रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस "हुतात्मा दिन" म्हणून पाळण्याबाबत शासन निर्णय

 दिनांक ३० जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस "हुतात्मा दिन" म्हणून पाळण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


परिपत्रक

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक ३० जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार यावर्षीही गुरुवार, दिनांक ३० जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा. गुरुवार, दिनांक ३० जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता पाळण्यात यावयाच्या मौन (स्तब्धता) ची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी ठिक १०.५९ पासून ११.०० वाजेपर्यन्त इशारा भोंगा वाजविण्यात येईल. सदर इशारा भोगा संपल्यानंतर सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/आस्थापना/शैक्षणिक संस्था/विद्यापीठे या मधील अधिकारी/कर्मचारी/ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे, सकाळी ठिक ११.०२ मिनिटांनी मौन (स्तब्धता) संपल्यासंबंधीचा इशारा भोगा सकाळी ठिक ११.०३ मिनिटांपर्यन्त वाजविण्यात येईल.

२. जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे सकाळी ठिक ११.०० वाजता मौन (स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते निदेश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता) पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०११५१६३३०८९००७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(सचिन र. कावळे)

 अवर सचिव, महाराष्ट्र शासन


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.