Election Duty Updates - मतदान केंद्रांवरील मुक्कामी कर्मचाऱ्यांच्या पार्टीवर नजर ५० टक्के मतदान केंद्रांवर 'वेब कॅमेरे'

 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण नुकतेच पार पडले. आता प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर 'वेब कॅमेरे' कर्मचाऱ्यांच्या हालचाली व वर्तन टिपणार असल्याने पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जरा सांभाळून राहावे लागणार आहे. कर्मचारी आदल्या दिवशी मतदान केंद्रांवर पोहोचतात. त्यांना रात्र काढणे कठीण होते. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचारी पार्टी करताना आढळून आल्याच्या घटना घडल्या होत्या.

बहुतेक मतदान केंद्रावर मनोरंजन म्हणून रात्रीच्या जेवणाला पार्टीचे स्वरूप आलेले असते. त्यातून कधीकधी मतदान केंद्रांवर कर्मचारी मद्य प्राशन करून गोंधळ घालत असल्याचे चित्र दिसून येते. अगोदर ड्राय डे पाळला जातो, हे लक्षात घेऊन काही कर्मचारी त्याची व्यवस्था स्वतःच मतदान केंद्रावर येतानाच करीत असतात. यामुळे काही मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांमध्ये आपसात वाद होत असल्याच्या घटना मतदान केंद्रांवर घडत आहेत.

याकडे मतदान अधिकारी दुर्लक्ष करीत असतात; परंतु याचा समाजात चुकीचा संदेश जातो. त्यामुळे यावेळी निवडणूक आयोगाने एकूण मतदान केंद्रांच्या ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या केंद्रावर मद्य सेवन करून गोंधळ झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.