मुख्यालय सोडण्यापूर्वी आणि नैमितीक रजा घेण्याकरिता सक्षम प्राधिका-याची पूर्व परवानगी घेणेबाबत विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ने दि ०३/०१/२०२५ रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
परिपत्रक
असे निदर्शनास आले आहे की, काही अधिकारी / कर्मचारी कार्यक्षेत्राच्या बाहेर जाण्यापूर्वी किंवा नैमितीक रजेवर जाण्यापूर्वी सक्षम प्राधिका-याची पूर्व परवानगी घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ चे नियम १० ते १२ नुसार रजा ही शासकीय कर्मचारी यांनी मंजूर झाल्यावरच त्याचा उपभोग घेणे आवश्यक असून रजा मंजूर करणारा अधिकारी जो पर्यंत रजा मंजूर करत नाही, तो पर्यंत रजेवर जाता येत नाही. म्हणून रजेवर कर्मचाऱ्यांचा हक्क नाही. रजा मंजूर झाली तरी रजेवर गेलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना रजा नियम ४६ नुसार रजवेरून परत बोलावता येते.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ चे नियम ३४ मधील तरतुद खालीलप्रमाणे आहे.
"मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, विशेष सचिव, मुख्यमंत्र्याचे सचिव, शासनाचे सचिव किंवा आपल्या वैध अधिकारांच्या मर्यादेत कर्तव्य पार पाडणारा पोलीस अधिकारी किंवा दारूबंदी व उत्पादनशुल्क आयुक्तांच्या आदेशानुसार कर्तव्य पार पाडणारा उत्पादनशुल्क अधिकारी हे खेरीजकरून कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या कार्यभारक्षेत्राच्या मर्यादेबाहेर त्याने व्यतीत केलेल्या कोणत्याही कालावधीबद्दल वेतन व भत्ते, योग्य प्राधिकाराशिवाय मिळण्याचा हक्क असणार नाही. सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजुरीने शासकीय कर्मचाऱ्याला भारतातील कोणत्याही भागामध्ये शासकीय कामासाठी जाता येईल मग तो भाग महाराष्ट्र राज्याच्या हद्दीच्या आत असो किंवा बाहेर असो आणि अशा कामावद्दल त्याला वेतन व भत्ते घेता येतील."
उपरोक्त तरतुद लक्षात घेता शासकीय कर्मचारी / अधिकारी यांनी मुख्यालय सोडण्यापूर्वी सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्यामुळे त्याचे कटाक्षाने पालन करावे.
तसेच वित्त विभागाकडील शासन निर्णय क्रमांक नैमिर-१४९८/प्र.क्र.५२/९८/सेवा-९ दिनांक २१ डिसेंबर, १९९८ शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना एका कॅलेंडर वर्षामध्ये जास्तीत जास्त ०८ नैमितीक रजा अनुज्ञेय असल्यामुळे या मर्यादेपेक्षा जास्त नैमितीक रजेची परवानगी दिली जाणार नाही याचे कटाक्षाने पालन करावे व सदर नैमितीक रजा लेख्याची नोंद अचुकरित्या ठेवण्यात यावी. आकस्मिकपणे आणि अनपेक्षित उद्भवणा-या परिस्थितीचे अपवाद वगळता नैमितीक रजेवर जाण्यापूर्वी सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.
वरीलप्रमाणे सुचनांचे पालन केले नसल्याचे आढळुन आल्यास संबंधितावर नियमानुसार पुढील आवश्यक ती कारवाई अनुसरण्यात येईल.
दिलीप गावडे
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
प्रत/-
१. सर्व जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर विभाग
२. सर्व शाखा / विभाग प्रमुख, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
३. सर्व उपविभागीय अधिकारी / सर्व तहसिलदार, छत्रपती संभाजीनगर विभाग
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments