निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान किती?

निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणेबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करून निर्देश दिले आहेत.


शासन निर्णय :-

भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या किंवा राज्याच्या बाबतीत विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या एक किंवा अनेक जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुका, म्हणजेच राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद व विधानसभेच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी/कर्मचारी वर्ग निवडणूक विषयक विविध कर्तव्यावर नेमण्यात येतो. निवडणूक कर्तव्ये ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण कर्तव्यापेक्षा वेगळ्या प्रकारची असतात. ती केवळ मर्यादीत वेळेत पूर्ण करावयाची नसतात, तर ही कर्तव्ये पार पाडताना निवडणूक कर्मचाऱ्यांना जोखीम आणि धोका यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे निवडणूक कर्तव्ये बजावताना निधन पावलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या कुटुंबियांना तसेच निवडणूक कर्तव्यावर असताना कोणतीही दुर्दैवी घटना (Any mishap) घडून जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनाने सहानुभूतिपूर्वक विचार करुन पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.


अ.क्र.

सानुग्रह अनुदानाचा तपशिल

तपशिल

सानुग्रह अनुदान रक्कम (रुपये)

1

१ निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना मृत पावलेले अधिकारी/कर्मचारी यांचे वारस

१५,००,०००/-

2

 निवडणुकीच्या वेळी कर्तव्यार्थ असताना अतिरेकी कारवाया नक्षलवाद्यांच्या कारवाया यात बॉम्बस्फोट, सुरुंग अथवा शस्त्रास्त्राचा हल्ला (Road Mines, Bomb Blasts, Armed Attach etc.) यामध्ये मृत पावलेले अधिकारी/कर्मचारी यांचे वारस

 ३०,००,०००/-

निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना कायमस्वरुपी अपंगत्व आलेले अधिकारी/ कर्मचारी (उदा. हात, पाय किंवा डोळा गमविणे इ.)

७,५०,०००/-

निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना अतिरेकी कारवाया, नक्षलवाद्यांच्या कारवाया यात बॉम्बस्फोट, सुरुंग पेरणी, शस्त्रास्त्राचा हल्ला इ. (Road Mines. Bomb Blasts, Armed Attack etc.) यामध्ये कायमस्वरुपी अपंगत्व आलेले अधिकारी/ कर्मचारी (उदा. हात, पाय किंवा डोळा गमविणे इ.)

१५,००,०००/-


२. या शासन निर्णयासाठी निवडणूक कर्तव्य याचा अर्थ संबंधीत अधिकारी/कर्मचारी हे निवडणुकीच्या कर्तव्यासाठी आपल्या घरातून / कार्यालयातून बाहेर पडल्यापासून ते निवडणुकीशी संबंधीत कर्तव्ये पार पाडून आपल्या कार्यालयात/घरी परत येईपर्यंतचा कालावधी असा समजण्यात यावा. निवडणुकीशी संबंधीत कर्तव्ये यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा देखील समावेश असेल. या कालावधीमध्ये कोणतीही दुर्दैवी घटना (Any mishap) घडल्यास ती निवडणूक कर्तव्यावर असताना घडलेली आहे असे समजण्यात येईल. तथापि, निवडणूक कर्तव्य व घडलेला मृत्यु यामध्ये नैमित्तिक संबंध (Casual Connection) असावा.

३. निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, निम शासकीय इतर प्राधिकरण तसेच इतर खाजगी आस्थापना की ज्यातील अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा निवडणुकीच्या कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत असे अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश आहे.

४. हे सानुग्रह अनुदान शासनाच्या प्रचलित सोई सुविधा, अनुज्ञेय लाभ या व्यतिरिक्त आहे. यामध्ये सदर अधिकारी/कर्मचारी यांना मिळणाऱ्या नियमित लाभाचा समावेश नाही.

५. हा शासन निर्णय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम २ (१) (ड) मध्ये नमूद केलेल्या सर्व निवडणुकांकरिता लागू राहील.

६. सदर सानुग्रह अनुदान अधिकारी/कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या आर्थिक मदतीसाठी येणारा खर्च हा-

(अ) संसदेच्या निवडणुकांसाठी मुख्य लेखाशीर्ष २०१५- निवडणुका, उपशीर्ष १०५-संसदेच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च (००) (०१) संसदेच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, १३-कार्यालयीन खर्च, मागणी क्रमांक ए-२ (२०१५००५९) तसेच

(ब) विधानसभा/विधान परिषद निवडणुकीसाठी, मुख्य लेखाशीर्ष २०१५- निवडणुका, उपशीर्ष १०६- राज्य/संघराज्य क्षेत्र विधानमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च (००) (०१) राज्य/संघराज्य क्षेत्र विधानमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, १३ कार्यालयीन खर्च, मागणी क्रमांक ए-२ (२०१५००६८), तसेच

(क) लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्यात आल्या तर मुख्य लेखाशीर्ष २०१५- निवडणुका, उपशीर्ष १०४-लोकसभा, राज्य संघराज्य क्षेत्र विधानमंडळाच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्याचा खर्च, (००) (०१) लोकसभा, राज्य संघराज्य क्षेत्र विधानमंडळाच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्याचा खर्च, १३ कार्यालयीन खर्च, मागणी क्रमांक ए-२ (२०१५००४१) या यथास्थित लेखाशीर्षांखाली टाकण्यात यावा व त्या त्या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

७. सानुग्रह अनुदानाकरिता लागू कालावधी हा निवडणूक घोषित झाल्याच्या तारखेपासून सुरु होईल.

८. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक: १५१/१९/व्यय-४, दिनांक ११.०४.२०१९ अन्वये त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०४१२१०५६४१४३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(अ.ना. वळवी)

उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य


वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.