महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी संनियंत्रण करणे बाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
१. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७/ र.व.का.-१ दिनांक १३/०१/२०२५
२. मा. मंत्री महोदय यांचेकडील दि.१३/०१/२०२५ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त
संदर्भीय विषयान्वये आपणांस सूचित करण्यात येते की, राज्यातील शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यालय प्रमुख यांनी राज्यातील विभागाच्या संनियंत्रणामधील सर्व शाळा, तसेच सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व मंडळांच्या शाळा, व क्षेत्रिय कार्यालय यांच्याकरीता खाली विस्तृत नमूद केल्यानुसार निर्धारित केलेल्या बाबींची पूर्तता पुढील १०० दिवसात प्रभावीपणे करणे अपेक्षित आहे.
राज्यातील प्रत्येक मुलांच्या शिक्षण गुणवत्तापूर्ण व आनंददायी पध्दतीने होणे आवश्यक आहे. याकरीता राज्य शासनाच्या धोरणानुसार कृती कार्यक्रमाची जबाबदारी विविध घटकांवर देण्यात येत आहे. पुढील विवरण तत्क्यामध्ये या कृती कार्यक्रमाची जबाबदारी पुढीलप्रमाणे सोपविण्यात येत आहे. सदर सूचनांचे पालन योग्य पध्दतीने व्हावे. तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. विहीत कालमर्यादेत सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
उपरोक्त नमूद जबाबदाऱ्या व कार्यवाही विहीत कालमर्यादेत करण्याची व्यवस्था आपल्या पातळीवर तातडीने करण्यात यावी. याअनुषंगाने आपण करीत असलेल्या कार्यवाहीचे अनुपालन व स्थितीचा पहिला आढावा दि.१०
फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात येणार आहे. तद्नंतर दर १५ दिवसांनी आढावा होईल. अंतिम आढावा दि.१५ एप्रिल, २०२५ ला घेण्यात येईल.
उपरोक्त सर्व जबाबदाऱ्या माहे एप्रिल २०२५, दिनांक १५ पूर्वी पूर्ण करणे अपेक्षित आहे. तसा अंतिम अहवाल प्रत्येक संबंधित अधिकारी यांनी आयुक्त शिक्षण कार्यालयास लिखित स्वरुपात दिनांक १५ एप्रिल, २०२५ पूर्वी सादर करणे आवश्यक राहील.
(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.)
आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव
मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
प्रत कार्यवाहीस्तव-
१. मा. राज्य प्रकल्प संचालक, (समग्र शिक्षा) महाराष्ट्र प्रार्थामक शिक्षण परिषद, मुंबई यांना सादर.
३. जिल्हाधिकारी, सर्व
२. विभागीय आयुक्त, सर्व (कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर)
टिप या आदेशाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यास्तव अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांचेकरीता व शाळांकरीता संचालक, शिक्षण उपसंचालक यांना स्वतंत्र अनुषंगिक आदेश/पत्र निर्गमित करता येतील,
वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments