शिक्षक क्षमतावृद्धी २.० जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना व ख़र्च सुविधा

 शिक्षक क्षमतावृद्धी २.० जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र दि ०६/०२/२०२५.



राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० चे आयोजन करावयाचे आहे. त्याचे नियोजन संदर्भिय पत्राद्वारे आपणास कळविलेले आहे. त्यानुसार जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षणाचे नियोजन व आयोजन परिणामकारक होण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्या सहकार्याने अंमलबजावणी करुन घेण्याची जबाबदारी डाएट प्राचार्य यांची राहील. याबाबत पुढील सूचनांचे अनुषंगाने कार्यवाही करावी.

शिक्षक क्षमतावृद्धी २.० प्रशिक्षणासाठी सर्वसाधारण सूचना-

१. हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते ५ वी तसेच इ.६ वी ते ८ वी आणि इ.९ वी ते १२ वी इयत्तांना शिकविणाऱ्या सर्व माध्यमांच्या शिक्षकासाठी लागू असेल.

२. जिल्हा व तालुकास्तरासाठी अपेक्षित प्रशिक्षणार्थी संख्या निश्चित करुन देण्यात आलेली आहे त्या मर्यादेत प्रशिक्षण प्रत्येक घटकास दिले जाईल असे नियोजन करावे.

३. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०५ दिवस असून एका वर्गामध्ये ५०-६० प्रशिक्षणार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी.

४. यापूर्वी बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार दोन प्रशिक्षण वर्गासाठी ०४ तज्ज्ञ मार्गदर्शक व पुढील प्रत्येक वर्गासाठी अतिरिक्त ०२ तज्ज्ञ मार्गदर्शक घ्यावेत परंतु, प्रत्यक्षात प्रत्येक वर्गाचे आर्थिक हिशेब सादर करताना प्रतिवर्ग ०२ तज्ज्ञ मार्गदर्शक असे करुन सादर करावे.

५. प्रशिक्षणासाठी दिलेल्या विषयांनुसार एक तासिका ९० मिनिटांची याप्रमाणे ०५ दिवस दररोज ०४ तासिका होतील.

६. प्रशिक्षणादरम्यान घ्यावयाच्या प्रत्येक तासिकेचे नियोजन व आशय ppt यास्तरावरुन पुरविण्यात आलेले आहेत. त्यानुसार चर्चा, सादरीकरण, गटकार्य, प्रात्यक्षिक पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी.

७. प्रशिक्षणार्थी यांचेसाठी पूर्वचाचणी, उत्तरचाचणी आणि अभिप्राय फॉर्म ऑनलाईन स्वरुपात SCERTM मार्फत पुरविण्यात येईल. त्यामध्ये सर्व प्रशिक्षार्थी वेळचेवेळी नोंदी करतील याचा आढावा घ्यावा.

८. जिल्हास्तरीय प्रशिक्षण निवासी स्वरुपाचे असेल व त्यानंतर तालुकास्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल.

९. इयत्ता. १ ते ५. ६ ते १२ व पर्यवेक्षकीय यंत्रणा प्रशिक्षण नोंदी स्वतंत्र ठेवाव्यात. प्रत्येकाचे खर्चाचे लेखाशीर्ष स्वतंत्र आहे. त्यानुसार निधी मागणी व वितरण होईल.

. खर्च लेखाशीर्ष (१-५ साठी)-

STARS Project- SIG ३: Improved Teachers Performance and Classroom Practice

३.२: Learning Enhancement Programme.

a) Capacity Building of Primary Teachers (Grade १-५)

११. खर्च लेखाशीर्ष (६-८ साठी) -

SAMAGRA SHIKSHA-Scheme- १: Elementary Education.

Component: Quality Interventions,

Activity- ५.७.१: In-service training (Elementary) (VI-VIII)

१२. खर्च लेखाशीर्ष (९-१२ साठी) आणि (पर्यवेक्षकीय यंत्रणा प्रशिक्षासाठी)-

SAMAGRA SHIKSHA-Scheme- २: Secondary Education Component: Quality Interventions,

Activity- ३.२.१: In-Service Training (IX-XII)

१३. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण-

2. तालुकास्तर शिक्षक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी ०२ दिवसांचे स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करावे,

b. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठीच्या प्रशिक्षणामध्ये पुढील विषयांचा समावेश करावा- NEP-२०२०, SCF-SE, SCF-FS, CBA-२ क्षमताधारित मूल्यांकन संकल्पना, HPC संकल्पना, SQAAF- १, SQAAF- २, SQAAF-३ (एकूण-८)

c. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठीच्या प्रशिक्षणासाठी सर्व जिल्हास्तरीय व क्षेत्रीय अधिकारी जसे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती यांचा समावेश करावा.

d. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठीचे प्रशिक्षण २-३ तालुके एकत्र करुन आयोजित करावे, एका प्रशिक्षण स्थळावर किमान ०२ वर्ग व ०४ तज्ज्ञ मार्गदर्शक असतील असे नियोजन करावे.

१४. खर्चाच्या बाबी व निकष (प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शक यांचेसाठी)


1. आर्थिक तरतूदीनुसार निधी प्राप्त झाल्यानंतर PFMS च्या माध्यमातून अदा करण्यात येईल.

ii. नेमून दिलेल्या मर्यादेत खर्चाचे नियोजन करावे. सर्व खर्च व देयके, अभिलेखे वित्तीय नियमानुसार ठेवली जातील याची दक्षता घ्यावी,

१५. आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इ.१ली ते १२वी इयत्तांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचे जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण क्षमतावृद्धी २.० प्रशिक्षण तसेच सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल याची दक्षता गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी घ्यावी. प्राचार्य डाएट व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी संनियंत्रण करावे.


संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


प्रत, माहितीस्तव सादर

मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 
Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.