11/11/2024 ते 18/11/2024 या कालावधीत मतदान साक्षरता जनजागृतीसाठी व्हिडिओ निर्मिती व पत्र लेखन स्पर्धा! शिक्षण संचालक आदेश.

शिक्षण संचालक योजना यांनी दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजीच्या आदेशानुसार मतदान साक्षरता व जनजागृतीसाठी पुढील प्रमाणे उपक्रम घेण्याचे निर्देश दिले आहे. 


विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर खालील मतदान साक्षरता विषयक उपक्रमांचे आयोजन दिनांक 11/11/2024 ते 18/11/2024 या कालावधीत करावे.

 A) मतदान साक्षरता जनजागृतीसाठी व्हिडिओ निर्मिती :

मतदान साक्षरता जनजागृतीसाठी व्हिडिओ निर्मिती करून सोशल मीडियावर (यु-ट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी) प्रसिद्धी देण्यात यावी. व्हिडिओ निर्मिती गट :

1. शालेय विद्यार्थी गट - a) इयत्ता 5 वी ते 8 वी व b) 9 वी ते 12 वी.

2. नवसाक्षर (वय वर्षे 15 व त्यापुढील दि. 17 मार्च, 2024 च्या FLNAT परीक्षेत उत्तीर्ण झालेले)


निकष : 1) व्हिडिओ 3 ते 5 मिनिटांचा असावा.

2) सुरूवातीस स्वतःचा थोडक्यात परिचय असावा. (नाव, शाळा व स्पर्धा गट)

3) व्हिडिओमध्ये मतदानाचे महत्त्व विषद करून मतदान साक्षरता केलेली असावी.

4) व्हिडिओमधून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.

B) मतदान साक्षरता जनजागृतीसाठी पत्रलेखन :


पत्रलेखन गट :

1. शालेय विद्यार्थी गट a) इयत्ता 5 वी ते 8 वी व b) 9 वी ते 12 वी. 

2. नवसाक्षर (वय वर्षे 15 व त्यापुढील दि. 17 मार्च, 2024 च्या FLNAT परीक्षेत उत्तीर्ण झालेले)

विषय: आई-बाबा, आजी-आजोबा, काका-मावशी, मामा-मामी मतदान करायचं हं।

निकष : 1) शब्द मर्यादा गट a) इयत्ता 5 वी ते 8 वी 150 शब्द. b) 9 वी ते 12 वी- 180 शब्द.

2) पत्रामध्ये मतदानाचे महत्त्व विषद केलेले असावे.

3 पत्रलेखनाचा मुख्य आशय मतदानाचे मतदान साक्षरता करणारा असावा..

4) पत्रलेखनामधून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वरील दोन्ही स्पर्धा व स्पर्धकांना सोशल मिडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात यावी. शाळा, तालुका व जिल्हा स्तरावर दोन्ही स्पर्धा प्रकारांमध्ये प्रथम पाच क्रमांक काढून प्रमाणपतत्रे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या स्तरावरून वितरित करावीत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाच्या व्हिडिओची लिंक व पत्रे शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व SCERT, पुणे या कार्यालयास सादर करावीत.


 शिक्षण संचालक

 शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे -1.



वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.