इ. १२ वी व १० वी फेब्रुवारी-मार्च २०२५ प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण व श्रेणी ऑनलाईन पध्दतीने भरण्याची कार्यपद्धती.

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी)

फेब्रुवारी-मार्च २०२५

प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण व श्रेणी ऑनलाईन पध्दतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती


१. फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचे इ. १२ वी व इ. १० वी च्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षेचे गुण व श्रेणी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय/शाळा बांनी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Internal/Practical Mark & Grade या Link मधून मंडळाकडे पाठवावयाचे आहेत.

२. गुण नोंदविण्याकरीता Maker-Checker कार्यपद्धती वापरावयाची असून, त्याकरीता सध्याच्या Login Id जसे इ.१२ वी (1) तसेच इ.१० वी (5xxxxxxx_1) हा अनुक्रमे प्राचार्य/मुख्याध्यापक यांचेसाठी असून, त्यांनी Checker म्हणून काम करावयाचे आहे. तर इतर शिक्षक/लिपिक यांनी Maker मधून गुण नोंदविण्याचे काम करावयाचे आहे.

३. Maker Login मध्ये विषय निहाय / माध्यम निहाय त्या त्या विषयाच्या विद्यार्थ्यांची कोरी पृष्ठे (Blank Marksheet) प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांकन करण्यासाठी उपलब्ध होतील तसेच त्या संदर्भातील तारखा स्वतंत्र्यरित्या कळविण्यात येतील.

४. विषयनिहाय प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकावर (Blank Marksheet) बैठक क्रमांकानुसार (Seat no wise) गुणांच्या / श्रेणीच्या नोंदी घेऊन Maker Login मधून त्याची HSC Marks/Grade या Option मधून Online Entry करायची आहे. सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का याबाबत Printout काढून खात्री करता येईल. एका विषयाच्या सर्व गुणांची/श्रेणीची Online नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरीता "Send for Approval to checker" हा option Enable होईल. त्याव्दारे सर्व पृष्ठ ही Checker कडे तपासणीसाठी पाठविता येतील, अशाप्रकारे सर्व विषयांची पृष्ठे Entry पूर्ण करून Checker कडे तपासणीसाठी पाठवावयाची आहेत.

५. Checker User ला इ.१२ वी (1xxxxxxx 1) तसेच इ.१० वी (Sxxxxxxx 1) त्याचे Login मध्ये Maker Liser ने पाठविलेली सर्व पृष्ठ HSC Marks/Grade या Option मध्ये तपासणीसाठी उपलब्ध होतील. Checker User ने सर्व विषयाच्या गुणाच्या/श्रेणीच्या नोंदी तपासून पृष्ठनिहाय मान्य (approve) करावयाच्या आहेत सर्व पृष्ठे मान्य (approve) झाल्यानंतर "Send for Board Approval" ही Option Enable होईल. त्या Option मधून सर्व विषयांचे अंतिम गुण व श्रेणी मंडळाकडे पाठवावयाच्या आहेत.

६. आपल्या कनिष्ठ महाविद्यालय/शाळेमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांकनिहाय ऑनलाईन पध्दतीने नोंदविलेल्या गुणांची Final Printout घेयून त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी (आवश्यक त्या विषयाच्या बाबत) व तोडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेवून सदर गुणतक्त्यावर प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय/शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे व सदरचे गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारीत तारखेस प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकीटामध्ये, पाकिटावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, Index No घालून जमा करावयाचे आहेत. तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे.

७. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यामापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देवू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदरची ऑउट ऑफ टर्न परीक्षा लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळाने कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल.

८. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक सदर ऑउट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालय/शाळांना उपलब्ध करून दिले जातील. सदर विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन पध्दतीने "Out of Turm marks" या Option द्वारे नोंदविण्याची कार्यवाही शाळा व क. महाविद्यालयानी उपरोक्त पद्धती प्रमाणेच Maker व Checker Login चा वापर करून करावयाची आहे.

९. अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्रे भरलेल्या व या गुणांच्या Online System मध्ये ज्या विद्याथ्यांच बैठक क्रमांक (Additional Seat No) उपलब्ध झालेले नाहीत, अथवा विषयबदल केला आहे अशा सर्व विद्याथ्यांचे गुण प्रचलीत पद्धतीने निर्धारित तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत.


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.