विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी त्या-त्या गावचे तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व तेथील शासन नियुक्त कर्मचाऱ्यांची असेल. मोबाईलमधील पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही आणि १०० मीटरच्या आत मोबाईल बंदी असेल. चिन्ह असलेली चिठ्ठी मतदाराला दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर क्रमांक लिहिला आहे का, पुरेसे फर्निचर, लाईट, पाणी, प्रसाधनगृह, आवश्यक त्या ठिकाणी मंडपाची सोय करावी लागणार आहे. याशिवाय मतदान केंद्रावर जारचे पाणी पुरवण्यात यावे, साहित्याची देवाण-घेवाण करण्यासाठी ज्या ग्रामसेवकांची नेमणूक आहे, त्यांनी या कामाबरोबरच स्वतःच्या गावातही जबाबदारी पार पाडायची आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर अंतरापर्यंत यात्रा, उरुस, भजन, कीर्तन, प्रवचन ठेवता येणार नाही.
पोस्टर्स काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रे ७० टक्के वेबकास्ट केली गेली आहेत.
त्यामुळे सर्व प्रकार कॅमेऱ्यांमध्ये कैद होत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट आशा सेविकांकडे देण्यात येईल.
१०० मीटरच्या आत मोबाईल घेऊन कोणालाही प्रवेश करता येणार नाही, अन्यथा गन्हा दाखल करण्यात येणार आहे.
आयोगाच्या सूचना
मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद राहतील
• मतदान केंद्रावर वीज, पाणी, स्वच्छतागृह, आवश्यक तेथे मंडप उभारावे १०० मीटरच्या आत मोबाईल नेता येणार नाही
केंद्रे ७० टक्के वेबकास्टिंगने जोडावी लागणार
• मतदान केंद्रावरील सर्व सोय ग्रामसेवक, तलाठी करतील अनुचित प्रकार घडल्यास गंभीर दखल घेतली जाणार
* १२ पुराव्यांपैकी एक पुरावा घेऊनच मतदानास यावे
• मोबाईलमधील पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही
दिव्यांग व ८० वर्षांवरील वयोवृद्धांच्या सोईसाठी वाहन व्यवस्था
• चिन्ह असलेली चिठ्ठी दिल्यास गुन्हा दाखल होणार.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments