शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक Safety and Security च्या प्रशिक्षणाबाबत MPSP मार्गदर्शक सूचना आदेश

 समग्र शिक्षांतर्गत राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक Safety and Security च्या प्रशिक्षणाबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. 




दिनांक ०१ एप्रिल, २०१० पासून राज्यात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांस सुरक्षित वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मुलांसाठी त्यांच्या घरापासून ते शाळा आणि परत घरापर्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने शालेय सुरक्षितता आणि सुरक्षिततेच्या मूलभूत निर्देशकांवर सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यावरील हिंसाचार थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक कृतींबद्दल जागरूकता मोहीम (पोक्सो कायद्याचे प्रमुख पैलू), शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व भागधारकांना (Stake Holders) यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. शाळा सुरक्षा, आपत्ती जोखीम कमी करणे, बाल संरक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, सक्षम पर्यावरण आणि मनोसामाजिक पैलू या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. त्याअनुषंगाने आवश्यक Information and Educational Communication साहित्य विकसित करण्यात येत आहे.

राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना ६३,०१० प्राथमिक शाळा आणि १,७७१ माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण ६४७८१ शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी शाळेतील तासिकांचे वेळापत्रक विचारात घेऊन दि. १५.०३.२०२५ पर्यंत Safety and Security बाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी आपणांस पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

देण्यात येणार आहे. याबाबतचा Scope of Work पुढीलप्रमाणे-

L Development and deployment of digital content

Π. WE SAFE Movement Availability of informative, activity based and engaging resources and provision of IEC material and access to training pedagogy to the relevant stakeholders.

Training of Master Trainers and in turn the relevant stakeholders (Teachers)

IV. Online dashboard for data capturing and visualization like number of training sessions, completion status and other such analytics.

V. Create a centralized repository within the online dashboard to store safety and security resources, including training materials and educational resources.

VI. Testimonials to be created by successful bidder to capture best practices during project execution. These to be created in the form of short videos showcasing the project and its impact.

VII Whole School Safety Approach to be adopted in line with guidelines developed and shared by the Department of School Education & Literacy, Ministry of Education Gol.

सबब, वरील सेवा धारकाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रशिक्षकांमार्फत मुख्याध्यापक व शिक्षक यांना Safety and Security बाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी आपणांस पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

सेवा पुरवठाधारकांना पुरवठा आदेशात नमूद केल्याप्रमाणे, मुख्याध्यापक व शिक्षक यांचेमध्ये पुढील नमूद घटकांबाबत जागरूकता निर्माण करणारे साहित्य विकसित करून उपलब्ध करून देण्यात यावे.

Rights of Children

Right to Education Act

Good/Bad touch

Disaster Management and Emergency Preparedness

Awareness about drug abuse, sexual violence, and bullying

Physical, social, and emotional security

Cyber security/safety

School infrastructure safety

Health and hygiene safety (Drinking water, sanitation, cleanliness)

Importance of nutrition

Constitution of School Safety Committee and its functions

COVID-19 precaution and preparedness

Promotion of Safe and Secure Learning environment in school 

प्रशिक्षणाबाबत आपल्या शाळेचा नियमित प्रगती अहवाल सेवा पुरवठादारामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या Tool / Tracker मध्ये अद्ययावत करावा.

२. शाळेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी ६ तास प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक राहील.

३. सदरचे प्रशिक्षण शालेय वेळेत देण्यात येणार असून त्यासाठी वेळ व प्रशिक्षणासाठी सुरक्षित ठिकाणाची माहिती प्रशिक्षकांना उपलब्ध करून देण्यात यावी. सदरचे प्रशिक्षण ताणविरहीत वातावरणात घेण्यात यावेत.

४. सर्व शाळांनी Safety Audit चे निकष पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या किमान सुरक्षिततेचे नियम पालन होईल याची दक्षता घ्यावी व सर्व विद्यार्थी सुरक्षित व तणावमुक्त वातावरणात शिकत आहेत याची खात्री करावी.

५. मुख्याध्यापकांनी वरील प्रशिक्षण विहीत वेळेत पूर्ण होईल यासाठी आवश्यक योग्य ते सहकार्य सेवा धारकामार्फत नियुक्त प्रशिक्षकांना करण्यात यावे. यामध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

६. सेवा धारकाकडून वरील प्रशिक्षणाचे व्हिडीओ शुटींग फोटोग्राफ्स घेण्यात येणार आहेत. याबाबत आवश्यक ते सहकार्य सेवा पुरवठाधारकास करण्यात यावे.

19. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुख्याध्यापक/शिक्षकांनी त्यावर स्वतःचे नांव व मोबाईल क्रमांक तसेच दिनांकित स्वाक्षरी व शिक्क्यासह प्रमाणित करून त्याची पोहोच सेवा धारकास देण्यात यावी.

4. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानतर शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात असून त्याची नोंद त्यांच्या सेवा विषयक अभिलेख्यामध्ये घेण्यात येईल.

उपरोक्त प्रमाणे नमूद केलेल्या आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण दिनांक १५/०३/२०२५ पर्यंत पूर्ण करून घेण्यात यावे.


आर विमला, 

म राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशासन), म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत: माहितीव पुढील कार्यवाहीस्तव अग्रेषित.

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद सर्व

२) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी/शिक्षण प्रमुख, महानगरपालिका, सर्व

३) मुख्याधिकारी, नगर परिषदा सर्व

४) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)

५) समन्वयक, गट/शहर साधन केंद्र (सर्व).

६) M/s.Skill Tree Consulting Ltd.


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.