डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे शासनादेश निर्गमित केला आहे.
शासन परिपत्रकः
शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय /निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी "अनंत चतुर्दशी" या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२४ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.
सुट्टीचा दिवस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
इंग्रजी तारीख
०६ डिसेंबर, २०२४
भारतीय सौर दिनांक
१५ मार्गशीर्ष शके १९४६
वार
शुक्रवार
२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/II/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२०४१११८२६७३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(सचिन र. कावळे)
अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग
वरील आदेशानुसार फक्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments