शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास संबंधित संस्थांनी शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करावी उच्च शिक्षण संचालक

 महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयातून निर्गमित दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजीच्या निवडणूक आचारसंहिता संदर्भातील आदेशानुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास संबंधित संस्थांनी शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करावी असे निर्देश दिले आहे. 


दि.५ नोव्हेंबर, २०२४

परिपत्रक-

वाचा १. मा. निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे आचारसंहिता पालनाबाबतचे निर्देश

२.. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९

३.. महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालये प्रमाणसंहिता (शिक्षकेत्तर पर्दाच्या अटी व सेवाशर्ती) नियम १९८४ सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या आचारसंहितेमध्ये मा. निवडणूक आयोग यांचेकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे विविध प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

मा. निवडणूक आयोग यांचे आचारसंहिता पालनासंदर्भातील निर्देश, त्याचप्रमाणे शासन निर्णय दि.२० मे, २०१० अन्वये राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी सामाईक परिनियम (Common Statutes) अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतूदी लागू करण्यात आलेल्या आहेत. करिता, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ५(१) मध्ये नमूद केल्यानुसार, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही. किंवा त्याचेशी अन्यथा संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्याही प्रकारे भाग घेता येणार नाही किवा सहाय्य करता येणार नाही. तसेच ५(४) नुसार तो कर्मचारी कोणत्याही विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणूकीत प्रचार करू शकणार नाही किवा अन्यथा हस्तक्षेप करू शकणार नाही किंवा त्यासंबंधी आपले वजन खर्च करू शकणार नाही किंवा त्यात भाग घेऊ शकणार नाही, याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.

सबब, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांचेविरूद्ध विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करावी.

या अनुषंगाने सदर परिपत्रक आपले अधिनस्त सर्व विद्यापीठीय व महाविद्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे निदर्शनास आणण्यात यावे.

तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपल्या अधिनस्त महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना मतदान करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करावे.


(डॉ. शैलेन्द्र देवळाणकर) 

प्र. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण)

महाराष्ट्र राज्य, पुणे-१६.


प्रति,

१. कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे,

२. सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य,

प्रत- मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-३२


वरील संपूर्ण परिपत्रक आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.