जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मधील सुधारणा २०२३ बाबत महत्वपूर्ण शासन आदेश २१/०१/२०२५

 जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मधील सुधारणा २०२३ बाबत महत्वपूर्ण शासन आदेश २१/०१/२०२५

महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग

संदर्भ:- १. भारत शासन राजपत्र दि.११ ऑगस्ट, २०२३.

२. गृह विभाग, महाराष्ट्र शासन अधिसूचना दि.१० सप्टेंबर, २०२३.

महोदय/महोदया,

उपरोक्त विषयी संदर्भिय भारत शासन राजपत्राव्दारे जन्म मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यु नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी/उप विभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. या सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारींची चौकशी करणेकरिता गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची (SIT) स्थापना करण्यात आलेली आहे. सबब उपरोक्त सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करण्यात येऊ नये, ही विनंती.


आपला,

(महेश चरूडकर) 

उप सचिव, महाराष्ट्र शासन




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.