-: महत्वाच्या सुचना :-
१) मतदान केन्द्रावर वयोवृध्द, गरोधर त्रिया, कडेवर लहान मुले असलेल्या माता, अपंग यांना प्रथम प्राधान्य दयावे. त्यांचेकरीता स्वतंत्र रांगा लावा.
२) (५.६) प्रदत्त (टेंडर मत): एखादे वेळी एखादया मतदारा ऐवजी दुसरा मतदान करुन गेल्यास आलेलया ख-या मतदाराची ओळख पटवून त्यांना टेंडर बॅलेट पेपर देऊन, बाण फुलीव्दारे मतदान करुन देणे. त्याला मशीनवर मतदान करु देडु नये. सदर मतपत्रीका लिफाफा बंद असेल. सदर मतदाराची कोणतीही नोंद १७A, मतदार नोंदवहीमध्ये घेवू नये. ती १७ B मध्ये घ्यावी.
३) (५.७) आक्षेपीत मते :- एखादया मतदारावर खोटा मतदार आहे असा मतदार प्रतिनीधी यांनी आक्षेप घेतल्यास आक्षेपकर्त्याकडून रुपये २/- ची पावती फाडून, आक्षेपाची पडताळणी करावी. आक्षेप खरा असल्यास मतदारास पोलीसांच्या ताब्यात दयावे व आक्षेप करणा- यास रुपये २/- परत करावे. आक्षेप खोटा आढळुन आल्यास रुपये दोन जप्त करुन मतदारास मतदान करु दयावे.
४) ASD मतदाराबाबतीत त्याचे अंगठ्याचे ठसासह स्वाक्षरी घ्यावी.
५) मतदान करण्यास नकार मतदानाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर मतदान करण्यास नकार दिल्यास त्याला नोटावर मतदान करण्यास सांगावे. जबरदस्ती करु नये जर त्यांने तसेही केले नाही तर मतदार नोंद वहीत शेरा रकान्यात तशी नोंद घेऊन केद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करावी. व पुढच्या मतदारास मतदान करण्याची कार्यवाही करावी. आणी तो शेवटचा मतदार असेल तर CU बंद करावा. त्यांनतर VWPAT वेगळा (DISCONNECT) करा, YWPAT KNOB आडवा करा. नंतर CU सरु करुन CLOSE बटन बंद करा.
६) (५.९) चाचणी मत (४९ MA): जर मतदाराने केलेले मतदान VVPAT प्रिंट मध्ये भिन्न आहे अशी तक्रार केल्यास केन्द्र अध्यक्ष व प्रतिनीधी यांच्या समक्ष पुन्हा त्या मतदाराला एक चाचणी मतदान करण्यास सांगावे. व खात्री करावी. त्यापुर्वी मतदाराकडून प्रतिज्ञापत्र भरुन घ्यावे. सदर बाब खोटी ठरलयास सहा महिने कारावास व दंडाची शिक्षा आहे. याबाबत त्याला जाणिव करुन दयावी. सदर बाब खरी ठरल्यास तात्काळ मतदान थांबवून निवडणुक निर्णय अधिकारी यांना कळवावे. व नविन संच जोडुन मॉक पोल घेऊन क्षेत्रीय अधिकारी यांच्या समक्ष मतदान सुरु करावे. सदर बाब खोटी ठरल्यास १७ मध्ये त्याचे दुस-यांदा नोंदविलेल्या नावापुढे ज्या उमेदवाराला चाचणी मतदान केले त्याचे नांव व अनुक्रमांकची नोंद नोंदऊन मतदाराची सही / अंगठा घ्यावा. तसे सदर नोंद १७८ अनुक्रमांक पाच मध्ये घ्यावी.
१) वाहतुकीचे वेळी VVPAT KNOB आडवा असावा.
२) MOCK POLL झाल्यानंतर C-R-C Clean करा TOTAL = O चेक करा.
३) DROP BOX रिकामा असावा (MOCK POLL चिठ्या रबरी शिक्का मारुनच काळ्या लिफाफ्यात ठेवा.
४) यंत्राला लावण्यात येणा-या प्रत्येक सिलवर मागील बाजुस प्रतिनिधींच्या स्वाक्ष-या घेणे. मतदान सुरू झाल्यानंतर मध्ये पुर्ण संच बदल करण्याची गरज पडल्यास नविन मशिनवर केवळ प्रति उमेदवार १ याप्रमाणे मतदान नोंदवून MOCK POLL घेणे आवश्यक आहे. केवळ VVPAT बदल केल्यास MOCK POLL ची आवश्यकता नाही.
५) केंद्राध्यक्ष यांनी प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापुर्वी न विसरता CU मधील MOCK POLL मतदानाची सर्व माहिती पुसून टाकली आहे (CLEAR केली) आणि WPAT च्या DROP BOX मधील सर्व चिठठ्या काढून खात्री करून, दाखवून सिल करणे हि महत्वाची पायरी आहे.
६) अभिरूप मतदानानंतर सिलींगचे वेळी CU वरील CLOSE बटन दबणार / दाबणार नाही (अशावेळी मागील स्विच OFF करावा.)
७) मशिन सिलींग झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदाराचे मतदानापुर्वी TOTAL = O असावी.
८) परंतू प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यानंतर CU/BU काम करीत नसेल तर संपूर्ण संच बदलावा. आणि VVPAT बंद पडल्यास फक्त VWPAT बदलावा.
९) MOCK POLL पर्यंत जे युनिट काम करत नाही ते बदलावा.
१०) उमेदवार, प्रतिनिधी किंवा इतर बिल्ले चिन्हे केंद्रामध्ये प्रतिबंध.
११) गंभीर घटना, Mock Poll व EVM सिलींग चे आवश्यक वेळी Recording करणे.
१२) गुप्ततेबाबत तडजोड नाही.
१३) Video / web camera मतदान कक्षामधील रेकॉर्डींग होणार नाही दखल घ्यावी.
१४) अंगठा / पक्की शाई तर्जनी तेलकट असल्यास ओलया कपड्याने पुसून काढा.
१५) मतदान प्रतिनिधी मोबाईल / इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्रतिबंध, आतिल छायाचित्र प्रतिबंध, बाहेरील रांगेचे घेवू शकतो.
१६) भेट नोंदवही मतदान केंद्रावर आयोगामार्फत नेमून दिलेल्या व्यक्तींनी भेट दिल्यास नोंदवा.
१७) मतदान केंद्रात प्रवेश निर्देशपुस्तिका २.८ मध्ये नमुद नुसार अतिरीक्त इतर कोणालाही प्रवेश नाही.
१८) EPIC (मतदान ओळखपत्र) व आयोगाने निश्चित केलेले ओळखपत्राशिवाय कोणालाही मतदान करू देवू नये.
१९) मतदान संपल्यावर खात्री करून CLOSE बटन दाबा.
२०) तुम्ही EDC धारक असाल तर तुमचे स्वतःचे पण मतदान त्याच केंद्राचे मशिनवर करा.
२१) EDC धारकाचा, चिन्हांकित यादीच्या शेवटच्या मतदाराच्या अनुक्रमांकानंतर, क्रमांक नोंदवून नांव, यादी भाग क्र / यादीतील अ.क्र. इत्यादी नोंद घेवून सामान्य मतदाराप्रमाणे मतदान करून घ्यावे.
२२) मतदानाची टक्केवारी ही चिन्हांकित यादीतील एकुण मुळ मतदार संख्येचे आधारे कळविण्यात यावी.
२३) यादीमध्ये मतदाराचे नावापुढे "PB" अशी नोंद असल्यास त्याला मतदान करू देवू नये.
मतदान प्रक्रिया घेत असताना वेगवेगळ्या समस्या येतात त्या समस्या वर काय उपाय करावे सविस्तर..
1] संपूर्ण E.V.M. युनिट योग्य रितीने काम करत नाही VVPAT मशीन खराब झाली / CU, BU खराब झाली VVPAT / CU ची बॅटरी खराब झाली.
[ BVC हा क्रम लक्षात ठेवा ]
2] मतदाराने VV PAT पेपर स्लीप चुकीची असल्याची तक्रार केल्यास - नियम 49MA
1] संबंधित मतदाराचे विहीत नमुन्यात घोषणापत्र घ्यावे. जोडपत्र 17 भरा
2] मतदान केंद्राध्यक्षाने मतदार नोंदवही फॉर्म 17A मध्ये संबंधित मतदाराची दुबार नोंदणी करावी
3] मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांच्या उअपस्थितीत संबंधित मतदाराला चाचणी मत - Test Vote नोंदवण्यास सांगावे.
4] मतदाराचा आक्षेप खरा असेल तर मतदान थांबवावे व झोनल ऑफिसर शी संपर्क साधावा
5] मतदाराचा आक्षेप खोटा सिध्द झाला तर मतदार नोंदवही फॉर्म 17A मध्ये Test Vote नोंदवलेल्या उमेदवाराचा नाव व मतदाराचे नाव व त्याचा अनुक्रमांक यांची नोंद घ्यावी
6] संबंधित मतदाराची शेरा रकान्यात सही घ्यावी
7] फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मताचा हिशोब Part-1 मध्ये Test Vote ची नोंद घ्यावी. या मताची नोंद नियम 49MA (D) अन्वये फॉर्म 17C अनुक्रमांक - 5 मध्ये घ्यावी 8] संबंधित मतदाराला पोलिसाच्या स्वाधिन करावे.
3] आक्षेपित मत / Challenge Vote
(जोडपत्र -7 मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी च्या अनुक्रमांक 12 मध्ये माहिती भरावी)
1] मतदान प्रतिनिधिने मतदाराच्या ओळखीला आव्हान दिले तर---
2] सदर मतदान प्रतिनिधि कडून रु.2/- अनामत रक्कम भरुन घ्यावी (जोडपत्र 19 भरावे) 3] मतदान केंद्राध्यक्षाने आव्हान दिलेल्या मतदाराला त्याच्या ओळखीचा योग्य तो पुरावा देवून स्वतःला मी तोच आहे हे सिध्द करण्यास सांगावे
4] चौकशीनंतर मतदार खरा असल्याचे निष्पन्न झाल्यास मतदाराला मतदान करू द्यावे व मतदान प्रतिनिधिची अनामत रक्कम जप्त करावी
5] आक्षेप जर खरा झाला व सदर मतदार तोतया मतदार असल्याचे सिध्द झाले तर सदर व्यक्तीस मतदान करू देवू नये दिलेल्या नमुन्यात त्या मतदाराची लेखी तक्रार देवून पोलिसाच्या स्वाधिन करावे. मतदान प्रतिनिधिची अनामत रक्कम परत करावी (जोडपत्र 20 भरा)
4] प्रदत्त मत / Tender Vote
1] जर एखादी व्यक्ती मतदानासाठी मतदान केंद्रावर आली आहे व त्या व्यक्तीच्या नावावर अगोदरच कोणत्यातरी भलत्याच व्यक्तीने मतदान करून गेल्याची खात्री झाल्यास सदर मतदाराला त्याच्या ओळखीचा पुरावा सादर करण्यास सांगावे. जर त्याने सादर केलेला पुरावा योग्य असेल तर त्याला मतदान करू द्यावे पण सदर मतदान प्रदत्त मतपत्रिकेवर करु द्यावे मतदार यंत्रावर नाही
2] अशा प्रदत्त मताची नोंद फॉर्म 17B व फॉर्म 17C Part-1 मध्ये घ्यावी (फॉर्म 17C अनुक्रमांक - 9)
3] जर तुमच्या मतदान केंद्रात प्रदत्त मतदान झाले असेल तर अशा प्रदत्त मतदारांची संपूर्ण नोंद तुम्हाला फॉर्म 17B मध्ये ठेवायची आहे. तुम्ही मतदारांना प्रदत्त मतपत्रिका देण्याआधी त्या फॉर्मच्या स्तंभ -5 मध्ये
त्या मतदारांची सही अथवा अंगठ्याचा ठसा घ्यावा
4] सदर मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देतेवेळी शाई लावलेला बाणाकृती रबरी स्टँप द्यावा सदर मतदार मतदान कक्षात जावून त्याच्या पसंतीच्या उमेदवारच्या निशाणिवर रबरी स्टॅपने बाणाकृती क्रॉसची खूण करेल व नंतर घडी घालून मतदान केंद्राध्यक्षाला देईल
5] सदर प्रदत्त मतपत्रिका मतदान केंद्राध्यक्षाने प्रदत्त मतपत्रिकांची यादी फॉर्म 17B
च्या पाकीटात घाला [ प्रदत्त मतपत्रिका उघडून पाहू नका। मतदान बंद झाल्यावर पाकीट सीलबंद करा
6] मिळालेल्या मतपत्रिका, मतदारांना देण्यात आलेल्या मतपत्रिका व न वापरता परत केलेल्या मतपत्रिका या सर्व मतपत्रिकेचा बिनचूक हिशोब फॉर्म 17C च्या भाग 1 च्या अनुक्रमांक 9 मध्ये ठेवायची आहे. 7] मतदारांची नोंदवही 17A मध्ये प्रदत्त मतांच्या संदर्भात कोणतिही नोंद ठेवायची नाही.
5] ASD मधिल मतदार आल्यास काय करावे ?
1] मतदार यादीच्या चिन्हांकीत यादीसोबत जोडपत्र 13A नुसार ASD मतदार यादी (Absent, Shifted, Dead अनुपस्थित, स्थलांतरीत, मयत) मतदार यादी पुरवण्यात येते. अशा मतदारांची निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ओळखिच्या पुराव्याच्या आधारे कसून तपासणी करुन ओळख पटवावी.
2] अशा मतदारांचे मतदान केंद्राध्यक्षाने जोडपत्र 14 मध्ये घोषणापत्र भरुन घ्यावे. अशा मतदाराबाबत दुसरा मतदान अधिकारी कडील मतदार नोंदवही 17 अ / 17A मध्ये सही सोबत अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा.
3] जर असा मतदार अंध अपंग असेल तर सोबती घेण्याची परवानगी द्यावी. व अंध व दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र जोडपत्र 18 भरुन घ्यावे. सोबत्याला उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावावी. उजव्या हाताच्या तर्जनीवर आधिपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
4] जर सोबती मतदान कक्षापर्यंत गेला असेल तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये घेवू नये. पण जर मतदाराने सोबत्याच्या मदतीने मतदान केले तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये करावी.
6] प्रॉक्सी मतदार / बदली मतदार / CSV Voter आल्यास काय करावे ?---
@ CSV Voter म्हणजे Classfied Service Voter / वर्गीकृत सेवा मतदाता / प्रॉक्सी मतदार / बदली मतदार
@ संबंधित मतदान केंद्रावर असे मतदार असल्यास CSV मतदारांची स्वतंत्र यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून पुरवली जाते.
@ CSV यादीमध्ये स्वतंत्र मतदारांचे अनुक्रमांक नोंदवलेले असतात. त्यात proxy voter चे नाव नमुद केलेले असते
1] प्रॉक्सी मतदान म्हणजेच बदली मतदान प्रॉक्सी मतदार आल्यास मतदार नोंदवहीच्या नमुना 17-अ च्या दुसऱ्या स्तंभात नोंदायचा व वर्गीकृत मतदाराच्या पोटयादीचा अनुक्रमांक । समोर दर्शवण्यात आले असेल तर नमुना 17-अ च्या स्तंभ 2 मध्ये नोंद करायचा अनुक्रमांक 1 [ पीव्ही] असा असेल. प्रॉक्सी 1 'बम' किंवा [ पीव्ही] अशी अक्षरे कंसात लिहावित
2] मतदाराची सही अथवा अंगठा चा ठसा घेईल अंध अपंग मतदार जर अंगठा किंवा स्वाक्षरी करु शकत नसेल तर त्याच्या जोडीदाराची सही अंगठा घ्यावा
3] प्रॉक्सी / बदली मतदार असेल तर त्याच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावावी. नसेल तर इतर कोणत्याही बोटाला. डावा हात नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनिला. उजवी तर्जनी नसेल तर कोणत्याही बोटाला. दोन्ही हात नसेल तर जे बोटाचे पेर असेल त्याला पक्की शाई लावावी
7] निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र / ईडीसी मतदार असेल तर काय करावे --?
1] ज्या निवडणूक कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मतदार संघात म्हणजे जेथे मतदार म्हणून ज्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यात आले आहे अशा ठिकाणी नियुक्ती दिली असेल त्याच्या व्यतिरिक्त इतरत्र म्हणजे त्यांची नेमणूक ज्या मतदार केंद्रावर झाली आहे त्या मतदान केंद्रावर ते मतदान करू शकतात
2] अशा मतदारांचे मतदान हे मतदान यंत्रावर घेण्यात यावे.
3] असे EDC मतदार आले तर अशा मतदारांकडून EDC चे मूळ प्रमाणपत्र मतदान अधिकारी 1 यांच्याकडे जमा करावेत. नमुना 12B निवडणुक कार्य प्रमाणपत्र
4] मतदार यादीच्या चिन्हांकित यादीमध्ये शेवटच्या अनुक्रमांकानंतर अशा मतदारांची नोंद घ्यावी.
5] अशा मतदारांनी शक्यतो मतदान प्रतिनिधी उपस्थित असताना मतदान करावे.
6] मतदारांची नोंदवही 17A मध्ये सदर मतदाराचा त्याचा मूळ मतदार यादीतील अनुक्रमांक / भाग क्रमांक /
मतदारसंघाचा क्रमांक व नाव अशा रितीने नोंद करावी.
उदा. 997/176/141 gav
7] मतदारांची नोंदवही 17A च्या शेवटाच्या रकान्यात EDC मतदार अशी नोंद करतील
8] मतदान केंद्राध्यक्षाने सर्व EDC प्रमाणपत्र स्वतंत्र पाकिटात टाकून साहित्य स्विकृती कक्षात जमा करावेत.
9] मतदान केंद्राध्यक्षांनी केंद्राध्यक्ष दैनंदिनी मध्ये अनुक्रमांक 13 मध्ये किती जणांनी EDC द्वारे मतदान केले आहे याची नंद ठेवावी.
10] नमुना 17C : भाग 1 अनुक्रमांक 1 मध्ये त्या मतदार यादी भागातील मतदार + EDC द्वारे मतदान केलेले मतदार अशी एकूण मतदारांची संख्या दाखवावी. उदा.
फॉर्म 17C
नोंद झालेल्या मतांचा हिशोब
1| मतदार केंद्राशी सलग्न मतदारांची एकूण संख्या 715710+EDC 51
8] अंध/अपंग मतदार आल्यास काय करावे ---?
1] मतदार अंध अपंग असेल तर सोबती घेण्याची परवानगी द्यावी. व अंध व दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र जोडपत्र 18 भरुन घ्यावे. सोबत्याला उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावावी.
2] उजव्या हाताच्या तर्जनीवर आधिपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
3] जर सोबती मतदान कक्षापर्यंत गेला असेल तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये घेवू नये. पण जर मतदाराने सोबत्याच्या मदतीने मतदान केले तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये करावी.
9] मतदान करायला नकार दिलेले मतदार याबाबतीत करायची कारवाई -:
1] एखादा मतदार मतदान चिट्ठी मतदान अधिकारी 3 यांच्याकडे देईल पण मतदान करायला नकार देईल. अशा वेळेस त्याला मतदान करण्यासाठी विनंती करावी पण तरिही जर तो मतदान करायला तयार नसेल तर ही बाब मतदान केंद्राध्यक्ष व अमतदान अधिकारी-2 याच्या लक्षात आणून द्यावी. 2] मतदाराला मत देण्यास प्रवृत्त करावे नोटा बद्दल माहिती द्यावी
3] मतदाराचा नकार कायम राहिल्यास मतदार नोंदवही 17 अ / 17A मध्ये 'मतदानास नकार' असा शेरा लिहून
केंद्राध्यक्षाने सही करावी
4] जर मतदार कंट्रोल युनिटवरील उचीत बटन दाबुन मतदान युनिट सुरू केल्यावर जर मतदानास नकार देत असेल तर अशा वेळेस वरील प्रक्रिया पूर्ण करुन त्या मतदारास जावू द्यावे व युनिट वरील उचीत बटन दाबुन मतदान युनिट तसेच ठेवून ते पुढील मतदारासाठी वापरावे
5] शेवटचा मतदार अशा रितिने मतदानास नकार देणार नाही याची मात्र काळजी घ्यावी कारण एकदा दिलेली कमांड फ़क्त CU चे बटण ऑन-ऑफ करुनच निष्क्रिय करता येते पण जर CU चे बटण ऑन-ऑफ केले तर VV PAT ची स्वयंनिर्मित 7 पेपर स्लीप लगेच ड्रॉपबॉक्स मध्ये तयार होतात त्यामुळे शेवटच्या मतदाराचे मत इ.व्ही.एम मशिन मध्येच झाले पाहिजे याची काळजी घ्यावी
(तरीही असा प्रसंग घडलाच तर CU चे बटण बंद करा. VVPAT ला लावलेली CU ची केबल VVPAT पासून अलग करा. BU ला लावलेली VVPAT ची केबल BU पासून अलग करा. CU चे बटण चालू करा. आता तुम्हाला लाल रंगाचा Busy दिवा दिसणार नाही. मतदानास नकार देणारा हा शेवटचा मतदार असल्याने तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे CU वरील Total Button दाबून एकूण मतांच्या संख्येची नोंद घ्या. 17C मध्ये
अनुक्रमांक 6 वर व केंद्राध्यक्षांची दैनंदिनी मध्ये अनुक्रमांक 10(4) वर व इतर आवश्यक ठिकाणी मतांच्या संख्येची नोंद घ्या.
6] CLOSE बटण दाबून मतदान बंद करा व पुढील कामे करायला घ्या.
7] फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब Part-1 मध्ये नियम 49-0 अंतर्गत "मत न नोंदवण्याचे ठरवलेल्या मतदारांची संख्या यात नोंद करावी.
10] मतदाराने सही / अंगठा देण्यास नकार दिला तर -
जर एखाद्या मतदाराने सही देण्यास किंवा अंगठा उमटवण्यास नकार दिला तर अशा मतदाराला मतदान करण्याची परवानगी देवू नये. मतदाराला सही / अंगठा देण्यास प्रवृत्त करावे मतदाराचा नकार कायम राहिल्यास शेरा रकान्यात "स्वाक्षरी / अंगठ्याचा ठसा देण्यास नकार - मतदानास परवानगी दिली नाही." अशी नोंद करुन मतदान केंद्राध्यक्षाने सही करावी. फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब भाग 1 नियम 49-ड/49-D अंतर्गत "मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदारांची संख्या" यात नोंद करावी
11] मतदाराने मतदान केल्या नंतर पेपर स्लीप प्रिंट झाली नाही किंवा प्रिंट झालेली पेपर स्लीप कट झाली नाही -:
1] CU चा Busy Lamp बंद झालेला असल्यास व कोणतीही Error न दाखवल्यास काही करायचे नाही.
2] CU चा Busy Lamp व VVPAT चा पांढरा LED चालू असल्यास व कोणतिही Error न दाखवल्यास CU बंद करून VVPAT बदलण्यात यावे.
3] प्रिंटेड पेपर स्लीप कापली गेली नसेल व लोंबकळत असेल तर ती ड्रॉप बॉक्स मध्ये पडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करु नये. अशी स्लीप लोंबकळलेल्या स्थितीत राहू द्यावी. कारण अशा परिस्थितीत कंट्रोल युनिट मध्ये मत नोंदवले जात नाही. व या लोंबकळलेल्या पेपर स्लीपची मत मोजणिसाठी आवश्यकता भासत नाही अशा वेळी ती हँगिंग स्लीप ड्रॉप बॉक्स मध्ये पाडण्याचा कोणताही प्रयत्न करू नये.
4] मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीत वरील घटनेची नोंद घेण्यात यावी.
अ] घटना घडल्याचा दिनांक व वेळ
ब] VVPAT बदलल्यानंतर मतदान करु दिलेल्या त्या शेवटच्या मतदाराचे मतदार यादीतील नाव व अनुक्रमांक
क] VVPAT बदलल्यानंतर मतदाराने मतदान केले का ? किंवा मत न देता परत गेला का? हे डायरीत नमुद करा
ड) घटनेपूर्वी झालेले एकूण मतदान
मतदान घेण्यासाठी मतदान केंद्रावर एकूण चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते त्यापैकी एक मतदान केंद्राध्यक्ष असतो तर उरलेले मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन असे असतात अर्थात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणे ही सामूहिक जबाबदारी असते परंतु तरीदेखील प्रत्येक मतदान अधिकाऱ्याला त्याची कामे ठरवून दिलेली असतात.
मतदान अधिकारी क्रमांक तीन ची कार्य
3 रा मतदान अधिकारी यांचे कार्य
2) तिसरा मतदान अधिकारी - कंट्रोल युनिट चा प्रभारी कोणते दस्तावेज असतील? कंट्रोल युनिट, मतदाराच्या मतदार चिट्ठया
1] मतदाराने आणलेली [दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडून चिठ्ठी जमा करुन घ्यावी ज्या क्रमाने मतदान अधिकारी 2 यांनी मतदार चिट्ठी दिली आहे त्याच क्रमाने मतदाराला मतदान कक्षात प्रवेश द्यावा. मतदाराने आणलेली [दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडून] चिड्डी जमा करुन घ्यावी
2] कंट्रोल युनिटवरील उचीत बटन दाबुन मतदान युनिट सुरू करेल
3] मतदाराच्या तर्जनिवरील शाई तपासुन मतदान कक्षात जाण्याची परवानगी देईल
4] 'बीप' आवाजाकडे लक्ष ठेवेल. 'बीप' आवाज आल्यावर व कंट्रोल युनिटवरील लाल दिवा बंद झाला आहे याची खात्री करून नंतरच मतदाराला बाहेर जाऊ देईल.
5] कोणताही मतदार मत न नोंदवता परस्पर निघून जाणार नाही याकडे बारकाईने लक्ष ठेवायचे आहे. बीप आवाज येणे व लाल दिवा बंद होणे आवश्यक आहे. त्याशिवाय मतदार बाहेर जाणार नाही याची खूप काळजी घ्यावी.
6] मतदाराने आणलेल्या मतदान चिठ्ठया निट सांभाळून एका प्लॅस्टीक च्या बॅग मध्ये ठेवेल व पन्नास पन्नास विड्यांचे व्यवस्थित बंच बनवून त्याला स्टॅपलर ने पीन करुन / रबर लावून ठेवेल
मतदान करायला नकार दिलेले मतदार याबाबतीत करायची कारवाई -:
1] एखादा मतदार मतदान चिट्ठी मतदान अधिकारी -3 यांच्याकडे देईल पण मतदान करायला
नकार देईल. अशा वेळेस त्याला मतदान करण्यासाठी विनंती करावी पण तरिही जर तो मतदान करायला तयार नसेल तर ही बाब मतदान केंद्राध्यक्ष व अमतदान अधिकारी-2 याच्या लक्षात आणून द्यावी.
2] मतदाराला मत देण्यास प्रवृत्त करावे नोटा बद्दल माहिती द्यावी
3] मतदाराचा नकार कायम राहिल्यास मतदार नोंदवही 17 अ / 17A मध्ये 'मतदानास नकार' असा शेरा लिहून केंद्राध्यक्षाने सही करावी
4] जर मतदार कंट्रोल युनिटवरील उत्चीत बटन दाबुन मतदान युनिट सुरू केल्यावर जर मतदानास नकार देत असेल तर अशा वेळेस वरील प्रक्रिया पुर्ण करुन त्या मतदारास जावू द्यावे व युनिट वरील उचीत बटन दाबुन मतदान युनिट तसेच ठेवून ते पुढील मतदारासाठी वापरावे
5] शेवटचा मतदार अशा रितिने मतदानास नकार देणार नाही याची मात्र काळजी घ्यावी कारण एकदा दिलेली कमांड फक्त CU चे बटण ऑन-ऑफ करुनच निष्क्रिय करता येते पण जर CU चे बटण ऑन-ऑफ केले तर VV PAT ची स्वयंनिर्मित 7 पेपर स्लीप लगेच ड्रॉपबॉक्स मध्ये तयार होतात त्यामुळे शेवटच्या मतदाराचे मत इ. व्ही. एम मशिन मध्येच झाले पाहिजे याची काळजी घ्यावी (तरीही असा प्रसंग घडलाच तर CU चे बटण बंद करा. VVPAT ला लावलेली CU ची केबल VVPAT पासून अलग करा. BU ला लावलेली VVPAT ची केबल BU पासून अलग करा. CU चे बटण चालू करा. आता तुम्हाला लाल रंगाचा Busy दिवा दिसणार नाही. मतदानास नकार देणारा हा शेवटचा मतदार असल्याने तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळे CLOSE बटण दाबून मतदान बंद करा व पुढिल कामे करायला घ्या.
6] फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब Part-1 मध्ये नियम 49-ण अंतर्गत "मत न नोंदवण्याचे ठरवलेल्या मतदारांची संख्या यात नोंद करावी.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments