Maharashtra Cyber Security Policy - महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण विकसित करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना शासन निर्णय

महाराष्ट्र राज्याच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण विकसित करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) दिनांक :- १७ जानेवारी, २०२५.


प्रस्तावना :-

भारत सरकारने राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण २०१३ आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण २०२० अवलंबिले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेची झपाट्याने झालेली वाढ, शासन, नागरिक आणि उद्योग क्षेत्रात मोठया प्रमाणात होत असलेला तंत्रज्ञानाचा वापर, एआयची वाढ तसेच सायबर क्राइमची वाढ विचारात घेता, भारत सरकारच्या वरील धोरणाच्या आधारे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण, २०२५ विकसित करण्याकरिता टास्क फोर्स तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. 

शासन निर्णय :-

महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण विकसित करण्याकरिता संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे.


संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई

अध्यक्ष

उप सचिव (मातं), सामान्य प्रशासन विभाग

सदस्य

उप सचिव, वित्त विभाग

सदस्य

उप सचिव, नियोजन विभाग

सदस्य

प्रमुख, एसइएमटी

सदस्य

डॉ. विजय पागे, संचालक, ब्रम्हा रिसर्च फाउंडेशन, मुंबई

सदस्य

श्री बर्गस कूपर, राष्ट्रीय सायबर सुरक्षा भागीदार, E&Y

सदस्य

श्री समीर रातोळीकर, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी, एचडीएफसी, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया

सदस्य

श्री मिहीर जोशी, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी, टाटा पॉवर

सदस्य

श्री जसबीर सिंग, सीईओ, सायबर सुरक्षा महिंद्रा डिफेन्स

सदस्य

डॉ. राजन वेळूकर, कुलगुरु, अॅटलस स्किलटेक विद्यापीठ, माजी कुलगुरु मुंबई विद्यापीठ

सदस्य

श्री. सुनिल गुप्ता, संस्थापक, क्युएनयु लॅब

सदस्य

संचालक, कॉर्पोरेट नियोजन, माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

विशेष निमंत्रित सदस्य

राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा कॅबिनेट सचिवालय यांचे प्रतिनिधी

विशेष निमंत्रित सदस्य

कक्ष अधिकारी (तांत्रिक)

सदस्य सचिव


१) टास्क फोर्सची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:-

अ) सायबर सुरक्षा केंद्रित पायाभूत सुविधा (उदा.CSIRT ची स्थापना), व पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यासाठी शिफारस करणे.

ब) शासकीय उद्योग व नागरिकांच्या सहभागाने राज्यस्तरीय क्षमता निर्माण करणे.

क) कौशल्य विकास आणि क्षमता निर्माण करणे.

ड) सायबर सुरक्षेच्या संशोधन व विकास कार्यक्रमास चालना देणे.

इ) उद्योग आणि स्टार्टअपला सहकार्य करणे.

ई) शासन, उद्योग, शैक्षणिक आणि ग्राहक नागरिक संस्था (उदा., हॅकाथॉन्स, कॉन्फरन्स, जागरूकता कार्यक्रम) यांच्यामध्ये व्यापक सायबर सुरक्षा क्षमता व लवचिकता निर्माण करण्यासाठी मध्यस्थी आणि कार्यक्रमांवर शिफारशी करणे.

उ) भारत सरकारच्या उपक्रमांची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणीसाठी शिफारस करणे (उदा.. सायबर स्वच्छता केंद्र, सुरक्षित भारत अभियान)

२) वरील कार्यकक्षेनुसार टास्क फोर्सने ३ महिन्यात शासनास शिफारशी सादर कराव्यात.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा साकेतांक २०२५०११७१०५०२५६१०७ असा आहे. हा आदेश डीजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(सुदाम ए. आंधळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

 

संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.