सुजाता सौनिक मुख्य सचिव
महाराष्ट्र शासन
अ.शा. पत्र क्र.:-संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३७/२४/निवडणूक-५, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय (विस्तार), मदाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२. दिनांक:-२० जानेवारी, २०२५
विषय :- राष्ट्रीय मतदार दिन म्हणून लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम साजरा करण्याबाबत.
प्रिय श्री. / श्रीम.
दिनांक २५ जानेवारी, २०२५ रोजी "राष्ट्रीय मतदार दिन" साजरा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने १८ वर्ष पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून या दिवशी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते. तथापि, दि. २५ जानेवारी, २०२५ रोजी शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे दि. २४ जानेवारी, २०२५ रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात यावी. असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. यामुळे राज्यामध्ये आपल्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सर्व अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम दि. २४ जानेवारी, २०२५ रोजी आयोजित करण्यात यावा. राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये घ्यावयाच्या शपथेचा नमूना सोबत जोडण्यात आला आहे.
आपली स्नेहांकित,
(सुजाता सौनिक)
सोबत :- वरीलप्रमाणे.
१. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव (सर्व)
२. विभागीय आयुक्त (महसूल) (सर्व)
३. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व)
राष्ट्रीय मतदार दिन, दि.२५ जानेवारी, २०२५ मतदारांसाठी प्रतिज्ञा
मराठी
"आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु."
हिंदी
"हम, भारत के नागरिक, लोकतंत्र में अपनी पूर्ण आस्था रखते हुए यह शपथ लेते हैं कि हम अपने देश की लोकतांत्रिक परम्पराओं की मर्यादा को बनाए रखेंगे तथा स्वतंत्र, निष्पक्ष एवं शांतिपूर्ण निर्वाचन की गरिमा को अक्षुण्ण रखते हुए, निर्भीक होकर, धर्म, वर्ग, जाति, समुदाय, भाषा अथवा अन्य किसी भी प्रलोभन से प्रभावित हुए बिना सभी निर्वाचनों में अपने मताधिकार का प्रयोग करेंगें"।
English
"We, the citizens of India, having abiding faith in democracy, hereby pledge to uphold the democratic traditions of our country and the dignity of free, fair and peaceful elections, and to vote in every election fearlessly and without being influenced by considerations of religion, race, caste, community, language or any inducement".
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments