Scholarship Updates - राज्यातील विजाभज इमाव व विमाप्र या प्रवर्गातील इयत्ता ५ ते ७ व इयत्ता ८ ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती / गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी करणेबाबत

 राज्यातील विजाभज इमाव व विमाप्र या प्रवर्गातील इयत्ता ५ ते ७ व इयत्ता ८ ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती / गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी करणेबाबत  शिक्षण संचालक योजना यांनी दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.


संदर्भ : मा. संचालक इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अ.शा. पत्र दिनांक ०४.०२.२०२५

उपरोक्त विषयाबाबत मा. संचालक इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अ.शा.पत्र व व त्यासोबत जोडलेले सहपत्रे, विहित प्रपत्र निदर्शनास आणण्यात येत आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन या विभागातून इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र करण्यात आलेले असल्याचे कळविले आहे, तसेच राज्यातील विजाभज इमाव व विमाप्र या प्रवर्गातील इयत्ता ५ ते ७ व इयत्ता ८ ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती /गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना हया सामाजिक न्याय विभागाच्या आस्थापनेवर व राज्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबविण्यात येत असल्याचे कळविले आहे.

शासन शुध्दीपत्रक दिनांक १७.०१.२०२५ अन्वये, संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे सन २०२४-२५ पासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती विविध योजना हया संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहेत.

सदर योजनांची अंमलबजावणी करताना सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांना इतर मागास प्रवर्ग / विजाभज / विमाप्र या प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्यांची माहिती, त्यांचे बैंक खाते, अर्ज प्रक्रिया ही शिक्षण विभाग माध्यमिक व प्राथमिक यांचेकडून प्राप्त होणे आवश्यक आहे तसेच ही योजना राबविण्यामध्ये आपले योगदान व सहभाग अतिशय महत्वाची बाब आहे.

सदर माहिती प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक यांनी तयार करुन गटशिक्षणाधिकारी यांनी तपासून शिक्षणाधिकारी यांचे मार्फत योजना संचालनालय, पुणे तसेच सहाय्यक संचालक इमाव यांच्या स्तरावरून संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी पाठविणे आवश्यक आहे.

सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांना इतर मागास प्रवर्ग / विजाभज / विमाप्र या प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्यांची माहिती, त्यांचे बँक खाते, अर्ज प्रक्रिया व विविध माहिती करीता इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांनी एकूण वेगवेगळे ८ प्रपत्रे तयार केलेली असून सदर प्रपत्रात माहिती एकत्रित तयार करण्याबाबत आपण आपल्या स्तरावरून आपल्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयांना सूचित करावे. तसेच सदर माहिती लवकरात लवकर एकत्रित केल्यास सन २०२४-२५ मध्ये वितरीत केलेला निधी १०० टक्के खर्च होईल व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल.


 (डॉ महेश पालकर) 

शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य,. पुणे-१

प्रत: माहितीस्तव सविनय सादर

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२

२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१

३. मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे-१

वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.