जि.प.प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेतील हायस्कुल व कनि. महाविद्यालय येथील जड वस्तुंच्या निर्लेखनाबाबत मार्गदर्शक सुचना पुढील प्रमाणे.
शिक्षण विभागामार्फत जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय जि.प. प्राथमिक, उच्च प्राथ. व हायस्कुल शाळा चालविल्या जातात. सदर शासकीय जि.प. शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या विविध साहित्याचा पुरवठा जि.प. मार्फत वेळोवेळी केला जातो. जि.प. शाळेत समग्र शिक्षा, शापोआ, निरंतर व जि.प. योजना, शासकीय योजना व DPDC योजना अंतर्गत यांना पुरवठा करण्यात आलेले साहित्य आयुष्यमान संपल्यामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निरुपयोगी झाल्यास त्याचे निर्लेखन करणे आवश्यक असते तथापि असे होत नाही, यामुळे जि.प. शाळा जडसंग्रह, डेस्क, बेचेस, बेडीग साहित्य व स्वयंपाकगृहातील निरुपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात पडून असते.
सदर विनावापर साहित्याच्या साठ्यामुळे जि.प. शाळेतील काही खोल्या विनावापर पडून राहतात तसेच परिसरात सरपटणारे प्राणी, मच्छर व इतर किटक यांच वावर वाढतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास व जीवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही. तसेच निरुपयोगी साहित्य पडून राहिल्यामुळे भांडार पडताळणी दरम्यान निलेखन बाचत घेण्यात आलेले आक्षेप वर्षानुवर्ष प्रलंबित राहत आहेत व योग्य वेळी साहित्याच निर्लेखन न केल्यामुळे सदर साहित्याची घसारा किंमत वर्षानुवर्ष वाढत जात असल्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.
त्यामुळे शाळा आयुष्यमान संपल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे निरुपयोगी झालेल्या साहित्याचे तात्काळ निर्लेखन करणे अत्यावश्यक आहे. संदर्भाकीत परिपत्रक क्रं.। अन्वये जि.प. शाळा साहित्यचे निर्लेखन करणेबाबत अधिकार प्रदान केलेले होत. तथापि सदर परिपत्रामध्ये निर्लेखन बाबत सर्व बाबी समाविष्ट नसल्याने तसेच बऱ्याच वर्षापासुन निर्लेखन बाबतची प्रक्रिया अद्यावत केलेली नसल्याने निर्लेखनाबाबत सर्व बाबीचा समावेश असलेला परिपत्रक निर्गमीत करण्यात येत आहे.
प्राथ. शाळा, उच्च प्राथ. शाळा, हायस्कुल आयुष्यमान संपल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे निरुपयोगी झालेल्या जडसंग्रह, बेडिंग, स्वयंपाकगृहातील व इतर निरुपयोगी, आयुष्यमान संपलेल्या साहित्याचे निर्लेखन तात्काळ करण्यात यावे. सदर साहित्याचे निर्लेखन करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
निर्लेखन समितीची स्थापना करणे,
जि.प.प्राथमिक/उ.प्राथ./हायस्कूल शाळेतील कमवि मधील निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन बाबतची प्रक्रिया राबविणेकरिता शासन निर्णय ग्राम विकास विभाग/1096/सीआर/3588/26 दिनांक 22/11/2000 खालीलप्रमाणे निर्लेखन समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
(1) जिल्हास्तरावरील निर्लेखन समिती :-
। मुख्य कार्यकारी अधिकारी
अध्यक्ष
2 अती. मुख्य कार्यकारी अधिकारी
सचिव
3 मुख्य लेखा अधिकारी
सदस्य
4 कार्यकारी अभियंता (बांधकाम)
सदस्य
5 उपअभियंता यांत्रिकी जि.प
सदस्य
जि.प. प्राथमिक/उ.प्राथ. हायस्कूल शाळेतील/कमवि मधील निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन बाबतची प्रक्रिया राबविणेकरिता शाळास्तरावर व पंचायत समिती स्तरावर खालीलप्रमाणे निर्लेखन समिती ची स्थापना करण्यात येत आहे. शाळास्तरावरील निरुउपयोगी व निर्लखीत साहित्याचे विल्हेवाट पंचायत समितीस्तरावर निर्णय घेता येईल,
(2) पंचायत समिती स्तरावरील निर्लेखन समिती:
1संवर्ग विकास अधिकारी
अध्यक्ष
2 सहा, संवर्ग विकास अधिकारी
सदस्य
3 गट शिक्षण अधिकारी
सदस्य सचिव
4 उप अभियंता (बांधकाम)
सदस्य
5 सहा, लेखा अधिकारी
सदस्य
2. जि.प. प्राथमिक/उ.प्राथ./हायस्कूल शाळेतील/कमविस्तरीय निर्लेखन समिती :-
मुख्याध्यापक / प्राचार्य
निमंत्रक (Convener)
सेवा जेष्ट शिक्षक / लिपीक
सदस्य सचिव
3 विस्तार अधिकारी (शिक्षण) पंचायत समितो
सदस्य
केंद्र प्रमुख
सदस्य
वरच्या वर्गातील एक विद्यार्थी
सदस्य
शाळा व्यव-स्थापन समिती (SMC) अध्यक्ष
सदस्य
वरील पैकी निमंत्रक व कोणतेही किमान चार सदस्यांच्या उपस्थितीत निर्णय घेणे अनिवार्य राहिल, परंतु यामध्ये SMC व विद्यार्थी प्रतिनिधी यांचा प्रतिनिधी उपस्थित असणं आवश्यक राहील.
(3) वरील प्रमाणे निर्लेखन समित्यांची स्थापना करत असतांना सर्व सभासदांचे नांव, पदनाम यांचा उल्लेख आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळा / जिल्हा परिषद हायस्कूल/कनिष्ठ महाविद्यालय कार्यालयातील निरुपयोगी साहित्याचे निलेखन बाबत सर्व प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्याची जबाबदारी संबंधित निर्लेखन समितीची असेल.
निर्लेखन समिती बैठक घेणे :-
(1) आयुष्यमान संपल्यामुळे निरुपयोगी झालेल्या साहित्याचा योग्य व अचूक निलेखन प्रस्ताव गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कार्यालयास सादर करण्याची जबाबदारी संबंधित शाळेतील / जिल्हा परिषद हायस्कूल/कनिष्ठ महाविद्यालय निलेखन समितीची असेल. शाळा व हायस्कूल निरुपयोगी साहित्याचा निर्लेखन प्रस्ताव गट शिक्षण अधिकारी कार्यालयास सादर करण्यापूर्वी संबंधित शाळास्तरावरील निर्लेखन समितीची बैठक आयोजित करण्यात यावी व सदर बैठकीमध्ये निरुपयोगी साहित्याची यादी तयार करुन निर्लेखन समितीने सदर साहित्याची प्रत्यक्षात पाहणी करावी. निलेखनास योग्य वस्तूंचीच शिफारस निर्लेखनासाठी करण्यात यावी. ज्या साहित्याची दुरुस्ती करुन पुनर्रवापर करणे शक्य आहे अशा साहित्याच समावेश निर्लेखन प्रस्तावामध्ये करण्यात येऊ नये.
(2) आयुष्यमान संपल्यामुळे निरुपयोगी झालेले असे साहित्य ज्याची दुरुस्ती करुन पुर्नवापर करणे अशक्य आहे अशाच साहित्याची निलेखनासाठी शिफारस करावी तसेच भांडार पडताळणी दरम्यान पडताळणी अधिकारी यांना कमी आढळुन आलेल्या साहित्याचा समावेश निलेखन प्रस्तावामध्ये करण्यात येऊ नये. तद्नंतर निर्लेखन समितीने खालील नमुन्यात निर्लेखन करावयाच्या साहित्याचा निलेखन प्रस्ताव तयार करावा, 4. निर्लेखन प्रस्ताव तयार करणे :-
(1) जिल्हा परिषद शाळा / जिल्हा परिषद हायस्कूल / कनिष्ठ महाविद्यालय आयुष्यमान संपल्यामुळे निरुपयोगी झाल्यानंतर दुरुस्ती करुन पुनर्रवापर करणे शक्य नसलेल्या साहित्याचा निर्लेखन प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही संबंधित शाळास्तरावरील निर्लेखन समिती करेल व मान्यतेसाठी प.सं. कार्यालयास सादर करेल,
(2) साहित्याचे आयुष्यमान संपले किंवा कसे, सदर साहित्याचा समावेश भांडार पडताळणी मध्ये कमी आढळून आलेल्या साहित्यामध्ये आहे किंवा कसे, साहित्याची खरेदी किंमत, नग संख्या, दर, एकुण किंमत, आयुष्यमान, आयुष्यमान संपल्याचा दिनांक, घसारा किंमत व साहित्याची हाताची किंमत या सर्व बाबी अचुक व योग्य नमुद करण्याची जबाबदारी संबंधीत जिल्हा परिषद शाळा / जिल्हा परिषद हायस्कुल/कनिष्ठ महाविद्यालय यांची राहिल.
(3) जिल्हा परिषद शाळा / जिल्हा परिषद हायस्कुल/कनिष्ठ महाविद्यालय कडून प्राप्त झालेला प्रस्ताव पं.स. स्तरावरील निर्लेखन समिती मध्ये ठेवून संपूर्ण तपासणी करुन त्याला मान्यता देण्याचे अधिकार देण्यात येत आहे. (4) निलेखनास योग्य साहित्याचा निर्लेखन प्रस्ताव तयार करतांना खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
1 वस्तु/साहित्याचे नाव
आयुष्यमान संपल्यामुळे निरुपयोग झालेल्या साहित्याचा समावेश करावा.
2 जडवस्तु संग्रह रजि. पृष्ठ क्रं.
निर्लेखित करावयाच्या साहित्याची नोंद जडवस्तु संग्रह इतर रजिस्टरच्या कोणत्या पेजवर केलेली आहे त्याचा पृष्ठ क्रमांक नमूद करावा.
3 नग संख्या
निर्लेखित करावयाचे नगांची संख्या नमूद करावी.
4 दर
साहित्य कोणत्या दराने खरेदी केलेले आहे तो दर नमुद करावा.
5 एकुण किमत
निर्लेखित करावयाची नग संख्या यांची खरेदी दरानुसार एकूण किंमत नमुद करावी.
6 खरेदीचा/पुरवठयाचा दिनांक
साहित्य खरेदी केल्याचा दिनांक नमूद करावा. तो उपलब्ध नसल्यास पुरवठयाचा दिनांक नमुद करावा,
7 वस्तूंचे अंदाजित आयुष्यमान
सोबत जोडलल्या परिशिष्ट अ नुसार साहित्याचे आयुष्यमान नमूद करावे, आयुष्यमान संपलेल्या साहित्यांचाच समावेश निलेखन प्रस्तावामध्ये करण्यात यावा.
आयुष्यमान/वापर संपल्याचे अंदाजित वर्ष
साहित्याचे आयुष्यमान/वापर संपल्याचे वर्ष नमुद करावे.
घसारा किमत
सोचत जोडलेल्या परिशिष्ट व मध्ये विविध साहित्याचे वार्षिक घसारा काढण्याची टक्केवारी नमूद करण्यात आलेली आहे. सदर घसारा टक्केवारी ही वस्तुंच्या/साहित्याच्या मुळ किंमतीवर आधारित असतील. वस्तुची एकुण घसारा किमत काढतांना वस्तूच्या घसारा टक्केवारीनुसार व वस्तूच्या मुळ किमतीच्या आधारे वार्षिक घसारा किमत काढण्यात यावी. सदरची रक्कम X एकुण वर्ष असे करुन एकूण घसारा किमत काढण्यात यावी, म्हणजेच सरळ रेषा पध्दती (यामध्ये दरवर्षी वस्तूच्या मूळ किंमतीमधून घसाराची ठराविक स्थिर रक्कम कमी केली जाते) नुसार एकूण घसारा किंमत ठरविण्यात यावी.
वस्तु/साहित्याच्या मूळ किंमतीमधून एकूण घसारा किमत वजा करुन येणारी किंमत ही साहित्याची हातची किंमत ठरविण्यात यावी, सदर किंमतीस निर्लेखित साहित्याची विक्री होणे अपेक्षित आहे.
10 हातची किमत
वस्तुची हातची किमत नगण्य येत असल्यास सदर वस्तूची हातची किमत मूळ खरेदी किंमतीच्या 3% एवढी ठरविण्यात यावी, (सदर बाब सर्व प्रकारच्या बेडिंग साहित्य, संपूर्ण लाकडी बनावटीच्या सर्व साहित्यास व कुशनच्या फिरत्या खुर्चीस लागू राहणार नाही. बेडिंग साहित्य व संपूर्ण लाकडी बनावटीच्या साहित्याची हातची किमत खालील अ.क्र.4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे शुन्य ठरविण्यात यावी.) ज्या वस्तूंची नोंद रजिस्टरमध्ये नाही अथवा ज्यांच्या मुळ किमतीची कागदपत्र/माहिती उपलब्ध नाही अशा वस्तूंबाबत पंचनामा करुन नोंदघेण्यात यावी व समितीमार्फत किंमत ठरवून त्या किंमतीच्या आधारे उर्वरित निर्लेखनाची कार्यवाही विहीत पध्दतीने करण्यात यावी.
(5) यासोबत जोडलेल्या परिशिष्ट क मध्ये साहित्याची घसारा किमत व हातची किंमत ठरविणेबाबतचे उदाहरण दिले आहे.
(6) सदर निलेखन प्रस्तावामध्ये नमुद साहित्याचे विहित आयुष्यमान संपले असलेबाबत तसेच सदर साहित्य दुरुस्ती करुन पूर्णवापर करणे शक्य नसलेबाबत, निर्लेखनास योग्य साहित्यामध्ये भांडार पडताळणी दरम्यान पडताळणी अधिकारी यांना कमी आढळून आलेल्या साहित्याचा समावेश करण्यात आलेला नसलेबाबत तसेच निर्लेखन प्रस्तावामध्ये नमुद साहित्याचे नग, दर, एकूण किंमत, खरेदी किमत, आयुष्यमान,
आयुष्यमान संपल्याचा दिनांक, घसारा किंमत, हातची किमत व साहित्य नोंद रजिस्टर पृष्ठ क्रमांक या सर्व बाबी अचुन व योग्य नमुद केलेल्या असलेबाबतचे निर्लेखन समितीच्या सदस्यांचे दिनांकीत स्वाक्षरीसहचे प्रमाणपत्र निर्लेखन प्रस्तावासोबत जोडण्यात यावे.
(7) बहुतांश वस्तुची खरेदी शिक्षण संचालक, पुणे, शिक्षणाधिकारी (प्राथ) अशा वरिष्ठ स्तरावरुन होत असल्याने शाळा स्तरावर काही वस्तूंची मुळ खरेदी किमत उपलब्ध नसते. निलेखन समितीने अश वस्तूंसाठी नजर अंदाजाने अशा वस्तूंची किमत निश्चित करावी.
(8) निलेखनाची कार्यपध्दती अत्यं पारदर्शकपणे पार पाडावी व निलेखन साहित्य विक्रीचे संपूर्ण दस्ताऐवज व्यवस्थितपणे जतन करुन ठेवण्यात यावेत.
(9) निर्लेखन समितीच्या बैठकीचे इतिवृत व सदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णय निर्लेखन समिती,
5. लाकडी साहित्य, बेंडिग साहित्य व संगणकाच्या (Computer ची सर्व Accessories, mouse pad) कुशनच्या खुच्र्याचे निर्लेखन बाबत :-
(1) संपूर्ण लाकडी बनावटीचे सर्व प्रकारचे साहित्य, सर्व प्रकारचे बेडिंग साहित्य, आसन पटटी) व (Computer ची व Accessories, कुशनच्या फिरत्य खुच्यां है नाशवंत स्वरुपाचे असल्यामुळे सदर साहित्याची विक्री होणे अशक्य असल्याने सदर साहित्याचे आयुष्यमान संपल्यास दुरुस्ती करुन पुर्नवापर करणे शक्य नसल्यास सदर साहित्यांच्या निर्लेखन प्रस्तावामध्ये हातची किंमत शुन्य नमुद करण्यात यावी. यामध्ये लाकडी व लाखंडी (मिक्स) बनावटीच्या साहित्याचा समावेश करु नये उदा. लाकडी व लोखंडी (मिक्स) बेंच, टेबल, खुर्ची, स्टुल इ. लाकडी व लोखंडी (मिक्स) बनावटीचे साहित्य.
(2) सदर साहित्यांच्या निलेखन प्रस्तावास गट विकास अधिकारी पं.स. कार्यालयामार्फत मंजूरी मिळाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद शाळा / जिल्हा परिषद हायस्कुल/कनिष्ठ महाविद्यालय निर्लेखन समितीच्या समक्ष सदर साहित्याची योग्य विल्हेवाट लावून सदरचे साहित्य नोंदवहीमधुन कमी करण्यात यावे.
6. रिकामे तेलाचे डब्बे, रददी व रिकामे बारदान यांचे निर्लेखन :-
(1) शालेय पोषण आहार योजनेचे रिकामे तेलाचे डब्बे, रददी व रिकामे बारदान यांची विक्री मुख्याध्यापक शाळा स्तरवर जाहिर लिलाव / निविदा प्रकियेद्वारे करण्यात यावी. सदरची प्रक्रिया राबविणेपूर्वी शाळा स्तरावरील निर्लेखन समितीची मंजुरी घेण्यात यावी.
(2) रिकामे तेलाचे डब्बे, रददी, रिकामे बारदान यांची विक्री बाबतची प्रक्रिया वर्षातुन एक वेळेस पार पाडावी जेणेकरुन शाळास्तरावर अशा साहित्याचा संग्रह होणार नाही. तसेच सदर प्रक्रियेद्वारे प्राप्त रक्कम शासन खाती जमा करण्याकरीता मा. शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प. चंद्रपूर यांच्या नावे डिडी किवा चेक पाठविण्यात यावा.
7. निर्लेखनास मंजुरी देणे :-
शासन निर्णय वित्त विभाग क्र. अवप्र 2013/प्रक्र 30/2013 दिनांक 17/04/2015 वित्तीय अधिकार नियम पुस्तीका 1978 वित्तीय अनु.क्र. 22 नियम 146 अन्वये जिल्हा परिषद शाळा / जिल्हा परिषद हायस्कुल/कनिष्ठ महाविद्यालय व गशिअ कार्यालयातील आयुष्यमान संपल्यामुळे निरुपयोगी झालेल्या साहित्यांच्या निर्लेखन प्रस्तावास मंजुरी देणारे प्राधिकारी पुढीलप्रमाणे असतील.
वित्तीय शक्तीचे वर्णन
जडसंग्रह, बेडिंग, स्वयंपाकगृहातील व इतर निरुपयोगी, आयुमर्यादा संपलेले साहित्य/बस्तु निर्लेखित
करणे, अ.क्र. 22(146)
अधिकाराचा वापर करण्यास सक्षम असलेले प्राधिकारी संवर्ग विकास अधिकारी कार्यालय प्रमुख
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी विभाग प्रमुख
ग्रामविकास विभाग
प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारांची मर्यादा (वार्षिक)
रु. 0 ते 60000/- पर्यंत हातची किंमत (प्रति शाळा)
2.00 लक्ष पर्यंत हातची किमत (प्रति शाळा)
पुर्ण अधिकार (प्रति शाळा)
(मा.मुकाअ जि प यांचे वित्तीय अधिकार प्रदान आदेश क्र. सावि/स्था3/877/2014 दि. 11/04/2014 महाराष्ट्र आकस्मीक खर्च नियम 1963 नियम 146 कलम 96 (1) नुसार खातेप्रमुख यांचे 20,000/- व संवर्ग विकास अधिकारी यांना 10,000/- चे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. परंतु शासन निर्णय 17/05/2015 नुसार वरील प्रमाणे निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन करण्याकरीता सुधारीत शासनाचे आदेश प्राप्त आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.)
8. निर्लेखन साहित्याचे लिलावाचे अधिकार मा. मुकाअ जि प यांचे वित्तीय अधिकार प्रदान आदेश क्र. सावि/स्था3/877/2014 दिनांक 11/04/2014 अन्वये निरुपयोगी साहित्याचे लिलाव करणे करीता खालीलप्रमाणे अधिकार नमुद करण्यात आलेले आहे.
9. निर्लेखनास साहित्य लिलावाची कार्य पध्दत :-
शासन परिपत्रक वित्त विभाग डिएफपी/1016/प्रक्र 07/16/विनीयम/दिनांक 22/06/2016 व सामान्य प्रशासन विभाग माहिती व तंत्रज्ञान संचालनालय शासन निर्णय क्र/मातस/08/6/2013 DIRDITMH/39 दिनांक 03/12/2014 मध्ये निरुपयोगी व दुरुस्ती न होण्याजोगे, जास्तीचे साहित्य लिलावाबाबत कार्यध्दत नमूद आहे.
हातच्या किंमतीपेक्षा निविदेची लिलावाची किंमत कमी येत असेल तर एक महिन्याचे आत पुन्हा प्रसिध्दी दयावी. तद्नंतरही आलेली किंमत जर हातच्या किंमतीपेक्षा कमी येत असेल तर नजीकचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मान्यतेने निविदा स्विकारण्यात यावी.
10. वरील प्रमाणे निलेखनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लिलावाद्वारे/निविदेद्वारे प्राप्त झालेली रक्कम खालील लेखा शिर्थात
चलनाद्वारे तात्काळ शासन जमा करण्यात यावी,
विभाग - जिल्हानिधी
प्रधानशीर्ष - 0202 शिक्षण
उपप्रधान शीर्ष - (800) इतर जमा जड वस्तुसंग्रह विक्रीपासून मिळालेले उत्पन्न
11. वरील प्रमाणे निलेखनाची प्रक्रिया पूर्ण झालयानंतर निलेखित साहित्य जडसंग्रह नोंदवही, बेडिग नोंदवही इ. मधुन कमी करण्यात यावे,
12. भांडार सामानाच्या, जडवस्तुंच्या व बेडिंग साहित्याच्या वसुल न होणाऱ्या किमती निर्लेखित करणे :-
(1) जि.प.शाळा व हायस्कूल नैसर्गिक आपत्तीमुळे (आग, पुर इ.) हानी नुकसान झालेली असेल अशा साहित्याचे निलेखन करत असतांना सदर साहित्याची विक्री होणे अशक्य असल्यास सदर साहित्याची हातची किंमत शून्य नमूद करुन याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प. चंद्रपूर यांना मान्यतेस्तव सादर करण्यात यावा.
(2) ज्या वस्तु भांडार सांभाळणाऱ्या किंवा इतर कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे हलगनौपणामुळे साठ्यातुन गहाळ झाल्या आहेत अशा वस्तूंचा समावेश यामध्ये करु नये, तसेच झालेली हानी ही चोरी, अपहार किया लबाडी या कारणाने झालेली नसावी.
(3) प्राथमिक शाळा व हायस्कूल येथे आग लागून साहित्याची झालेल्या हानीची रक्कम निलेखित करण्यासाठी पं.स. कार्यालयाच्या स्तरावरील निलेखन समिती प्रमुख सदस्य, संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी व संबंधित पोलीस स्टेशनचे प्राधिकारी यांच्या समक्ष सविस्तर पंचनामा करणे आवश्यक आहे.
(4) जि.प. हायस्कूल, प्राथामिक शाळा कार्यालयातील भांडार सामानाच्या, जडवस्तुंच्या व बंडिग साहित्याच्या बसुल न होणाऱ्या किंमती निलेखित करणेबाबतच्या प्रस्तावास मंजुरी देणारे अधिकारी पुढीलप्रमाणे असतील. कलम 96 (1) प्रमाणे अधिकार प्रदान केलेले आहे.
(5) शासन निर्णय विअप्र/2013/प्रक्र.30/2013/विनीयोग दिनांक 17/04/2015 प्रमाणे बसुल न होणारे बस्तच्या किंमती निलेखन करण्याचे अधिकार खालील प्रमाणे आहे.
वित्तीय शक्तीचे वर्णन
भांडार सामानाच्या, जडवस्तूच्या च बंडिग वसुल न होणारे किमती निर्लेखित करणे नियम 146, अनु क्र.21
अधिकाराचा वापर करण्यास सक्षम असलेले प्राधिकारी
कार्यालय प्रमुख शिक्षणाधिकारी (प्राथ. गट शिक्षणाधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
विभाग प्रमुख ग्राम विकास विभाग विभाग प्रमुख
प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारांची मर्याद
रु. 60.000/- पर्यंत मुळ किंमत (प्रति शाळा)
रु. 2,00,000/- पर्यंत मूळ किंमत (प्रति शाळा)
पूर्ण अधिकार (प्रति शाळा)
13. चोरीच्या प्रकरणातील तपास लागलेला नसेल अशा प्रकरणातील वस्तूंच्या रक्कमा निलेखित करणे:-
(1) शासकीय प्राथमिक शाळा व हायस्कूल एखाद्या साहित्याची चोरी झालेली असल्यास सदर साहित्याच्या रक्कमा निर्लेखित करत असतांना सदर साहित्याची हातची किंमत वस्तुच्या मूळ किमतीच्या 3% एवढी नमूद करुन निर्लेखन करण्यात यावे.
(2) ज्या वस्तु भांडार सांभाळणाऱ्या किंवा इतर कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे हलगर्जीपणामुळे चोरी झालेल्या असु नयेत. अशा प्रकरणी नुकसानीची हानीची रक्कम निलेखित करणे पूर्वी प्रस्तुत प्रकरणाचे वर्गीकरण तपास न लागलेले व ए अविलंबती प्रकारचे असल्याबाबतचे पोलीसांकडील शिफारसपत्र असावे.
(3) प्राथमिक शाळा व हायस्कूल कार्यालयातील चोरीच्य प्रकरणातील तपास लागलेला नसेल अशा प्रकरणातील वस्तुंच्या रक्कमा निलेखित करणेबाबतच्या प्रस्तावास मंजुरी देणारे प्राधिकारी पुढीलप्रमाणे असतील,
(4) शासन निर्णय विउत्प्र/2013/प्रक्र 30/2013/विनीयांग दिनांक 17/04/2015 प्रमाणे वसूल न होणारे वस्तच्या किमती निर्लेखन करण्याचे अधिकार खालील प्रमाणे आहे,
वित्तीय शक्तीचे वर्णन
तपास लागलेली व अवलंब अशा वर्गिकरणाची पोलीस
शिफारस करतील अशा चोरी प्रकरणातल वसूलात होणारी हामी निर्लेखन करण अ.क्र. 23) नियम क्रमांक 146
अधिकाराचा वापर करण्यास सक्षम असलेले प्राधिकारी
कार्यालय प्रमुख गट शिक्षणाधिकानी
मु.का.अ. यांचे अधिकार निलेखन समिती,
ग्रामविकास विभाग
प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारांची मर्याद
रु. 40,000/- पर्यंत
रु. 1,25,000/- पर्यंत प्रति पूर्ण
14. "जडवस्तू संग्रहाची नोंदवही" जि.प.प्राथ शाळेमध्ये ठेवण्याकरीता माहिती: "Dead Stock Register"
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता 1968 यातील नियम 202 (2) यान्वये शासनाने विहीत केलेला नमुना 33 यात, खरेदी केलेल्या अथवा संस्थेकडे अस्तित्वात असलेल्या सर्व जंगम मालमत्ता याची नोंद घेतली जाईल. या नोंदवहीत नोंद करतांना वस्तूचे स्वरुप, आकार, वर्णन, खरेदी किंमत, खरेदीचा दिनाक, कोणाकडून खरेदी केली आहे अथवा झाली, इत्यादि तपशील वस्तुनिहाय दर्शविणेत येईल. वर्षातून एकदा सर्व साधारणपणे जून महिन्यात सर्व वस्तूंची नोंदी प्रमाणे पडताळणी प्रत्यक्षपणे केली पाहिजे व पडताळणीत नोंदवाहीतील नोंदी प्रमाणे व संख्येप्रमाणे सर्व वस्तू बरोबर आढळून आल्या पाहिजेत अथवा जेंव्हा बरोबर आढळून येत नाहीत तेंव्हा त्याची नोंद घेणेत आली पाहिजे अथवा जास्त वस्तु आढळून आल्यास त्याचीही नोंद घेणेत यावी. जून महिना अखेरीस याबाबत अहवाल व प्रमाणपत्र पाठवले पाहिजे,
वरील प्रमाणे जि.प.प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेतील हायस्कूल व कनि, महाविद्यालय येथील जड वस्तुंच्या निर्लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमीत करण्यात येत आहे. निरुउपयोगी व वापर न होणाऱ्या साहित्याचे निलेखन व लिलाव शाळेच्या स्तरावर करण्यात यावे. त्याकरिता आवश्यक त्या समितीची मान्यता घेण्यात यावी, निलेखन व लिलाव झाल्यानंतर संपूर्ण अहवाल हा कार्यवृत्तासह शाळेच्या स्तरावर ठेवण्यात यावे, उपयोगी व दुरुस्त होणाऱ्या साहित्याचे निर्लेखन व लिलाव झाल्याचे आढळल्यास संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य व गट शिक्षणाधिकारी यांच्या विरुध्द कार्यवाही करण्यात येईल.
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, चंद्रपुर
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments