Veer Ghatha Project Edition 4.0 - वीर गाथा प्रकल्प एडिशन-४.०, विद्यार्थी शौर्य पुरस्कार स्पर्धा आयोजनासाठी मुदतवाढ देण्याबाबत SCERT आदेश

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र कार्यालयातून निर्गमित दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी च्या आदेशानुसार वीर गाथा प्रकल्प एडिशन-४.०, विद्यार्थी शौर्य पुरस्कार स्पर्धा आयोजनासाठी मुदतवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.



संदर्भ: The Deputy Secretary, Government of India, Ministry of Education, Department of School Education and Literacy, Shib Das Sarkar Shastri Bhawan, New Delhi Date: 2nd Sep 2024

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संमन्वयाने वीर गाथा प्रकल्प पर्व ४.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्या वतीने सशस्त्र दलातील अधिकारी व अन्य कायद्याने स्थापना केलेल्या दलाच्या आणि नागरिकांच्या शौर्य आणि बालिदानाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी शौर्य पुरस्कार २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनांनिमित्त जाहीर केले जातात.


शुरांच्या प्रेरक जीवन कथा प्रसारित करण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये नागरी सजगतेची भावना रुजवणे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सदर कार्यक्रमांचा समारोप २६जानेवारी २०२५ मध्ये करण्यात येणार आहे. संरक्षणच्या मंत्रालययाच्या शौर्य पुरस्कार संदर्भात राज्यातील सर्व व्यवस्थानाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील सहभागी विद्यार्थांची 

https://www.gallantryawards.gov.in) मधील MYGOV या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

वीर गाथा प्रकल्पाने शालेय विद्यार्थ्यामध्ये शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या आधारे सर्जनशील प्रकल्प करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता, परिच्छेद, निबंधघ, पेटींग/ड्रोईग, Multi-Media Presentation असे विविध प्रकल्प करू शकतात. सदर प्रकल्प शाळांनी संरक्षण मंत्रालय शौर्य पुरस्कार (https://www.gallantryawards.gov.in) मधील MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत.

शालेय स्तरावर इयत्तानिहाय पुढील विषयावर प्रकल्प स्पर्धांचे आयोजन केले जावे.


वीर गाथा प्रकल्प ४ स्पर्धाच्या काही महत्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे-


१. शाळांनी वीर गाथा प्रकल्प ४.० मधील कविता, निबंध, परिच्छेद, पेंटींग/ड्रोइंग, मल्टीमिडिया ( मजकूर, ऑडीओ, प्रतिमा, व्हिडीओ, Animation) इ. सर्व प्रवेशिका नोंदणी (https://www.gallantryawards.gov.in MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावी. २. शाळा स्तरावरून MYGOV या पोर्टलवर अपलोड झालेल्या नोंदणी जिल्हा स्तरावर रुब्रीक्स मूल्यांकन Annexure। अवलोकन करून, मूल्यांकन करावे. वीर गाथा प्रकल्प ४.० साठी मूल्यमापनासाठी तीन स्तर असतील. त्यामध्ये जिल्हा स्तर, राज्य/केंद्र शासित प्रदेश स्तर आणि राष्ट्रीय स्तर प्रत्येक स्तरावर विजेते असतील. घोषित करण्यात येणाऱ्या विजेत्याची संख्या पुढीलप्रमाणे असेलः

जिल्हास्तर ०४ विजेते (प्रत्येक श्रेणीतील एक) यांची निवड जिल्हा स्तरावर करण्यात यावी. निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राज्य स्तरावर करण्यात यावे.

राज्यस्तर - ०८ (प्रत्येक श्रेणीतील दोन) यांची निवड राज्य स्तरावर करण्यात येईल. निवड

झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल.

राष्ट्रीयस्तरावरील १०० विजेते (सुपर १००) असतील. त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणेः


श्रेणी: इयत्ता ३ री ते ५ वी २५ विजेते

श्रेणी: इयत्ता ६ वी ते ८ वी २५ विजेते

श्रेणी: इयत्ता ९ वी ते १० वी २५ विजेते

श्रेणी: इयत्ता ११ वी ते १२ वी २५ विजेते


३. वीर गाथा प्रकल्प ४.० मध्ये भाग घेतलेल्या विध्यार्थाना e-Certificate देण्यात येतील.

४. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२५ ला दिल्ली येथे १०० उत्कृष्ट प्रकल्पांना रु. १०,००० चे पारितोषिक व प्रमाणपत्र महामहीम राष्ट्रपती व महामहीम संरक्षण मंत्री याच्या हस्ते प्रदान केले जातील.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी पर्यत वीर गाथा ४.० प्रकल्प मधील स्पर्धा घेऊन सरंक्षण मंत्रालयाच्या https://www.gallantryawards.gov.in MYGOV या पोर्टलवर वीर गाथा ४.० स्पर्धाची माहिती दि. २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भरावी. तदनुषंगाने आपल्या स्तरावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेशित करावे. पालक व शालेय व्यवस्थापन समिती यांना देखील अवगत करावे. या अनुषंगाने आपल्या स्तरावरून प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) यांनी समन्वयाने कामकाज करावे. या पत्राच्या अनुषंगाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.


सोबत -1. VEER GATHA 4.0 CONCEPT NOTE.

2. DISTRICT NODAL OFFICER LIST.


(डॉ. माधुरी सावरकर)

 उपसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.