मोफत पाठयपुस्तक सन २०२५-२६ करिता नियमित पाठ्यपुस्तके ऑनलाईन मागणी नोंदविणेबाबत MPSP आदेश

 मोफत पाठयपुस्तक सन २०२५-२६ करिता नियमित पाठ्यपुस्तके व लार्ज प्रिंट पाठयपुस्तकांची ऑनलाईन मागणी नोंदविणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.


उपरोक्त संदर्भिय पत्रानुसार समग्र शिक्षा, स्टार्स व पीएमश्री अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०२५-२६ चे कार्यवाही सुरु झालेली आहे. समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०२५-२६ मध्ये मोफत पाठ्यपुस्तकांसाठी तरतूद प्रस्तावित करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या निकषानुसार समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके हा उपक्रम इयत्ता १ ली ते ८ वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांतील सर्व विदयार्थ्यांसाठी अनुज्ञेय आहे हे आपणांस विदित्त आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरु होण्यापूर्वी बालभारतीच्या ई-बालभारती पोर्टलवर पाठ्यपुस्तकांची नोंदणी करून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा विहित मुदतीत करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देता येतील.

समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकामध्ये मोफत पाठ्यपुस्तके सन २०२५-२६ केंद्रशासनाकडून मंजूर होण्याच्या अधीन राहून, तसेच विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने, इयत्ता १ ली ते ८ वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांमधील सर्व मुलां-मुलींसाठी, यु-डायस प्लस सन २०२३-२४ च्या विद्यार्थी संख्येनुसार, पाठ्यपुस्तकांची बालभारतीच्या ई-बालभारती पोर्टलवर ऑनलाईन मागणी दि.२०/०२/२०२५ पूर्वी तात्काळ नोंदविण्यात यावी. नियमित पाठ्यपुस्तके व लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविताना मागील शैक्षणिक वर्षामधील शिल्लक असलेली पुस्तके तसेच पुनर्वापरासाठी उपलब्ध असलेली पाठ्यपुस्तके मूळ मागणीमधून वजा करून उर्वरित पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविण्यात यावी व सदर मागणी या कार्यालयाकडून निश्चित करून घेण्यात यावी.

विहित मुदत्तीमध्ये आपल्या जिल्हा परिषद / महानगरपालिकेची उपरोक्त सूचनेनुसार मागणी नोंदविली न गेल्यास व पाठ्यपुस्तकांचा पुरवठ्यामध्ये विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी.


(आर विमला भा.प्र.से) 

राज्य प्रकल्प संचालक मप्राशिप, मुंबई

https://ebalbharati.in/main/publichome.aspx

प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव :-

१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व

३) शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

४) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,

५) संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे.

६) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

 महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.