Scholarship Updates - शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदार! उच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश

 उच्च शिक्षणातील शिष्यवृत्तीच्या थेट लाभ हस्तांतरणासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर गेल्या तीन वर्षांपासूनचे अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रलंबित अर्जाची तातडीने पडताळणी करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. प्रलंबित अर्जाबाबत प्रश्न उद्भवल्यास संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव, महाविद्यालयांचे प्राचार्य जबाबदार राहतील, असेही स्पष्ट केले आहे. 

याबाबत पुणे विद्यापीठ, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र, एसएनडीटी, डेक्कन कॉलेज अभिमत, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. महाविद्यालय स्तरावर २०२० पासून आतापर्यंत चार वर्षात अनुक्रमे ९१, ११६, १८४, ५३९ अर्ज प्रलंबित आहेत. तर, दुसऱ्या हप्त्यासाठी हेच आकडे अनुक्रमे ५०१, ५०२, ८५६, २ हजार २४० असे नोंदवण्यात आले आहे.

अर्ज पडताळणीनंतरच शिष्यवृत्ती

'महाडीबीटी'वर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाबाबत रोजच्या रोज कार्यवाही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा CHOLARSHIP SCHOLARSHIP लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची महाविद्यालय स्तरावरून पडताळणी करणे गरजेचे आहे. महाडीबीटी संकेतस्थळ, राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळावरील प्रलंबित अर्जाची पडताळणी झाल्यानंतर शिष्यवृत्ती जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर एकाही विद्यार्थ्यांचा अर्ज प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.