शिक्षण संचालक योजना यांनी दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद सर्व यांना निर्गमित केलेल्या आदेशानुसार राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत
मुलीच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलीचे गळतीचे प्रमाण कमी करण्याकरीता व मुलीना शिक्षणाकडे आकर्षित करुन घेण्याचया दृष्टीने माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दारिद्ररेषेखालील इयत्ता ८ वी च्या मुलीसाठी ही योजना सुरु करण्यास शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२००८/३३८९२(१८१/०८)/माशि-३,दि.१८ फेब्रुवारी, २००९ अन्वये मान्यता देण्यात आली.
या योजनेबाबत लाभार्थी निवडीच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.
१) ग्रामीण भाग व क वर्ग नगरपरिषद क्षेत्रातील शाळा या ठिकाणी ही योजना लागू होती.
२) तसेच इयत्ता ७ वी मध्ये ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
३) तसेच लाभार्थी ही शासन मान्यताप्राप्त अनुदानित माध्यामक शाळेत शिक्षण घेत असावी.
४) लाभाथीची निवड करतांना दुर्गम / अतिदुर्गम ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील झोपडपटटी / गलिच्छवस्तीतील मुलीना प्राधान्य देण्यात यावे.
शासन निर्णय क्र.माविमि-२०१०/प्र.क्र.८१/का.१४१८, दि.१९ जुलै, २०११ अन्वये राज्यामध्ये मानव विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. या मिशन अंतर्गत राज्यातील २२ जिल्हयामधील १२५ तालुक्यामध्ये मुलींना मोफत सायकल वाटप योजना सुरु आहे. २२ जिल्हयामधील १२५ तालुके वगळून इतर जिल्हयामध्ये व तालुक्यामध्ये शासनास राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजने अंतर्गत पात्र होत असलेल्या आपल्या जिल्हयामधील व तालुक्यामधील शासनमान्यता प्राप्त माध्यमिक अनुदानित शाळेतील इ.८ वी ते १२ मध्ये शिक्षण घेत असलेल्या दारिद्रयरेषेखालील मुलींची माहिती तात्काळ या कार्यालयास खालील विहित नमून्यामध्ये सादर करावी. माहिती सादर करतांना उपरोक्त नमूद अटी व शर्तीचे पालन करुनच माहिती सादर करावी.
वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments