मतदान घेण्यासाठी मतदान केंद्रावर एकूण चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते त्यापैकी एक मतदान केंद्राध्यक्ष असतो तर उरलेले मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन असे असतात अर्थात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणे ही सामूहिक जबाबदारी असते परंतु तरीदेखील प्रत्येक मतदान अधिकाऱ्याला त्याची कामे ठरवून दिलेली असतात.
मतदान अधिकारी क्रमांक दोन याची कार्य
मतदान अधिकारी यांचे कार्य
PO 2 मतदान अधिकारी यांचे कार्य
2| दुसरा मतदान अधिकारी नमुना 171/17A मतदार नोंदवहीचा प्रभारी कोणते दस्तावेज असतील?
नमुना 1731 / 17A मतदार नोंदवही, पक्की शाई, मतदार चिट्ठी
1| प्रमाणित करणे - प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी मतदान यंत्रात शुन्य मते आहेत असे प्रमाणित करावे
2| अनुक्रमांकची नोंद करणे : पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मतदाराचे नाव व यादीतील अनुक्रमांक उच्चारल्यानंतर दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याने सदरचा अनुक्रमांक मतदार नोंदवहीत 1731 / 17A दुसऱ्या स्कान्यामध्ये नोंदवावा
अ] EDC- निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र ची नोंद पुढील प्रमाणे करावी- EDC ची मतदार यादीच्या अनुक्रमांक कॉलम मध्ये नोंद करताना पुढिलप्रमाणे नोंद करावी मतदार यादीतील अनुक्रमांक / भाग क्रमांक / मतदारसंघाचा क्रमांक 123/100/41अंबरनाथ बा प्रॉक्सी मतदार -:
जर प्रॉक्सी मतदार असेल तर मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक लिहावा व त्यापुढे कंसात 'PV' किंवा 'बम' (बदली मतदार) असे लिहा उदा. 111 [PV] / 111 [बम]
3| शाई लावणे - :
अ] मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावावी
ब] अंध अपंग मतदारास व त्याच्या सोबत्यास देखील शाई लावावी. सोबत्याच्या उजव्या तर्जनीवर शाई लावावी. उजव्या हाताच्या तर्जनीवर आधिपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. क] प्रॉक्सी / बदली मतदार असेल तर त्याच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावावी. नसेल तर इतर कोणत्याही बोटाला. डावा हात नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनिला. उजवी तर्जनी नसेल तर कोणत्याही बोटाला. दोन्ही हात नसेल तर जे बोटाचे पेर असेल त्याला पक्की शाई लावावी.
6] ओळखीच्या पुराव्याची नोंद करणे आलेल्या मतदाराचा ओळखीचा पुरावा तपासेल व नमुना 171 / 17A मध्ये त्याची नोंद करेल
अ] जर मतदाराने EPIC दाखवले तर EP व शेवटचे चार अंक लिहावे उदा. EP 1234
ब] जर मतदाराने EPIC ऐवजी मान्य असलेले इतर कोणातेही पुरावे दाखवले तर त्या पुराव्याचा प्रकार व शेवटवे चार अंक लिहावेत / उदा आधार कार्ड 1234, पॅन कार्ड 1234, शासकिय ओळख पत्र 1234, पासपोर्ट 1234
7| मतदाराची सही / अंगठा कॉलम क्र. 4 मध्ये नोंदवणे मतदार नोंदवही 171 / 17A च्या कॉलम क्र. - 4 मध्ये मतदाराचःइ सही किंवा अंगठा घ्यावा. जर ASD यादीतील मतदार असेल तर त्या मतदाराची सही व अंगठा दोन्ही घ्यावा.
8] मतदाराने सही / अंगठा देण्यास नकार दिला तर जर एखाद्या मतदाराने सही देण्यास किंवा अंगठा उमटवण्यास नकार दिला तर अशा मतदाराला मतदान करण्याची परवानगी देवू नये. शेरा रकान्यात "स्वाक्षरी / अंगठ्याचा ठसा देण्यास नकार मतदानास परवानगी दिली नाही." अशी नोंद करुन मतदान केंद्राध्यक्षाने सही करावी. फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब भाग। नियम 49-5/49-D अंतर्गत "मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदारांची संख्या" यात नोंद करावी.
११ मतदाराने मतदानास नकार दिल्यास काय करावे - ?
1] ओळख पटवून फॉर्म 17-A मध्ये स्वाक्षरी केल्यावर मतदाराने मतदानास नकार दिल्यास
2] मतदाराला मत देण्यास प्रवृत्त करावे नोटा बहल माहिती द्यावी
3] मतदाराचा नकार कायम राहिल्यास मतदार नोंदवही मध्ये 'मतदानास नकार' असा शेरा लिहून केंद्राध्यक्षाने सही करावी
4) जर मतदार कंट्रोल युनिटवरील उत्चीत बटन दाबुन मतदान युनिट सुरू केल्यावर जर मतदानास नकार देत असेल तर अशा वेळेस वरील प्रक्रिया पुर्ण करुन त्या मतदारास जावू द्यावे व युनिट वरील उचीत बटन दाबुन मतदान युनिट तसेच ठेवून ते पुढील मतदारासाठी वापरावे
5] शेवटवा मतदार अशा रितिने मतदानास नकार देणार नाही याची मात्र काळजी घ्यावी कारण एकदा दिलेली कमांड फ़क्त CU चे बटण ऑन-ऑफ करुनच निष्क्रिय करता येते पण जर CU चे बटण ऑन-ऑफ केले तर VV PAT ची स्वयंनिर्मित 7 पेपर स्लीप लगेच ड्रॉपबॉक्स मध्ये तयार होतात त्यामुळे शेवटच्या मतदारावे मत इ.व्ही. एम मशिन मध्येच झाले पाहिजे याची काळजी घ्यावी (तरीही असा प्रसंग घडलाच तर CU वेचे बटण बंद करा. VVPAT ला लावलेली CU ची केबल VVPAT पासून अलग करा. BU ला लावलेली VVPAT ची केबल BU पासून अलग करा. CU चे बटण चालू करा. आता तुम्हाला लाल रंगाचा Busy दिवा दिसणार नाही. मतदानास नकार देणारा हा शेवटचा मतदार असल्याने तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळे CLOSE बटण दाबून मतदान बंद करा व पुढिल कामे करायला घ्या.
6] फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब Part-1 मध्ये नियम 49-ण अंतर्गत "मत न नोंदवण्याचे ठरवलेल्या मतदारांची संख्या यात नोंद करावी.
10] प्रदत्त मत/Tender Vote दुसरा मतदान अधिकारी या प्रदत्त मताची नोंद नोंदवही नमुना 17A मध्ये करणार नाही
11] चाचणी मत : मतदाराने VVPAT पेपर स्लीप चुकीची आल्याची तक्रार केल्यास : नियम 49MA
1] संबंधित मतदाराचे लेखी प्रतिज्ञापत्र जोडपत्र 17 भरुन घ्यावे. त्याअगोदर अशा मतदारास चूकीचे प्रतिज्ञापत्र केल्यास होणाऱ्या परीणामांबाबत सूचना द्यावी
2] मतदान केंद्राध्यक्षाने मतदार नोंदवही फॉर्म 17A मध्ये (मतदान अधिकारी-2 याच्याकडील नोंदवही 171/17A) संबंधित मतदाराची दुबार नोंदणी करावी
3) दुबार नोंदणी कशी करावी?
3] मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संबंधित मतदाराला चाचणी मत - Test Vote नोंदवण्यास सांगावे.
4] मतदाराचा आक्षेप स्वरा असेल तर मतदान थांबवावे व झोनल ऑफिसर शी संपर्क साधावा
5] मतदाराचा आक्षेप खोटा सिध्द झाला तर मतदार नोंदवही फॉर्म 17A मध्ये Test Vote नोंदवलेल्या उमेदवाराचा नाव व मतदाराचे नाव व त्याचा अनुक्रमांक यांची नोंद घ्यावी
6] संबंधित मतदाराची शेरा रकान्यात सही घ्यावी
7] फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मताचा हिशोब भाग-1 मधील अनुक्रमांक 5ब मध्ये Test Vote ची नोंद घ्यावी
8] संबंधित मतदाराला पोलिसाच्या स्वाधिन करावे. 12| शेऱ्याची नोंद करणे मतदार नोंदवही फॉर्म 17A मध्ये पाचव्या रकान्यात आवश्यकतेनुसार मतदानास नकार, गोपनियता भंग, EDC मतदार, Test Vote अशा नोंदी आवश्यकतेनुसार करेल.
13] मतदारांना मतदार चिट्ठी देणे मतदाराला डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावल्यावर, ओळखीच्यापुराव्याची नोंद केल्यावर, योग्य तो शेरा लिहील्यावर दुसरा मतदान अधिकारी मतदाराला मतदानासाठी मतदार चिट्ठी देईल व तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकदे मतदारास जाण्याचा निर्देश देईल.
14| मतदान प्रक्रिया संपल्यानंतर द्यायचा शेरा मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शेवटचे मतदान नोंदीवाली लाल शाईने आडवी रेघ ओढून त्याखाली "नमुना 17अ मधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक असा आहे" अशी नोंद करुन मतदान प्रतिनिधी यांनी स्वाक्षरी करावी.
नमुना 17 : मतदान अधिकारी - 2 यांच्याकडील नोंदवही.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments