शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये भरणे बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक सशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.३ नुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे याच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबवर https://scert-data.web.app/ या नावाने स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी, सदरील ऑनलाईन लिकवर माहिती भरणे बाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. तसेच, सदरील लिंक ही दि.२८ फेब्रुवारी, २०२५ रोजी सायं. ०५:०० पर्यत भरण्याची कार्यवाही करावी. सदरील लिंकमध्ये माहिती भरण्याची कार्यवाही खाली दिलेल्या सूचनानुसार विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी.
१. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मुल्याकन आणि आश्वासन आराखड्याची (SQAAF) प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) याची असेल.
२. संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयं-मुल्यांकन करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील.
३. शाळांना मुल्यांकनासंदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांची असेल,
४. माहिती भरणे बाबत सर्व मुख्याध्यापक याना सोबत दिलेल्या सूचना पत्राचे अवलोकन करून माहिती भरणे बाबत कळविण्यात यावे.
५. SQAAF बाबत मार्गदर्शनपर व्हिडीओ SCERT, PUNE यांच्या SQAAF टॅबमधील SQAAF व्हिडीओ या सबटॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. माहिती भरण्यापूर्वी सर्व मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहण्यासाठी सूचित करावे.
६. SQAAF बाबत शासन निर्णय SCERT, PUNE यांच्या SQAAF टॅबमधील SQAAF- शासन निर्मान्ध या सबटॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. माहिती भरण्यापूर्वी सर्व शासन निर्णयवाचे अवलोकन करणेविषयी सूचित करावे.
७. मुल्यांकनासंदर्भात काही तक्रार असल्यास किंवा SQAAF लिंक भरणे बाबत काही तात्रिक समस्या निर्माण झाल्यास sqaafmh@maa.ac.in या ई-मेल आयडीवर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे मार्फत कळविण्यात यावे.
८. जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्वयं-मूल्यांकन पूर्ण झाल्यानतर बाह्य-मूल्यांकनं व त्रयस्थ सत्स्येद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे. तरी, सर्व शाळांना स्वय-मूल्यांकन करताना वस्तुस्थितीदर्शक माहिती भरणेबाबत कळविण्यात यावे. अवास्तव स्वयं-मूल्यांकन होणार नाही याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांना घेणेविषयी कळविण्यात यावे.
९. स्वयं-मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य-मूल्यांकन व त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे.
१०. स्वय-मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य-मूल्यांकनात व त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकनात १५% हून अधिक तफावत आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकावर याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
११. बाह्य- मुल्यांकनानंतर ज्या मानकामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अशा मानकांचा विकास आराखडा तयार करणे शाळाना बंधनकारक राहील व SOAAF पोर्टलवर अपलोड करणेबाबत सूचना प्राप्त होताच अपलोड करणे बंधनकारक राहील.
१२. बाह्य- मुल्यांकनानंतर /त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणारे मुल्यांकनानतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्या दर्शनी भागात व शाळेच्या लेटरहेडवर उल्लेख करावा.
१३. स्वयं-मूल्यांकन/बाह्य-मूल्यांकन/त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल.
सोबत - SQAAF लिंक बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना पत्र.
राहूल रेखावार (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
मुख्याध्यापक यांचे साठी सूचना मुख्याध्यापकांसाठी सूचना पुस्तिका
संपूर्ण माहिती पुस्तक
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments