विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुटीबाबत जिल्हाधिकारी, (सर्व जिल्हे); मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व); विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग) यांना आयुक्त, शिक्षण यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८, १९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :- आपले पत्र क्र. आशिका / प्राथ / १०६/ निवडणूक सुटी / ६८३१, दिनांक १३ नोव्हेंबर, २०२४.
महोदय,
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, ही विनंती.
आपला,
तुषार महाजन)
( उपसचिव, महाराष्ट्र शासन
राज्य शासनाने माननीय आयुक्त शिक्षण यांनी दिलेल्या पत्रानुसार शाळेतील शंभर टक्के निवडणूक कर्तव्यावर असतील तर मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments