मुददा क्र. १.१० नुसार बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक,

सन २०१९ मध्ये सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेला शिक्षक बदलीपूर्वी ही १० वर्षे सर्वसाधारण क्षेत्रात कार्यरत होता. त्यामुळे सन २०१९ मध्ये बदली होऊनही सर्वसाधारण क्षेत्रात सलग १० वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण होत असल्याने व सन २०१९ च्या बदलीनंतर एका शाळेवर ०५ वर्षे पूर्ण होत असल्याने असे शिक्षक बदलीच्या ०५ वर्षातच पुन्हा बदलीपात्र ठरत आहेत.

४) यापूर्वी बदलीपात्र किंवा बदली अधिकार प्राप्त म्हणून बदली झालेल्या शिक्षकांना ०३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विशेष संवर्ग भाग १ किंवा विशेष संवर्ग भाग २ चा लाभ घेऊन बदलीच्या संधी बाबत :

शासन निर्णय दि. १८/०६/२०२४ मधील मुददा क्र. ४.२.७ व ४.३.६ नूसार विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही असे नमूद आहे. मात्र काही शिक्षकांची यापूर्वी बदलीपात्र किंवा बदली अधिकार प्राप्त म्हणून सन २०२२-२३ मध्ये बदली झालेली आहे मात्र त्यांना एका शाळेत ०३ वर्षे पूर्ण नाहीत. अशा शिक्षकांची विशेष संवर्ग भाग १ किंवा विशेष संवर्ग भाग २ चा लाभ घेऊन बदली न झाल्याने ते या संवर्गाचा लाभ घेऊन यापूर्वीच्या बदलीनंतर ०३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच बदलीसाठी विनंती करू शकतील का? याबाबत मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

तरी प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी आवश्यक बदली अधिकार प्राप्त शिक्षक व बदलीपात्र शिक्षक याद्या तयार करणे सोईचे होण्यासाठी वरील मुददा क्र. १ व २ प्रमाणे अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एकाच क्षेत्रात सलग सेवा असल्याने बदलीनंतर ०५ वर्षात पुन्हा बदलीपात्र होणारे शिक्षक यांच्याबाबत तसेच मुददा क्र. ४ बाबत आवश्यक ते मार्गदर्शन होणेस विनंती आहे.


मुख्य कार्यकारी अधिकारी

 जिल्हा परिषद ठाणे

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. साहेब बदल्या केव्हा होतील . 5 वर्षे झाले साहेब आम्ही फक्त बातम्याच वाचतो . लेकराला बाहेरगावी नेतो म्हणून पालक त्याला हरकुन देतो नंतर पालकाचा प्लॅन बदलतो . लेकरू डसा डसा रडते व शेवटी त्याला शांत झाल्याशिवाय पर्याय नाही . अशी काहीसी अवस्था पालक सरकारने आमची करून ठेवली आहे आता बातम्या आल्या की त्या वाचतांना आमच्या मनात काय विचार येत असतील . याचे संशोधन सर्व ज्ञानी तत्वज्ञानी महातत्वज्ञानी आणि मायबाप सरकारने करावे ही हात जोडून पाया पडुन सुमच्या पायावर लोटांगण घेऊन दंडवत करून नमस्कार रामराम करून यावर काहीतरी उपाय योजना करा हो साहेब कारण स्त्रींयाची अवस्था खुप खराब झालेली आहे अनेक कुटुंब विस्कळीत झाले आहे कमीत कमी स्त्रीयांचा तर विचार करा राज्य सरकार पंतप्रधान साहेब आदरणीय मोदी साहेब आपल्यासाठी बदल्या राबवणे काही मोठी गोस्ट नाही पण तुम्ही अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले तर बदल्या कधीही होऊ शकतात . धन्यवाद .9309026732

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.