राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी राज्यात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे.
त्या अंतर्गत शाळा मूल्यांकनासाठी शाळा सिद्धि ऐवजी आता शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये शाळा प्रथम स्वयं मूल्यांकन करणार आहे व त्यानंतर शाळांची बाह्य मूल्यांकन होणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी आदेश निर्गमित करून तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.
त्यासाठी शाळांना अगोदर दिलेल्या लिंक वर जाऊन शाळांची नोंदणी करायची आहे लिंक पुढीलप्रमाणे.
वरील लिंक वर गेले असता पुढीलप्रमाणे विंडो ओपन होते.
त्यासाठी प्रथम खाते तयार करा वर क्लिक करा त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आपल्या शाळेचा अधिकृत ई-मेल आयडी टाका आपल्या सोयीनुसार पासवर्ड दोन्ही ठिकाणी टाईप करा..
सदर ई-मेल आयडी हा तुमचा या पोर्टल साठी यूजर आयडी असेल तर तुम्ही निवडलेला पासवर्ड हा पुन्हा लॉगिन करण्यासाठी आवश्यक असेल.
खाती तयार करा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदवलेल्या ईमेल आयडीवर एक लिंक प्राप्त होईल.
त्या लिंक वर क्लिक करून आपला ईमेल आयडी व्हेरिफाय करून घ्या तो वेरीफाय झाल्यानंतर आपल्याला पोर्टलवर लॉगिन करता येईल.
पुन्हा वरील लिंक असा वापर करून लॉग इन करा तुमचा यु डायस नंबर व शाळा मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकून शाळेचे डिटेल तपासून घ्या आपलीच शाळा असल्याची पुष्टी करा.
योग्य माहिती नोंदवली असल्यास तुम्हाला तुमच्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल व एकूण 128 मानके तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये दिसून येतील.
आपल्या शाळेच्या स्थितीनुसार मानकांमधील स्तर निवडून त्याविषयीचे पुरावे गुगल ड्राईव्ह वर सेव करून त्याची लिंक त्या मानकाखाली पेस्ट करून प्रत्येक मानकाबद्दल आपल्या शाळेची स्थिती नोंदवायची आहे.
आपल्या सुविधेसाठी संपूर्ण 128 मानकांची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहे खालील Download वर क्लिक करून ती आपण डाऊनलोड करून त्यानुसार माहिती तयार ठेवू शकता...
SQAAF मूल्यमापनात कोणत्या शाळेला कोणती मानते लागू आहेत व कोणती नाही
कोणत्या मानकासाठी स्तरानुसार कोणते पुरावे आवश्यक आहे.
`SQAAF वर फोटो च्या फाईल अपलोड करणे`
माझ्या मुख्याध्यापक मित्रांनो....
सध्या आपल्याला SQAAF च्या साईट वर संबंधित मानकांचे फोटो अपलोड करायचे काम करायचे आहे. हे काम कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आहे
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
1️⃣ शाळेचे खाते कसे तयार करायचे?
उत्तर
*1) scert-data.web.app या लिंक ला क्लिक करा*
*2) आता तुमच्यासमोर SQAAF चा इंटरफेस येईल. यात..*
*अ) खाते तयार करा*
*ब) लॉगिन*
*क) पासवर्ड बदला*
*हे तीन विंडो दिसतील*
*3) "खाते तयार करा" या विंडो ला क्लिक करा*
*यात तुम्हाला पुढील विंडो दिसतील...*
*अ) येथे ईमेल प्रविष्ठ करा - यात शाळेचा किंवा मुख्याध्यापकांचा ईमेल टाईप करावा*
*ब) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड लिहा- यात तुमचा पासवर्ड तयार करा*
(पासवर्ड कमीत कमी 8 अक्षरी असावा 1 कॅपिटल, 1 स्मॉल, 1 स्पेशल कॅरेक्टर,1 अंक सर्व मिळून 8)
*क) बनवलेल्या पासवर्ड ची पुष्टी/खात्री करा - यात तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहे तोच पुन्हा प्रविष्ठ करा*
*4) आता खाते तयार करा या विंडो ला क्लिक करा*
*5) आता तुम्ही जो ईमेल एंटर केला होता त्या gmail वर जा.तुम्हाला SQAAF कडून शाळा व्हेरिफाय करण्यासाठी एक मेल येईल. त्यावर क्लिक करा व तुमची शाळा व्हेरिफाय करा*
*6) आता पुन्हा scert-data.web.app या लिंक ला क्लिक करा
*7) आता तुमच्या स्क्रीन वर जो इंटरफेस येईल त्यातील लॉगिन या विंडो ला क्लिक करा*
*8)आता तुम्हाला 2 विंडो दिसतील*
*अ) येथे ईमेल प्रविष्ठ करा -*
*आता जो ईमेल तुम्ही अगोदर प्रविष्ठ केला होता तोच ईमेल या विंडो मध्ये टाईप करा*
*ब) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड लिहा -*
*यात तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहे तो टाईप करा*
*क) लॉगिन - आता लॉगिन वर क्लिक करा*
*9) आता तुम्ही तुमच्या शाळेच्या SQAAF च्या साईट वर आला आहात*
*10) तुम्हाला एकूण 128 मानके दिसत आहेत. त्यापैकी काही मानके तुमच्या शाळेला लागू नाहीत. शिवाय प्रत्येक मानकाला क्लिक केल्यावर मुख्य मानकामध्ये आणखी काही उपमानके आहेत*
*`2️⃣ किती मानके भरावीत?`*
*उत्तर - सर्वप्रथम आपल्या शाळेला किती मानके भरायची आहेत व किती लागू नाहीत हे पहा. लागू नसलेली मानके भरायची नाहीत*
*`3️⃣ SQAAF म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांचे टीम वर्क`*
*उत्तर - SQAAF हे शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्रित करायचे टीम वर्क आहे. त्यामुळे लागू नसलेली मानके वगळून जेवढी मानके येतात त्यांना आपल्या शाळेतील एकूण शिक्षक संख्येने भाग द्या व जे उत्तर येईल तेवढी मानके प्रत्येक शिक्षकांनी भरावीत त्यामुळे काम सोपे व एकदम लवकर होईल*
*उदा● 128 मानकांपैकी 14 मानके तुम्हाला भरायची नाहीत म्हणजे 128-14=114 मानके भरायची आहेत. तुमच्या शाळेत 20 शिक्षक आहेत असे गृहीत धरू. म्हणजे 114÷20=5.7म्हणजे 14 शिक्षकांना 6 मानके भरायची आहेत व उरलेल्या 6 शिक्षकांना 5 मानके भरायची आहेत.*
*4️⃣ मानकांच्या डॉक्युमेंट्स pdf कशी तयार करावी?*
*`उत्तर`*
*1) दिलेल्या 128 मानकांना क्लिक केल्यावर तुम्हाला त्यात पुन्हा 3 ते 6 उप मानके दिसतील.*
*2) त्या त्या उप मानकात जे वर्णन दिले आहे त्या वर्णनाशी संबंधित फोटो/डॉक्युमेंट यांची pdf कॉपी तयार करावी*
*`उदा•`*
1) तुम्ही मानक क्रमांक 1 या विंडो ला ओपन केले त्यात तुम्हाला 4 उप मानके दिसत आहेत. त्यात उप मानक क्र -1 शी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत.
2) उप मानक क्र-2 शी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत
3) उप मानक क्र-3 शी संबंधित जे डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत
*या प्रमाणे ज्या ज्या उप मानकांचे जे जे डॉक्युमेंट तयार होऊ शकतात त्या प्रत्येक उप मानकांचे डॉक्युमेंट तयार करून घ्यावेत*
*3) प्रत्येक उप मानकाच्या डॉक्युमेंट्स ची एकच pdf फाईल बनवावी*
*5️⃣ गुगल ड्राईव्ह ला SQAAF चे फोल्डर बनवणे व pdf फाईल अपलोड करणे-*
*`उत्तर-`*
*1) ज्या ज्या शिक्षकांकडे जेवढी मानके बनवण्याचे निर्धारित झाले आहे त्या त्या शिक्षकांनी आपापल्या गुगल ड्राईव्ह वर SQAAF नावाचे एक मुख्य फोल्डर बनवावे*
*2) त्या मुख्य फोल्डर च्या आत तुम्हाला ज्या ज्या क्रमांकाच्या मानकाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्या प्रत्येक मानकाच्या क्रमांकाचे पुन्हा एक मुख्य फोल्डर बनवून घ्या*
*3) प्रत्येक मानकाच्या फोल्डर च्या आत असलेल्या प्रत्येक उप मानाकाची वेगवेगळी माहिती देणाऱ्या डॉक्युमेंट्स ची एक वेगळी वेगवेगळी pdf फाईल बनवायची आहे*
*उदा०*
*मानक क्रमांक 1 मध्ये 4 उप मानके आहेत तर प्रत्येक उप मानकांची माहिती देणारी फोटो व इतर घटकांची एकत्रित pdf फाईल बनवावी*
*उदा०
*मानक क्र -1 मध्ये 4 उप मानके आहेत तर....*
*अ) मानक क्र - 1 हा मुख्य फोल्डर तयार होईल*
*ब) या मानक क्र - 1 च्या फोल्डर च्या आत चारही उप मानकांची माहिती देणाऱ्या pdf फाईल असतील
*क) त्या प्रत्येक pdf फाईल ला...
मानक 1-1
मानक 1-2
मानक 1-3
मानक 1-4
*अशी नावे द्यावीत व त्या त्या फाईल ची लिंक त्या त्या उप मानकाला क्लिक करून मगच पेस्ट करायची आहे*
*6️⃣ अपलोड केलेल्या प्रत्येक मानकांच्या उप फोल्डर च्या pdf फाईल ला "anyone with the लिंक" हा access देणे -*
*1) तुम्ही प्रत्येक मानकांची जी pdf फाईल तुमच्या SQAAF फोल्डर मध्ये अपलोड केली आहे त्या PDF फाईल च्या उजव्या बाजूला जे तीन बिंदू आहेत त्याला क्लिक करा*
*2) त्यात 2 नंबर चा पर्याय manage access ला क्लिक करा*
*3) आता तुम्हाला 2 नंबरचे Restricted हे असा विंडो दिसेल त्यावर क्लिक करा*
*4) पुन्हा Restricted असा विंडो दिसेल. त्यावर क्लिक करा*
*5) आता Anyone With the link यावर क्लिक करा व अपडेट झाल्यावर ड्राईव्ह च्या बाहेर या*
*7️⃣ प्रत्येक मानाकाच्या फाईल ची गुगल ड्राईव्ह लिंक बनवणे -*
*SQAAF या मुख्य फोल्डर च्या आत तुम्ही प्रत्येक मानकांच्या ज्या pdf फाईल अपलोड केल्या आहेत त्या प्रत्येक pdf फाईल ची लिंक बनवायची आहे*
*1) pdf फाईल च्या उजव्या बाजूला जे 3 बिंदू दिले आहेत त्याला क्लिक करा.*
*2) आता तुम्हाला 4 थ्या क्रमांकावर copy link चा पर्याय दिसेल. त्यावर फक्त क्लिक करा. त्या मानकाच्या pdf फाईल ची लिंक आपोआपच कॉपी होईल.*
*3) आता ती लिंक त्या त्या मानकाचा नंबर देवून तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअप अकाऊंट वर कॉपी करून पेस्ट करा*
*4) अशा रीतीने प्रत्येक शिक्षकाने त्यांना जेवढ्या मानकांचे काम करायचे आहे तेवढ्या मानकांच्या लिंक तयार करून घ्या*
*8️⃣ SQAAF च्या साईट वर त्या त्या मानकांचा विंडो ओपन करून त्या त्या मानकाच्या गुगल ड्राईव्ह ची लिंक भरणे व माहिती सबमिट करणे*
*1) SQAAF ची साईट ओपन करा*
*2) तुम्हाला ज्या मानकाची गुगल ड्राईव्ह ची लिंक भरायची आहे ते मानक ओपन करा*
*3) आता त्या मुख्य मानकातील प्रत्येक उपमानकाची गुगल ड्राईव्ह ची लिंक जी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप वर पेस्ट करून ठेवली आहे ती पुन्हा कॉपी करा. जर अगोदरच तुम्हाला कोणत्या उप मानकाची लिंक भरायची आहे हे तुमचे निश्चित झाले असेल तर अगोदरच त्या मुख्य मानकाच्या उप मानकाची लिंक कॉपी करून SQAAF ड्राईव्ह ओपन करा*
*4) आता जे मानक तुम्ही ओपन केले आहे त्यातील ज्या उप मांकाची लिंक तुम्हाला भरायची आहे त्या उप मान कावर क्लिक करा. ताबडतोब ते उप मानक आकाशी रंगाचे होईल*
*5) आता सर्वात खाली "पुरावे" या विंडो वर या.*
*6) "उपरोक्त विषयांचे समर्थन करणारी....." असे वाक्य ज्या विंडो मध्ये लिहिले आहे त्या विंडो वर क्षणभर बोट दाबून धरा*
*तुम्हाला paste असा शब्द दिसला की त्यावर क्लिक करा व तुम्ही उप मानकाची जी लिंक कॉपी केली होती ती पेस्ट करा*
*7) ताबडतोब तुम्हाला सबमिट हे बटण हाय लाईट झालेले दिसेल त्यावर क्लिक करा व माहिती सबमिट करा*
*8) अशा रीतीने सर्व मुख्य मानकांच्या उप मानकांची लिंक भरा व सबमिट करा व SQAAF चे काम पूर्ण करा
SCERT maharashtra - YOU Tube लिंक
अ.क | व्हिडिओचे नाव | YouTube ची लिंक | कालावधी (मिनिटे) |
---|---|---|---|
१ | SQAAF - प्रस्तावना | https://youtu.be/_XRRX1aMdi4 | २.५१ |
२ | SQAAF - व्हिडिओ क्र. १ - कार्यक्रमाची संरचना, व्याप्ती आणि उद्दिष्ट्ये (2) | https://youtu.be/lAjicMhEj3U | १८.१ |
३ | SQAAF - व्हिडिओ क्र. २ - क्षेत्र क्र. १ भाग - १ (अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन) | https://youtu.be/G7Z6oTTAPQ0 | ४९.१७ |
४ | SQAAF - व्हिडिओ क्र. ३ - क्षेत्र क्र. १ भाग - २ (अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन) | https://youtu.be/ZcguMmpeX84 | २८.४८ |
५ | SQAAF - व्हिडिओ क्र. ४ - क्षेत्र क्र. १ भाग -३ (अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन) | https://youtu.be/SdqMTpGTS7w | ३७.५७ |
६ | SQAAF - व्हिडिओ क्र. ५ - क्षेत्र क्र. १ भाग -४ (अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन) | https://youtu.be/Eehf1CJnHkA | २१.२२ |
७ | SQAAF - व्हिडिओ क्र. ६ - क्षेत्र क्र. २ भाग - १ ( पायाभूत सुविधा ) | https://youtu.be/q6doyW8_K18 | ४०.२५ |
८ | SQAAF - व्हिडिओ क्र. ७ - क्षेत्र क्र. २ भाग - २ ( पायाभूत सुविधा ) | https://youtu.be/1OqddreQxA8 | ४६.०८ |
९ | SQAAF - व्हिडिओ क्र. ८ - क्षेत्र क्र. ३ ( मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व ) | https://youtu.be/pAZKyzFSG0U | ३६.३१ |
१० | SQAAF - व्हिडिओ क्र. ९ - क्षेत्र क्र. ४ भाग - १ ( समावेशित पद्धती आणि लिंगसमभाव ) | https://youtu.be/W6-P1zDeORw | २४.२२ |
११ | SQAAF - व्हिडिओ क्र. १० - क्षेत्र क्र. ४ भाग - २ ( समावेशित पद्धती आणि लिंगसमभाव ) | https://youtu.be/fOn3EbbDoj4 | १६.३३ |
१२ | SQAAF - व्हिडिओ क्र. ११ - क्षेत्र क्र. ५ भाग - १ ( व्यवस्थापन, सनियंत्रण आणि प्रशासन ) | https://youtu.be/Rfpo1AoBTYM | २२.२६ |
१३ | SQAAF - व्हिडिओ क्र. १२ - क्षेत्र क्र. ५ भाग - २ ( व्यवस्थापन, सनियंत्रण आणि प्रशासन ) | https://youtu.be/bqCdFqKaqQw | ३१.४५ |
१४ | SQAAF - व्हिडिओ क्र. १३ - क्षेत्र क्र. ६ ( लाभार्थ्यांचे समाधान ) | https://youtu.be/CwU8r-EQd9o | ३४.३२ |
१५ | SQAAF - व्हिडिओ क्र. १४ - परिशिष्ट् भाग - १ | https://youtu.be/8gGZVPzUqO8 | ३७.५७ |
१६ | SQAAF - व्हिडिओ क्र. १५ - परिशिष्ट् भाग - २ | https://youtu.be/61I6XobAq2I | ३८.१९ |
१७ | SQAAF - व्हिडिओ क्र. १६ - लिंक भरणेबाबत... (2) | https://youtu.be/zHsLB1G7ICQ | ३८.३२ |
१८ | SQAAF - व्हिडिओ क्र. १७ - सारांश | https://youtu.be/JmZ0l5CqRuc | १.१८ |
अधिक माहितीसाठी नियमित भेट द्या आमच्या pradipjadhao.com या ब्लॉगला.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
6 Comments
जे मानके लागू नाहीत अशी पीडीएफ पाठवा
ReplyDeleteOk
Deleteएकदम छान माहिती मिळाली. धन्यवाद.
ReplyDelete🙏🙏
Deleteजे मानके लागू नाहीत त्यांची pdf पाठवा
ReplyDeleteOk
Delete