NPS रक्कम PRAN खात्यावर जमा करण्याची सुधारित कार्यपद्धत वित्त विभाग शासन निर्णय 30/12/2024

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा प्रान खाती जमा करण्याबाबत सुधारीत कार्यपध्दती बाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.



प्रस्तावना

संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये राज्य शासनाने दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू केली आहे. तसेच संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.

संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये राज्य शासन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत सहभागी होईल असा निर्णय घेतला आहे. तसेच संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत स्तर-१ ची राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिताची अंमलबजावणीची कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदान जमा करण्याच्या कार्यपध्दतीच्या अनुषंगाने महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत पुढीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे -

The provision and expenditure on the government contribution to the DCPS/NPS is required to be made under the head "2071-Pension & Other Retirement Benefits, 117- Defined Contribution Pension Scheme."

महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत उपरोक्तप्रमाणे नोंदविलेले निरीक्षण व संदर्भ क्र.५ येथील केंद शासनाच्या ज्ञापनास अनुसरुन नियोक्त्याच्या / शासनाच्या अंशदानाची रक्कम वेतनाच्या लेखाशीर्षाखाली खर्च न होता -2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme" या लेखाशीर्षामधून खर्च करण्यासंदर्भातील कार्यपध्दतीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन परिपत्रक :

महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत नोंदविलेल्या निरीक्षण व केंद्र शासनाचे दि.०२.०९.२००८ च्या ज्ञापनास अनुसरुन संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयामधील कार्यपध्दतीमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.

१. राज्य शासकीय सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत -

१.१ आहरण व संवितरण अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही -

१.१.१ आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन देयकामधून दरमहा केवळ कर्मचाऱ्याच्या अंशदानाची वसूली (मूळ वेतन + महागाई वेतन (असल्यास) + महागाई भत्ता या रकमेच्या १०%) करण्यात यावी. यामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश नसावा.

१.१.२ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांची वेतन देयके स्वतंत्रपणे तयार करुन ती प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेपर्यंत अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात यावीत.

१.१.३ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीखाली वजाती होणारी अधिकारी / कर्मचारी यांच्या अंशदानाची रक्कम खाली दर्शविल्याप्रमाणे संबंधित योजना सांकेतांकामध्ये प्रवर्गनिहाय जमा म्हणून दर्शविण्यात यावी.


१.१.४ कर्मचाऱ्याच्या मासिक अंशदानाची रक्कम व तपशील दर्शविणारी आवश्यक ती अनुसूची (Schedule) वेतन देयकासोबत जोडण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील.

१.१.५ राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या अंशदानाच्या वजावटी महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम २५९ (१) नुसार वेतन देयकाच्या दर्शनी भागावर कोषागार वजाती म्हणून दर्शविण्यात याव्यात.

१.१.६ नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाचे अधिकारी / कर्मचारी यांचे Projected Employer Contribution Schedule वेतन देयकासोबत तयार होईल. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरच्या अनुसूचीतील नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाच्या रकमेची परिगणना तपासून प्रमाणित करावी व सदरचे Schedule वेतन देयकासोबत जोडावे.

१.१.७ आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची नियमित वेतन देयके सेवार्थ प्रणालीमध्ये तयार करताना, कर्मचाऱ्यांच्या १०% तसेच नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाच्य रकमा Auto-calculate होतील. तथापि, Pay Arrears / DA Arrears / Pay Arrears Difference / DA Arrears Difference ची थकबाकीची देयके तयार करताना, कर्मचाऱ्यांच्या १०% तसेच नियोक्ता शासनाच्या १४% अंशदानाच्या रक्कमेची आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिगणना करुन ती रक्कम सेवार्थ प्रणालीमध्ये (Manually) भरावी.

१.१.८ आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या आयकराची परिगणना करताना, नियोक्ता / शासनाच्या अंशदानाची १४% रक्कम वेतनाच्या स्थूल रकमेमध्ये दर्शविण्यात यावी. याबाबतची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील. नियोक्ता / शासनाच्या अंशदानाची अधिकारी कर्मचारी निहाय यादी सेवार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध असेल.

१.२ अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी करावयाची कार्यवाही

१.२.१ अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत सामील असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या वेत्तन देयकामधून केवळ कर्मचाऱ्याच्या अंशदानाची वसूली संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांचेमार्फत करण्यात आली असेल तरच वेतन देयके पारित करण्यात यावीत अन्यथा नाकारण्यात यावीत. वेतन देयकामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश असणार नाही याची खातरजमा करण्यात यावी. तद्नंतरच राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांची प्राप्त वेतन देयके प्राधान्याने पारित करुन प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत प्रमाणक क्रमांक (Voucher No.) संस्करीत करावेत.

१.२.२ अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन देयकास प्रमाणक क्रमांक संस्करीत झाल्यानंतर, अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी नियोक्त्याच्या अंशदानाच्या रक्कमा आहरित करण्याकरिता म. को.नि. साधी पावती नमुना ४५-अ निरंक रक्कमेची (Nil Bill) महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता स्वतंत्र देयके सेवार्थ प्रणालीमध्ये Auto- generate स्वरुपात तयार करावीत.

१.२.३ नियोक्त्याच्या अंशदानाच्या रक्कमा आहरीत करण्याकरिता, महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचेकरिता "2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme (2071 0651)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी यांचेकरिता ८३४२५३६६, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी यांचेकरिता ८३४२५०२६, भारतीय वन सेवेतील अधिकारी यांचेकरिता ८३४२५३७५ या लेखाशीर्षाखाली जमा दर्शविण्यात यावी. तसेच राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता 2071-Pension & Other Retirement Benefits, 117- Defined Contribution Pension Scheme (2071 0642)" या लेखाशीर्षांखाली खर्ची टाकून ८३४२५०९९ या लेखाशीर्षाखाली जमा दर्शविण्यात यावी.

१.२.४ वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. रानियो-२०२३/प्र.क्र.६४/सेवा-४, दि.०४.१२.२०२३ सोबतच्या विवरणपत्रामधील मुद्दा क्र.३.१ मध्ये "प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला SCF तयार करून NPS प्रणालीवर अपलोड करावी. मासिक अंशदानाची रक्कम SCF तयार करुन NPS प्रणालीवर अपलोड झाल्याच्या दिनांकापासून ७ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत विश्वस्त बैंकेकडे (Trustee Bank) वर्ग करावी" असे नमूद आहे. तथापि, नियोक्त्याच्या अंशदानाच्या रकमा आहरित करण्याकरिता निरंक देयक तयार करुन पारित करण्याचा कालावधी लक्षात घेता, अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयातून नियोक्त्याच्या अंशदानाचे निरंक रकमेचे देयक पारित झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला कर्मचाऱ्याचे अंशदान व नियोक्त्याचे अंशदान संदर्भात Subscriber Contribution File (SCF) तयार करुन CRA-NPSCAN प्रणालीमध्ये अपलोड (Upload) करावी व व्यवहार क्रमांक (Transaction ID) प्राप्त करुन घ्यावा,

१.२.५ अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी "८३४२-Other Deposits-००-११७- Defined Contribution Pension Scheme" या लेखाशीर्षाखाली कर्मचाऱ्याच्या व नियोक्त्याच्या अंशदानाच्या जमा रकमा आहरित करण्याकरिता ८३४२०१३२ या मुख्य लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून साधी पावती म.को.नि. नमुना ४५-अ मध्ये देयक सादर करावे.

१.२.६ सदर देयकाद्वारे आहरित करण्यात आलेली मासिक अंशदानाची रक्कम, Subscriber Contribution File (SCF) CRA-NPSCAN प्रणालीमध्ये अपलोड (Upload) झाल्याच्या दिनांकापासून ७ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत विश्वस्त बँकेकडे (Trustee Bank) वर्ग करण्यात यावी.


२. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत

प्रतिनियुक्तीवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत मासिक अंशदानाची वसुली व सदर वसूलीची रक्कम जमा करण्याबाबत शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: अंनियो-२०१५/(NPS)/ प्र.क्र.३२/सेवा-४, दि.०६.०४.२००५ नुसार विहित कार्यपध्दती लागू राहील.

3. हे शासन निर्णय जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफरांसह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी.

४. उपरोक्त कार्यपध्दती कोषागार कार्यालय, वाशिम अंतर्गत सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून दि.१५.०२.२०२५ पासून सेवार्थ प्रणालीत तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पुरक देयकांसंदर्भात नियोक्त्याच्या / शासनाच्या अंशदानाची रक्कम 2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme या लेखाशीर्षांमधून खर्च करण्यासंदर्भातील सुधारीत प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात येत आहे. दि.१५.०३.२०२५ पासून सेवार्थ प्रणालीत तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पुरक देयकांसंदर्भात नियोक्त्याच्या / शासनाच्या अंशदानाची रक्कम 2071-Pension & Other Retirement Benefits. 117-Defined Contribution Pension Scheme या लेखाशीर्षांमधून खर्च करण्यासंदर्भातील सुधारीत कार्यपध्दती सर्व कोषागार कार्यालयांच्या स्तरावर चालू करण्यात येईल.

५. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४१२३०१२०५४१६६०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(मनिषा यु.कामटे)

 शासनाचे उप सचिव


संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.