नागपूर येथे शालेय विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. प्राथमिक व माध्यमिक विभाग सतर्क झाला असून, विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचीच राहणार आहे.
क्षणिक सहलीसाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या बस भाड्याने घेण्यात येतात. विद्यार्थ्यांना सहलीला नेताना नियमांचे पालन कोणी करताना दिसत नाही. एखादी अनुचित घटना घडल्यास, त्याची जबाबदारी घ्यायला प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षक तयार होत नाहीत. सहलीला जाण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र लिहून घेताना, त्यात विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्याचीच असेल, त्याला शाळा जबाबदार राहणार नाही, असे शाळा व्यवस्थापनाकडून नमूद केले जाते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने नियमांचे परिपत्रक काढून, सुरक्षेची जबाबदारी ही मुख्याध्यापक, शिक्षकांचीच असल्याचे स्पष्ट केले.
शाळांनी या अटी व शर्तीचे पालन केले, तरच परवानगी एका वर्षात एकच शैक्षणिक सहल आयोजित करावी, विद्यार्थ्यांना सहलीसाठी सक्ती नको, विद्यार्थी व पालकांचे संमतीपत्र घ्यावे, सहभागी विद्यार्थ्यांची यादी व संपर्क क्रमांक सोबत संलग्न करावा, सहलीसाठी १० विद्यार्थ्यांसाठी एक या प्रमाणात शिक्षकांची संख्या असावी, विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांची राहील, विद्यार्थिनींचा सहभाग असल्यास महिला शिक्षिका सोबत असणे अत्यावश्यक, सहल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच नेण्यात यावी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी जादा शुल्क आकारू नये, सहल जाणाऱ्या ठिकाणी शासकीय रुग्णालयाचे संपर्क क्रमांक सोबत असावे.
शैक्षणिक सहलीला जाण्यासाठी आवश्यक प्रस्ताव कागदपत्रे पीडीएफ डाउनलोड
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments