यु-डायस स्टुडन्ट पोर्टलवर सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचा अपार आयडी जनरेट करायचा आहे त्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती पुढील प्रमाणे.
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे संमती पत्रक उघडून घ्या त्यासोबत त्यांच्या पालकाचे ओळखपत्र देखील घ्या व पुढील लिंक वर क्लिक करा.
लॉगिन विंडो ओपन होईल आपल्या शाळेचा यु डायस प्लस पोर्टलचा यूजर आयडी म्हणजेच यु डायस कोड व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
लगीन झाल्यानंतर पुढील विंडोमध्ये दिल्याप्रमाणे APAAR Module वर क्लिक करा.
वरील विंडोमध्ये आता ज्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करायचे आहे तो वर्ग निवडा तुम्हाला त्या वर्गातील विद्यार्थ्यांची लिस्ट पुढील विंडोमध्ये दिल्याप्रमाणे दिसून येईल.
विद्यार्थ्यांच्या नावासमोर शेवटी असलेले Generate वर क्लिक करा.
विद्यार्थ्यांच्या नावासमोरील जनरेट बटनवर क्लिक करा.
विद्यार्थ्याच्या नावासमोरील जनरेट बटन वर केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल ज्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती दिसेल व त्याखाली विद्यार्थ्यांच्या पालकाचे संमती पत्र दिसेल त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकाची विद्यार्थ्यांशी असलेले नाते ड्रॉप डाऊन लिस्ट मधून निवडा. त्या अगोदर विद्यार्थ्यांच्या पालकाची नाव टाईप करा. नाते निवडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्याचे ओळखपत्र जे दिले आहे ते निवडा व त्यानंतर त्या ओळखपत्राचा क्रमांक अचूक नोंदवा. व सर्वात शेवटी असलेल्या निळा रंगाच्या Submit बटन वर क्लिक करा.
वरील विंडोमध्ये अचूक माहिती नोंदवून सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांचा अपार आयडी यशस्वीरित्या बनवल्या गेला आहे(APAAR ID generated successfully) असा मेसेज व तयार झालेला अपार आयडी आपल्याला दिसेल.
सदर अपार आयडी आपण नोंदवून घ्यायचा आहे.
यु-डायस प्लस स्टुडन्ट पोर्टलवर तो आपल्याला नेहमीसाठी उपलब्ध असणार आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments