E-EPIC PDF Download Link Info - नवीन मतदान ओळखपत्र एपिक डाऊनलोड करा अधिकृत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून अधिकृत माहिती लिंक

 आपले मतदान ओळखपत्र जुने झाले आहे? 

मूळ मतदान ओळखपत्र सापडत नाही? 

काळजी करू नका आता तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले मतदान ओळखपत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता माहिती पुढील प्रमाणे.

सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या

https://voters.eci.gov.in/

संकेतस्थळावर जा त्यामध्ये वेगवेगळ्या असलेल्या पर्यायांमधून E EPIC Download  या पर्यायावर क्लिक करा.


अगोदरच आपले खाते निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपण तयार केले असेल तर त्यामध्ये लॉगिन करा किंवा साइन अप चे ऑप्शन वापरून आपले खाते तयार करा व लॉग इन करा.


लॉगिन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर पासवर्ड व त्याखाली सर्वात शेवटी दिलेला कॅपच्या कोड टाकून आपल्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर ओटीपी बोलवा. आलेला ओटीपी नोंदवा व लॉगिन करा. 

आता ओपन झालेल्या विंडोमध्ये पुन्हा E-EPIC Download वर क्लिक करा.


आपल्याकडे मतदान ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असेल तर एपिक नंबर वर आपला मतदान ओळखपत्र क्रमांक नोंदवा व राज्य निवडा. व निळ्या रंगाच्या सर्च बटनवर क्लिक करा.


पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचे नाव दिसेल त्याच्या खालील  निळ्या रंगाच्या सेंड ओटीपी बटन वर क्लिक करा आलेला ओटीपी त्यानंतर ओपन झालेल्या विंडोमध्ये नोंदवा.



ओटीपी यशस्वीरीत्या नोंदवल्यानंतर तुम्हाला तुमचे मतदान ओळखपत्र म्हणजेच E-EPIC डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल ते डाऊनलोड झाल्यानंतर ओपन करून त्याची प्रिंट देखील तुम्हाला काढता येईल.


वरील प्रमाणे नवीन मतदान ओळखपत्र आपण निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता.

तसेच त्यावर तुमचे मतदान कोणत्या ठिकाणी आहे हे देखील कळेल.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.