जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यरत अधिकारी, कर्मचारी व सर्व शिक्षक यांचेसाठीच्या आचारसंहिता..

 जिल्हा परिषद, शिक्षण विभाग धुळे या विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी व शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या जिल्हयातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळामधील मुख्याध्यापक, शिक्षक यांना खालील बाबींचे पालन करणे बंधनकारक करण्यात येत आहे.

1. नियमित शालेय वेळेत व कोणत्याही शासकीय कार्यालयात जातांना ओळखपत्र परिधान करावे.

2. नियमित शालेय वेळेत आपला पोषाख स्वच्छ व नीट नेटका परिधान करावा. तसेच विद्यार्थ्यांचा पोषाख स्वच्छ निटनेटका व वैयक्तिक स्वच्छता (जसे नख, केस इ.) असावी.

3. सर्वानी नियमित शाळेत वेळेपूर्वी उपस्थित राहावे व पुर्ण काम करून शालेय वेळेनंतर शाळा सोडावी.

4. मध्यल्या सुटीची वेळ तंतोतत पाळावी.

5. अध्यापनाचे कार्य करतांना शासनाने पुरविलेल्या शैक्षणिक साहित्याचा नियमित वापर करावा व नोंदी ठेवाव्यात.

6. विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवावेत. प्रत्येक विद्यार्थ्यांला त्या त्या इयत्तेच्या अध्ययन क्षमता/अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून द्याव्यात. शैक्षणिक साहित्यांचा वापर करून स्वयंअध्ययनाची विद्यार्थ्यांना सवय लावावी.

7. शालेय अभ्यासक्रम विहीत मुदतीत पुर्ण करावा. तसेच विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करावे.

8 इ. 3 री व इ. 4 थी तसेच इ. 6 वी व इ. 7 वी या वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घ्यावी.

9. शालेय क्रीडा साहित्याचा नियमित वापर करावा. खेळाच्या तासिका नियमित घ्याव्यात.

10. शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार यु-डायएस, आधार व्हॅलीडेशन, अपार आयडी, SQAAF, हर घर संविधान, महावाचन, विद्यार्थी पोर्टल, शिक्षक पोर्टल इ. ऑनलाईनची कामे विहीत वेळेत व मुदतीत पुर्ण करावी.

11. शालेय अभिलेखे, विविध शालेय समित्यांचे इतिवृत्त, गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, आर्थिक अभिलेख, शापोआ अभिलेखे इ. अभिलेखे अद्ययावत असावेत.

12. अध्ययनस्तर निश्चिती चाचणी, PAT व त्या अनुषंगाने असलेल्या विविध परीक्षांचे पेपर तपासणे विद्यार्थी संचिका / प्रगतीपुस्तक अद्ययावत ठेवणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या ऑनलाईन प्रणालीत विहीत मुदतीत माहिती / गुण भरावे. गुणदानाची प्रत आपल्या दप्तरी जतन करून ठेवावी.

13. शालेय भौतिक सुविधाची वेळोवेळी दुरूस्ती करणे.

14. शालेय पोषण आहारातंर्गत तांदुळ व धान्यादी माल स्वच्छ व सुरक्षित असावा. कोरडया जागी ठेवावा.

15. स्वयंपाकी व मदतनीस यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्य प्रमाणपत्र शालेय दप्तरी असावे.

16. पोषण आहार दिलेल्या विहीत मेनु प्रमाणे नियमित द्यावा व आहाराचा दर्जा उत्कृष्ट असावा.

17. शालेय पोषण आहार तपासून नमुना काढून ठेवावा.

18. शालेय विविध समित्यांची स्थापना केलेली असावी व नियमित बैठका घेवून इतिवृत्त अद्यावत असावे. (विशाखा समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, शाळा व्यवस्थापन समिती इ.)

20. शालेय अनुदानाचा विनियोग विहीत मुदतीत करून आर्थिक अभिलेखे अद्यावत करावेत. . संबधित ग्रामपंचायतीस शालेय स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई करण्यासाठी पत्र देवून सफाई कर्मचा-यामार्फत नियमित स्वच्छता गृह स्वच्छ करून घ्यावेत, स्वच्छतागृहात नियमित पाण्याची व्यवस्था असावी.

21. दर शनिवारी आनंददायी शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षेबाबत तसेच Good Touch Bad Touch बाबत उपक्रम राबवावा. तसेच क्षेत्र भेटी नाविन्यपूर्ण उपक्रम कथा कथन, गीत गायन, खेळ, कागद काम, माती काम हस्तकला इ. नाविन्यपूर्ण आयोजन करावे. जेणे करून विद्यार्थी शनिवारची वाट पाहतील व उपस्थित वाढण्यास मदत होईल.

22. तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागी बसविलेली असावी व शासन निर्णयानुसार तक्रारीचे निवारण करावे. चाईल्ड हेल्पलाईन क्र. 1098 शाळेच्या दर्शनी भागी लिहीलेला असावा,

23. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशान्वये 100 दिवसांच्या कृती आराखडातंर्गत शाळेतील वर्ग खोल्या, कार्यालय आणि परिसर स्वच्छ करावा.

24. शाळेत नादुरस्त साहित्य / वापर नसलेल्या वस्तु / इलेक्ट्रानिक वस्तु इतर भंगार वस्तु यांचे शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घेवून शासन नियमानुसार निर्लेखन करावे.

25. शालेय वाचनालयातील पुस्तकांचा शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांना / माताना घरी वाचण्यासाठी ग्रंथालयातील पुस्तकांचा लाभ दयावा.

तरी उक्त परिपत्रकांत नमुद केलेल्या प्रमाणे अंमलबजावणी करावी.


शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

 जिल्हा परिषद धुळे




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.