जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध मुलभूत सुविधेबाबतची शाळानिहाय माहिती उपलब्ध करुन देणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हे यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी दिनांक सात फेब्रुवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :- मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग यांची दि. 07/02/2025 रोजीची बैठक.
मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग यांनी दि.07/02/2025 रोजी जिल्हा परिषद शाळेतील उपलब्ध मुलभूत सुविधेबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने शाळानिहाय आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील उपलब्ध मुलभूत सुविधा, उपलब्ध जागा संदर्भातील सर्व अद्ययावत शाळानिहाय माहिती दि. 12/02/2025 रोजीपर्यंत सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सदरील सुचनेच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये शाळानिहाय माहिती (Excel File) भरुन ईमेलद्वारे या कार्यालयास पाठविण्यात यावी.
(आर. विमला, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक,
म.प्रा.शि.प., मुंबई.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments