महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी 2025 पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दि. 17/10/2024 रोजी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ०७ डिसेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमिती शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १५ डिसेंबर, २०२४ पर्यंत व्दितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर प्रसिध्दीपत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे. सोबत :- प्रसिध्दीपत्रक आपली विश्वासू,
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी व पाचवी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
प्रसिध्दीपत्रक
संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२४-२५/४५१२, दि. १७/१०/२०२४.
उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर, २०२४ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना जाहीर.
शासनमान्य शाळांमधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. १७/१०/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
अर्ज पत्र भरण्यासाठी डायरेक्ट लिंक
उपरोक्त परीक्षा दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
सोबत :- अधिसूचना
स्वाक्षरीत /- (अनुराधा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
१५) शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना अनिवार्य बाबी / कागदपत्रे खालीलप्रमाणे :-
१. विद्यार्थ्यांची फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी (jpg/jpeg/png/bmp format मध्ये 100 kb पेक्षा जास्त नसावी.)
उदा.:-
विद्यार्थ्यांचा फोटो
विद्यार्थ्याची स्वाक्षरी
२. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र. (इ. ५ वी व इ. ८ वी साठी)
३. विद्यार्थ्याचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे. (इ. ८ वी साठी)
४. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.
१६) विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांकाबाबत :-
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या आधारकार्डशी संलग्न असलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे आई, वडील किंवा पालक यांच्या सोबतच्या संयुक्त बँक खात्याची माहिती (विद्यार्थ्याशी नाते, बँकेचे नाव, IFS Code व बँक खाते क्रमांक), उपलब्ध असल्यास नमूद करावा. सदर बाब अनिवार्य नसल्याने बँक खात्याच्या तपशीलाबाबत विद्यार्थी / पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये.
केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक भरणे अनिवार्य असल्याने यापैकी कोणतीही एक माहिती अचूकपणे नमूद करावी.
१७) शिष्यवृत्ती रकमेतील वाढ :-
शासन निर्णय क्रमांक पूमाशि-२०२०/प्र.क्र.३१/एसडी-५, दि. ०३/०७/२०२३ नुसार शिष्यवृत्ती रकमेत इ. ५ वीच्या सर्व संचांकरीता रु.५००/- प्रतिमाह प्रमाणे (रु.५०००/- प्रतिवर्ष) व इ. ८ वीच्या सर्व संचांकरीता रु.७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रु.७५००/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे.
१८) पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा :-
शासन निर्णय क्रमांक पूमाशि-२०२०/प्र.क्र.३१/एसडी-५, दि. ०३/०७/२०२३ नुसार इ. ५ वी व इ. ८ वीच्या मागासवर्गीय मुले/मुली (H) व मागासवर्गीय मुली (1) या शिष्यवृत्ती संचांकरीता लागू असलेली रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न याबाबतची उत्पन्न मर्यादा काढण्यात आलेली आहे.
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ च्या कामकाजाबाबतची माहिती वरीलप्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी कळविले जातील.
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
सदर अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
स्वाक्षरीत /-
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments