राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे कार्यालयातून दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित आदेशानुसार परक राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 च्या अंमलबजावणी संदर्भात पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
संदर्भ:
१) NCERT नवी दिल्ली यांचे ईमेल पत्र दि. ०८.०८.२०२४
२) NCERT नवी दिल्ली यांचे ईमेल पत्र दि. १३.०९.२०२४
३) NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात आलेल्या प्रशिक्षणातील सूचनेनुसार दि. १८.०९.२०२४
४) NCERT नवी दिल्ली यांचे ईमेल पत्र दि. २४/१०/२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये दिनांक ०४/१२/२०२४ रोजी परख राष्ट्रीय सर्वेक्षण - २०२४ राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी मध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.
• सदर सर्वेक्षणात आपल्या जिल्ह्याची संपादणूकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१. जिल्ह्यामध्ये केंद्रस्तरावरील परिषदेत सदर सर्वेक्षण तपशील बदलाबाबत खालील माहिती देण्यात यावी.
परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे
२. त्या अनुषंगाने राज्यात सदर सर्वेक्षण अंमलबजावणी दिनांक ०४.१२.२०२४ रोजी करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आली आहे. या कालावधीत सदर सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांमध्ये इतर कोणत्याही उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये.
३. सर्वेक्षण दिनांक ०४.१२.२०२४ रोजी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा, खाजगी अनुदानित, खाजगी विना अनुदानित व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या यादृछिक पद्धतीने निवडलेल्या शाळांत घेण्यात येणार आहे.
४. सदर सर्वेक्षण हे दिनांक ०४.१२.२०२४ रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार असल्याने सदर कालावधीत निवड झालेल्या शाळांमधील निवडण्यात आलेल्या वर्गातील १००% विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे.
५. ज्या शाळांना या कालावधीमध्ये सुट्टी आहे अशा शाळांमधील ज्या वर्गाचा समवेश सर्वेक्षण साठी झाला असेल त्या वर्गाला सर्वेक्षणाच्या दिवशी उपस्थित ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे.
६. शाळा सकाळ आणि दुपार सत्रात भरत असतील तरीही संबंधित शाळेतील निवड झालेल्या इयत्तेसाठी सर्वेक्षण कालावधीत सर्वेक्षणाच्या खालील नियोजित वेळेनुसार शाळा भरविण्यात यावी.
सर्वेक्षण वेळापत्रक :
सर्व सर्वेक्षण साहित्य दिलेल्या सूचनेनुसार मोजून घेऊन निरीक्षकाकडे देणे.
निरीक्षक (CBSE), क्षेत्रीय अन्वेषक (FI)
निवड झालेली शाळा जर बंद झाली असेल तर तसा अहवाल CBSE निरीक्षक नमूद करतील. तशा सूचना जिल्हा स्तरावरून CBSE निरीक्षकांना देण्यात याव्यात जेणे करून CBSE निरीक्षक त्या शाळेवर जाणार नाही.
मात्र अहवाल तयार करून जिल्हा समन्वयक CBSE यांचेकडे जमा करावा.
८. सर्वेक्षणाच्या दिवशी जर काही शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ५ पेक्षा कमी असेल तसेच विशेष मुलांची शाळा असेल अशा परिस्थितीत CBSE निरीक्षक व FI यांनी शाळा मुख्याध्यापकांसोबत संपर्क करून त्याबाबतचा अहवाल तयार करून तो दोन्ही जिल्हा समन्वयक याना द्यावा.
९. ज्या शाळांची निवड झाली आहे त्या शाळांना सर्वेक्षण संदर्भातील कार्यवाहीबावत्त लेखी पत्र देण्यात यावे.
१०. रात्र शाळांची निवड आली असेल व त्या शाळांच्या निवड झालेल्या वर्गांना सकाळच्या सत्रात येणे शक्य असेल अशा शाळांना वरील वेळापत्रकाप्रमाणे कळवावे अन्यथा त्यांच्या वेळेनुसार सर्वेक्षण आयोजित करावे. याबाबत संबंधित निरीक्षक व क्षेत्रीय अन्वेषक यांना अवगत करावे,
११. शाळा विशेष गरजा असणाऱ्या मुलांची (विशेष शाळा) असेल अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सुविधा नियमाप्रमाणे देऊन (सहायक/मदतनीस / वाढीव वेळ) सर्वेक्षण घ्यावे. तसेच क्षेत्रीय अन्वेषकांना या मुलांना प्रश्नांचे अर्थ समजावून देण्यापर्यंत मदत करण्यात यावी अशा सूचना देण्यात याव्यात.
१२. शाळांचे माध्यम व सर्वेक्षणाकरिता निश्चित करण्यात आलेल्या माध्यमात बदल असेल तर अशा शाळेत सर्वेक्षणावेळी क्षेत्रीय अन्वेषकांना या मुलांना प्रश्नांचे अर्थ समजावून देण्यापर्यंत मदत करण्याबाबत सूचना द्यावी.
सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करावयाची पूर्वतयारीः
१. OMR भरण्याचा सराव घेण्यात यावा.
२. चाचणीपूर्वी NAS २०१७, ETAS, MTAS सर्वेक्षण मधील प्रश्नांचा सराव घेण्यात यावा.
तसेच SLAS व PAT मधील प्रश्नांचा सराव घ्यावा.
३. विद्यार्थ्यांच्या सरावासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर सराव प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाळाभेटः
सर्वेक्षण कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरून काही शाळा भेटी करण्यात येणार आहेत. या शाळा वगळून जिल्हा स्तरावरून जिल्हा स्तरीय अधिकारी (प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता DIET), शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उपशिक्षणाधिकारी यांच्या भेटींचे नियोजन करावे. सदर भेटी करताना खालील बाबींचा विचार करावा.
१) एका शाळेत दोन अधिकारी जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
२) शाळा भेट वेळ सकाळी ११ ते ०५
३) सर्वेक्षण भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घेणे.
४) सर्वेक्षण कार्यवाहीचे निरीक्षण करून भेट प्रपत्र भरावे व ते जिल्हा समन्वयक यांचेकडे जमा करावेत.
तसेच सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाही बाबत प्राचार्य व शिक्षणाधिकारी यांनी एकत्रीतपणे मा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षणाबाबत अवगत करावे.
यासंदर्भात सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं ४ वाजता मा. आयुक्त शिक्षण यांचे उपस्थितीत सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक, सर्व आयुक्त मनपा, सर्व विभागीय उपसंचालक, सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक नपा/ नगर परिषद, प्रशासन अधिकारी मनपा/नपा यांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात येणार आहे. सदर बैठकीची लिंक त्याच दिवशी सकाळी राज्य परख सर्वेक्षण ग्रुप वर व संबंधितांच्या मेलवरती देण्यात येईल. तसेच या बैठकीवेळी जिल्ह्यातील निवड झालेल्या शाळांमधील मुख्याध्यापक, क्षेत्रीय अन्वेषक (FI) यांना YOU TUBE च्या माध्यमातून हजर राहण्याबाबत आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. सदर YOU TUBE लिंक त्याच दिवशी सकाळी राज्य परख सर्वेक्षण ग्रुप वर व संबंधितांच्या मेलवरती देण्यात येईल.
तरी राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षण यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. तसेच जिल्हास्तरावर कार्यवाही करताना जिल्हा समन्वयक म्हणून प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक यांनी समन्वयाने सदर उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करावी.
(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रति,
१)प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व
२)शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सर्व
३) प्रशासन अधिकारी, मनपा /नपा सर्व
४) शिक्षण निरीक्षक मुंबई (सर्व)
विषय: परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 करीता सरावासाठी क्षमताधारीत प्रश्नपेढी बाबत...
सर्वांना नमस्कार 🙏
परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यामध्ये यादृच्छिक पद्धतीने होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या काही निवडक शाळा निवडून इयत्ता तिसरी, सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांमधील संपादणूक पडताळणी केली जाणार आहे.
त्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून इयत्ता ३री,६वी व ९वी साठी विषय निहाय क्षमताधारित प्रश्नपेढी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे www.maa.ac.in वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
तरी आपण आपल्या अधिनस्त सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील संबंधित इयत्ता मधील विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपेढी सरावासाठी उपलब्ध असल्याचे आपल्या स्तरावरून सर्व शाळा मुख्याध्यापकांना कळवावे.
या प्रश्नपेढीच्या आधारे संबंधित सर्वेक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा सराव होईल याबाबत सनियंत्रण करावे.
सदर प्रश्नपेढी पाहण्यासाठी पुढील लिंक वर जावे
👇
https://drive.google.com/drive/folders/1YtVeeQYwM1ZN1H2Q5LiOUNcVbXBMbEZx
(राहूल रेखावार भा.प्र.से)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
येत्या 04 डिसेंबरला परख सर्वेक्षण इयत्ता तिसरी, सहावी व नववी आयोजित असून दिलेल्या लिंक वर आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा प्रश्नपेढी सोडवण्याचा सराव करून घ्यावा. सर्वेक्षणाकरिता सदर इयत्ता असणाऱ्या कोणत्याही व्यवस्थापनाच्या शाळेची निवड होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपेढी सोडवण्याचा सराव करून घ्यावा.
आदेशावरून
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments