राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कार्यालयातील दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार जीवन शिक्षण मासिकासाठी अभ्यासपूर्ण लेख पाठवण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
संदर्भ : 'जीवन शिक्षण' मासिक बैठक दि.१०/१०/२०२४ चे मान्य इतिवृत्त
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पणे यांच्यामार्फत दर महिन्याला जीवन शिक्षण हे मासिक प्रकाशित केले जाते. १६३ वर्षाची दैदिप्यमान परंपरा असलेले हे मासिक शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवी शाळांना सदर मासिक मोफत परविले जाते. शासकीय ध्येय धोरणे, त्यांची अंमलबजावणी, शिक्षकांनी मुलांना शिकते करण्यासाठी केलेले विविध उपक्रम व त्यांच्या यशोगाथा या मासिकात शब्दांकित होत असतात. सदर मासिक शिक्षकांसाठी वाहिलेले असून यामध्ये शिक्षकांना प्रेरक मार्गदर्शक असे लेख प्रकाशित होतात.
जीवन शिक्षण मासिकामध्ये पुढील ३ महिन्यासाठी ठरविण्यात आलेल्या लेखासंदर्भातील विषयांचा तपशील पुढीलप्रमाणे
वरील तपशीलामधील विषयांवर आधारीत विशेषांक आपण प्रकाशित करणार आहोत. यासाठी आपल्या अधिनस्त पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना संबंधित विषयाबाबतचे अभ्यासपूर्ण लेख प्रसारमाध्यम विभागाच्या jeevanshikshan@maa.ac.in या ई-मेलवर विहीत कालावधीपर्यंत पाठविण्याबाबत अवगत करावे.
(राहूल रेखावार भा.प्र.से)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे-३०
परिपत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
प्रत माहितीस्तव.
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments