संविधान दिवसानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे वाचन करा व मिळवा भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाचे प्रमाणपत्र!
संविधान वाचन करून संविधान प्रतिज्ञा घेण्यासाठी व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा. वरील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामधील शेवटी असलेल्या गेट सर्टिफिकेट Get Certificate अशा निळ्या रंगाच्या बटनवर क्लिक करा.
https://www.mygov.in/read-the-preamble-india
त्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये असलेल्या प्रस्तावना पढे Read The Preamble अशा निळ्या रंगाच्या शब्दांवर क्लिक करा.
पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये आपल्या नावा अगोदर लागणारे श्री श्रीमती पैकी आपल्याला लागू असलेले निवडा त्या समोरच्या बॉक्समध्ये नाव टाईप करा त्यानंतर खाली योग्य त्या लिंग Gender अगोदर वर टिक करा आपली जन्मतारीख निवडा राज्य जिल्हा निवडा आपला ईमेल आयडी व मोबाईल नंबर नोंदवा भाषा चेंज केली च्या बाजूला असलेला चेक बॉक्स वर क्लिक करून शेवटी Proceed for Language Selection वर क्लिक करा
पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामधील सिलेक्ट लैंग्वेज वर क्लिक करून आपल्याला सोयीची भाषा निवडा म्हणजे आपल्याला प्रस्तावना वाचण्याचा संकल्प हा त्या भाषेमध्ये उपलब्ध होईल भाषा निवडल्यानंतर Read The Preamble वर क्लिक करा आपण निवडलेल्या भाषेतून आपल्याला संविधानाची प्रास्ताविक त्या पुढील विंडोमध्ये दिसेल ते वाचा.
मराठी भाषा निवडल्यामुळे मराठी भाषेतून पुढीलप्रमाणे संविधानाची प्रस्ताविका आपल्याला वाचन करायला मिळेल.
आपण आपल्याला योग्य वाटेल ती भाषा निवडू शकता.
प्रस्ताविक संपूर्ण वाचून झाल्यानंतर मैने पढा Read वर क्लिक करा व आपल्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाका.
अचूक ओटीपी नोंदवल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे आपल्या नावाचे प्रमाणपत्र आपल्याला पुढील प्रमाणे दिसून येईल सदर प्रमाणपत्र आपण मोबाईलवर पाठवू शकता आपण ईमेल नोंदवला असेल तर इमेलवर देखील प्राप्त होऊ शकते किंवा ते आपल्या ब्राउझरमध्ये डाउनलोड देखील करता येते व फेसबुक ट्विटर सारख्या समाज माध्यमांवर देखील आपल्याला शेअर करण्याचे ऑप्शन त्याखाली दिसून येते.
आपल्याला योग्य वाटणाऱ्या ऑप्शनचा आपण वापर करू शकतो.
आम्हाला प्रमाणपत्र मिळाले आपणही वरील माहितीचा उपयोग करून आत्ताच प्रमाणपत्र मिळवू शकता!
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
Thank you🙏
0 Comments