प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
प्रति,
केंद्रप्रमुख सर्व
मुख्याध्यापक सर्व
सर्व मुख्याध्यापक यांना सुचित करण्यात येते की, शालेय पोषण आहार योजनेतंर्गत MDM Portal वर ऑनलाईन माहिती दररोज नोदविणे आवश्यक आहे. ज्या शाळा MDM PORTAL वर माहिती भरतील त्याच शाळांना अनुदान वर्ग केले जाते. त्यासाठी मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल तर मोबाईल मध्ये MDM Apps चालु करण्यासाठी खालीलप्रमाणे Porcess करणे.
१. MDM APPS Install केल्यानंतर दैनदिंन माहिती भरण्यासाठी ज्या शाळांचा OTP FAIL येतो त्यांनी आपले HM Login & Password टाकुण LOGIN करणे त्यात APPS SETTING मध्ये जाऊन CHANGE DIVICE FORM MDM APPS येथे आपला मोबाईल नंबर दिसेल तेथे CHANGE DIVICE वर CLICK करणे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर तेथुन निघुन जाईल. परत आपले MDM APPS मोबाईलवर OPEN करून UDISE, MOBILE NO टाकणे आपल्या मोबाईलवर OTP येऊन जाईल.
शा पो आ (MDM) app डाउनलोड लिंक
https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk
2. तसेच, दैनंदिन माहिती भरण्यासाठी MDM App हा एकच पर्याय नाही. MDM App ज्या शाळांचे open, install होत नाही, OTP येत नाही, किंवा अन्य काही Problem आहे त्या शाळांनी MDM ची दररोजची माहिती खालील Link मध्ये Open करून MDM चा HM Login & Password वापरून माहिती भरावी.
https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/5
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मुल्यांकन करण्याबाबत शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व यांना शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ
१. सोसायटी फॉर एज्युकेशन व्हॅल्युज अॅन्ड अॅकान सेवा या संस्थेसोबत दि.११/१०/२०२४ रोजी करण्यात आलेला करारनामा.
२. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/सो.ऑ/कार्यादेश/२०२४-२५/०६६७४, दि.११/१०/२०२४.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन करण्यासाठी संचालनालय स्तरावरुन सोसायटी फॉर एज्युकेशन व्हॅल्युज अॅन्ड अॅक्शन सेवा या संस्थेसोबत दि.११/१०/२०२४ रोजी करारनामा करुन कार्यादेश देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या सामाजिक अंकेक्षणाच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. सामाजिक अंकेक्षणाचे कामकाज करण्यासाठी संचालनालय स्तरावरुन जिल्हानिहाय शाळा/केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांची यादी संबंधित संस्थेस ब आपल्या कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रस्तुत कामकाजाच्या अनुषंगाने क्षेत्रिय स्तरावरावरील अधिकान्यांच्या जबाबदाऱ्या व प्रस्तुत कामकाजाकरीता उपलब्ध करुन द्यावयाची माहिती याबाबत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
• सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्याः-
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) :-
1. जिल्हा स्तरावर सामाजिक अंकेक्षणाध्या कामकाजासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे प्रमुख समन्वय अधिकारी म्हणून कामकाज पार पाडतील.
॥. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यानी सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया आयोजित करताना प्रशासकीय यंत्रणा/क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी यांना सामाजिक अंकेक्षण पथकास सहकार्य करण्याचे व आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देण्याचे निर्देश द्यावेत. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किंवा त्यांचा प्रतिनिधी प्रत्येक सामाजिक अंकेक्षण सार्वजनिक सुनावणीस उपस्थित राहतील.
सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेतील सार्वजनिक सुनावणीचा अहवाल संबंधित यंत्रणेकडून शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना सादर करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची राहील.
V. सामाजिक अंकेक्षण अहवालावर सुधारात्मक कारवाई केली जाईल याची खात्री करून घेण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची राहील.
VI. सामाजिक अंकेक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच क्षेत्रिय अधिकाऱ्याऱ्यांचे संपर्क क्रमांक संबंधित संस्थेस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची राहील.
VII. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद हे अंमलबजावणी यंत्रणेला सामाजिक अंकेक्षण कामात आवश्यक सहकार्य करण्याच्या सुचना देतील.
VIII. योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन करण्यासाठी संचालनालय स्तरावरुन सोसायटी फॉर एज्युकेशन व्हॅल्युज अॅन्ड अॅक्शन सेवा या संस्थेस सदरच्या कामकाजाकरीता शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामुळे क्षेत्रिय स्तरावर संबंधित संस्थेस कोणत्याही अतिरिक्त निधी अथवा मोबदला देण्यात येऊ नये याबाबत जिल्हा स्तरावरुन सविस्तर सुचना निर्गमित कराव्यात.
नागरी सेवेच्या नियमांनुसार गैरवर्तन करणाऱ्या आणि प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या लाभार्थ्यांच्या हक्कांची हानी करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची राहील, गटशिक्षणाधिकारी:-
1. गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक पीएम पोषण हे सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतील अंमलबजावणी करणाऱ्या संबंधित कर्मचारी यांना सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेबादल सविस्तर माहिती देतील.
1. गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक पीएम पोषण हे सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतील अंमलबजावणी करणाऱ्या विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख शाळांना सामाजिक अंकेक्षणांच्या तारखा लेखी कळवतील.
॥. सामाजिक अंकेक्षण सार्वजनिक सुनावणीस गटशिक्षणाधिकारी / अधिक्षक उपस्थित राहतील.
सामाजिक अंकेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व इतर अंमलबजावणी यंत्रणेत्तील कर्मचाऱ्याची बैठक घेवून त्यांना या प्रक्रियेची विस्तृत माहिती दिली जाईल.
गटशिक्षणाधिकारी/ अधिक्षक पीएम पोषण हे सामाजिक अंकेक्षण कामकाजात संबंधित संस्थेस आवश्यक सहकार्य करण्याच्या सुचना केंद्रप्रमुख / मुख्याध्यापक यांना देतील.
शाळा स्तरावर शालेय पोषण आहार योजनेच्या सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेमध्ये खालील बाबीची पडताळणी करण्यात येणार आहे.
पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्याची नियमितता.
• विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या आहाराची पौष्टिकता, गुणवत्ता आणि प्रमाण.
> शाळेतील तांदूळ व धान्य साठवण्यासाठी जागा.
शाळा परिसरातील स्वच्छ आणि सुरक्षित स्वयंपाकगृह.
तांदूळ व धान्यादी वस्तुंच्या साठवणूकीची जागा.
तांदूळ व धान्यादी वस्तुंची गुणवत्ता, प्रमाण व वाहतुकीची पडताळणी.
आहार बनवण्यासाठी येणाऱ्या खर्चाची पडताळणी आणि त्याची उपलब्धता, स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे मानधन आणि त्यांच्या देयकाची पडताळणी.
> मासिक खर्च.
MDM बैंक खाते पुस्तकांची पडताळणी.
पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहे, हात धुण्यासाठी साबण.
• जेवणासाठी आवश्यक ताटे व जेवणाची जागा यांची उपलब्धता.
• वैद्यकीय आणि आरोग्य कार्ड वितरणासह विद्यार्थी तसेच, स्वयंपाकी व मदतनीस यांच्या आरोग्याच्या नोंदी.
दैनंदिन आहार तपासणीच्या चव रजिस्टर नोंदवहीची पडताळणी.
योजनेबाबत केलेली जागरुकता,
सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितपणे पोषण आहार वितरण.
> विद्यार्थ्यांमध्ये आहार वितरण करतांना भेदभाव न करणे इत्यादीबाबत तपासणी,
• आपत्कालीन वैद्यकीय योजना.
उपस्थिती नोदणीपत्रक, तांदूळ व धान्यादी माल साठा नोंदवही, चबनोंदवही लाभार्थी किंवा MDM रजिस्टर, आर्थिक नोंदणी इ. भ्रष्टाचाराची उदाहरणे,
SMC बैठकीची माहिती.
सामाजिक अंकेक्षण करणाऱ्या यंत्रणेस खालीलप्रमाणे अ व ब नुसार आवश्यक असलेली मागील वर्षातील कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथ) व गटशिक्षणाधिकारी यांची राहील. अ. जिल्हा परिषदः शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांच्या कार्यालयातून खालीलप्रमाणे माहिती सामाजिक अंकेक्षणाचे कामकाज करणाऱ्या संस्थेस उपलब्ध करुन देण्यात यावी. संसद सदस्यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख व दक्षता समितीचे आयोजन यासंदर्भातील माहिती.
जिल्हास्तरावर नियमित बैठकीच्या आयोजनाबाबतची कागदपत्रे.
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमार्फत पोषण आहार नमुन्यांची तपासणी बाबतची कागदपत्रे,
जिल्हा स्तरावरुन शाळांना वितरीत केलेल्या निधीचा तपशील.
जिल्हा स्तरावर योजनेच्या अंमलबजावणीबाबत राबविण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती.
योजनेतर्गत लोकसहभागातून प्राप्त झालेली भौतिक संसाधने व इतर केलेली कामे यांचा तपशील, सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेमधील सर्व बाबींची पूर्तता तसेच सर्व संबंधित यंत्रणामधील समन्वय, दैनंदिन अडचणींचे निराकरण व इतर बाबी योग्य रितीने हाताळण्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद यानी जिल्हा/तालुका स्तरावर समन्वय अधिकान्याची नेमणूक करावी.
प्रत्येक तालुक्याकरीता समन्वय अधिकारी यांबी नियुक्ती करुन संबंधितांचे नावे व दुरध्वनी क्रमांक सामाजिक अंकेक्षण पथकास उपलब्ध करुन द्यावीत, त्याची प्रत संचालनालयास सादर करावी.
4. संबंधित शाळा: शाळांनी सामाजिक अंकेक्षणाचे कामकाज करणाऱ्या संस्थेस योजनेशी संबंधित शाळा स्तरावरील सर्व अभिलेखे व इतर अनुषंगिक माहिती उपलब्ध करुन द्यावी.
स्वयंपाकी तथा मदतनीस (CCH) किया अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या नियुक्ती बाबत शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव.
धान्यसाठा व तांदूळ नोंदवही.
योजनेचे बैंक खाते पुस्तक.
स्वयंपाकी तथा मदतनीसांच्या मानधनाचे बैंक खाते पुस्तक.
विद्यार्थी उपस्थिती नोंदवही.
आहार चव नोंदवही.
आपत्कालीन आराखडा.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन करण्याकरीता नियुक्त करण्यात आलेल्या सोसायटी फॉर एज्युकेशन व्हॅल्युज अॅन्ड अॅक्शन सेवा, छत्रपती संभाजीनगर या संस्थेस प्रस्तुत कामकाजाकरीता आवश्यक असलेली कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावीत. तसेच संबंधित संस्थेसोबत योग्य तो समन्वय साधून सामाजिक अंकेक्षणाचे कामकाज पुर्ण करुन घेण्यात यावे.
अत माहितीस्तव सविनय सादर,
१. मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई. २
. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे. ३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
प्रत्त आवश्यक त्या कार्यवाहीस्तव: सोसायटी फॉर एज्युकेशन व्हॅल्युज अॅन्ड अॅक्शन सेवा.
शरद गोसावी
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments