स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात इयत्ता ६ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना लिंक द्वारे सहभागी होण्यासाठी सूचित करण्याबाबत

 स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात इयत्ता ६ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी सूचित करण्याबाबत  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


https://maa.ac.in/SCERTMahaHackathon

STARS प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमाचे इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी २१ व्या शतकातील कौशल्याची रुजवणूक व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत NEP २०२०,NCF २०२३, UN SDG यानुसार १५ विषयांतर्गत (Themes) विद्यार्थ्यांनी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे.

यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यासाठी दिनांक ०६/०९/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता झूम प्लॅटफॉर्मद्वारे शिक्षण क्षेत्रातील जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना सदर उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

तसेच सदर उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी व हॅकेथोन उपक्रमासंदर्भात सक्षमपणे कार्यवाही करण्यासाठी राज्य स्तरावर दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तज्ञ मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता / वरिष्ठ अधिव्याख्याता नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहेत.

सदर उपक्रमात आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी या उपक्रमातील विषयांतर्गत प्रतिकृती अथवा मॉडेल तयार करून सहभागी व्हायचे आहे. यासाठी प्रस्तुत परिषदेमार्फत  https://maa.ac.in/SCERTMahaHackathon नोंदणी लिंक देण्यात येत आहे. सदर लिंक परिषदेच्या साईट यर अपलोड करण्यात आली आहे. सदर लिंक ही दिनांक १५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी खुली राहील सदर नोंदणी शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. सहभागी होण्याबाबत सगळ्या सूचना लिंकवर देण्यात

आल्या आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून किमान १००० नोंदणी होणे अपेक्षित आहे. यास्तव आपल्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित व शासकीय शाळेतील सर्व इयत्ता ६ते ८ चीच्या सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत अवगत करून मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे सदर उपक्रमा- संदर्भात काही शंका असल्यास जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावर प्रसिद्धी देण्यात यावी.


(मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांच्या मान्य टीपणीनुसार)


(डॉ . कमलादेवी आवटे)

उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद महाराष्ट्र, पुणे


प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

• मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, पुणे


वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.