दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी शिक्षण आयुक्तालयातून निर्गमित पत्रकानुसार शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच शिक्षण संचालक प्राथमिक यांना सन २०२४-२०२५ च्या प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा संच मान्यता डिसेंबर २०२४ पूर्वी जनरेट करुन शाळांना संच मान्यता मिळणेबाबत पुढील प्रमाणे सूचना करण्यात आली आहे.
विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार सन २०२४-२५ ची संच मान्यता डिसेंबर २०२४ पूर्वी करण्याबाबत यथानियम कार्यवाही करुन संबंधितांना कळविण्यात यावे.
(रजनी रावडे)
प्र. शिक्षण उपसंचालक (प्रशासन) तथा
प्रशासन अधिकारी (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय, पुणे-१
शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी दिनांक 11 October 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना संच मान्यता बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
उपरोक्त विषयाबाबत शालेय शिक्षण विभागाचा संदर्भ क्र.2, दि. 15.03.2024 च्या शासन निर्णयान्वये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम, 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयानुसार सन 2024-25 पासूनच्या संच मान्यता सुधारित निकषानुसार ऑनलाईन करण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय संदर्भ क्र. 1, दि.28.08.2015 मधील निकषानुसार सन 2014-15 पासून ऑनलाईन संच मान्यता शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सन 2014-15 च्या संच मान्यतेत गत शैक्षणिक वर्ष 2013-14 मध्ये शिक्षणाधिकारी यांचेमार्फत निर्गमित करण्यात आलेल्या ऑफलाईन संच मान्यतेमधील मंजूर पदे नमूद करण्यात आलेली आहे.
सन 2014-15 ते सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्येमुळे कमी झालेली पदे विद्यार्थी संख्या असल्यास सन 2017-18 मध्ये मंजूर करणेसाठी शासनास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यास अनुसरुन शासन पत्र संदर्भ क्र.3, दि.25.06.2020 अन्वये विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पूर्वीचीच मंजूर पदे व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे कमी झालेली पदे विद्यार्थी संख्येनुसार असल्यास 2013-14 मधील मंजूर पदांच्या मर्यादेत सन 2019-20 मध्ये मंजूर करण्याऐवजी सन 2018-19 च्या स्थितीच्या अनुषंगाने मंजूर करण्यास मान्यता दिलेली आहे.
शासन पत्र संदर्भ क्र.4, दि. 17.07.2023 नुसार सन 2014-15 ते सन 2021-22 या कालावधीत विविध कारणास्तव संच मान्यता प्रलंबित असलेल्या शाळांच्या सन 2022-23 च्या संच मान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन मागील लगतच्या झालेल्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पायाभूत पदांच्या मर्यादेत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे,
उपरोक्त नमूद शासन पत्र दि.25.06.2020 व 17.07.2023 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाईन संच मान्यता दुरुस्ती करतांना काही शाळांना सन 2016-17 च्या संच मान्यतेमध्ये समायोजनाने दिलेल्या शिक्षकांची पदे दर्शविण्यात आली असून सदर शाळांना सन 2014-15 च्या ऑनलाईन संच मान्यतेमधील शै. वर्ष 2013-14 मधील नमूद मंजूर पदांपेक्षा जादा पदे अनुज्ञेय झाली असल्याचे दिसून येते.
शासन निर्णय संदर्भ क्र.5, दि.19.09.2024 अन्वये मुद्दा क्र. 7 सर्व साधारण शर्तीनुसार शासन निर्णय दि.15.03.2024 अन्वये संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे पायाभूत पदांच्या मार्यादेत मंजूर करण्यात येतील. पायाभूत पदांपेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची मंजूरी आवश्यक असल्याबाबत निर्देश दिलेले आहे.
सन 2014-15 च्या ऑनलाईन संच मान्यतेमधील शै. वर्ष 2013-14 मधील नमूद मंजूर पदांच्या मर्यादेपेक्षा सन 2016-17 व त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी जादा पदे मंजूर झाली असल्याची शक्यता आहे.
सदर बाब विचारात घेता, शासन निर्णय दि. 15.03.2024 च्या सुधारित संच मान्यता निकषानुसार सन 2024-25 च्या संच मान्यतांबाबतची कार्यवाही करण्यापूर्वी सन 2014-15 च्या ऑनलाईन संच मान्यतेमधील शै. वर्ष 2013-14 मधील नमूद मंजूर पदांच्या मर्यादेपेक्षा सन 2016-17 व त्यानंतरच्या संच मान्यतेमधील मूळ पायाभूत पदांपेक्षा जादा पदे मंजूर झाली असल्यास अशा शाळांच्या संच मान्यता निर्गमित न करता, तसेच पदभरती व तदनुषंगिक कोणतीही कार्यवाही न करता त्याबाबतची माहीती संचालनालयास तात्काळ सादर करण्यात यावी. तसेच पायाभूत पदापेक्षा जादा वाढलेल्या पदांना कोणत्याही प्रकारचे भरती व तदनुषंगिक लाभ दिले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. त्याबाबतची वस्तुनिष्ठ अहवाल/माहिती संचालनालयास तात्काळ सादर करण्यात यावी.
संपत सूर्यवंशी ११/१०/२४
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना सन 2023-24 शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :- शासन पत्र क्रमांक न्यायाप्र/2023/प्र.क्र.30/टिएनटी-2, दि. 28.06.2024
उपरोक्त विषयाबाबत संदर्भिय शासन पत्र दि. 28.06.2024 अन्वये प्राप्त निर्देशानुसार दि.30.09.2023 रोजी नॉद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेवून दि.28.01.2019 च्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे अनुज्ञेय करुन सन 2023-24 च्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सदर संच मान्यता दि. 28.01.2019 च्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादित व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांची पडताळणी जादा पदे मंजूर होत असलेल्या करुन निर्गमित कराव्यात. शासन निर्णय दि.२८.०१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार शिक्षकेतर पदांची संच मान्यता दि.३०.०९.२०२३ रोजी नॉदलेली व संच मान्यता निर्गमित केल्याच्या दिनांकाअखेर आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करतांना अनुज्ञेय होणारी पदे मूळ पायाभूत पदांपेक्षा अधिक होत असेल तर अशा पदांच्या मंजूरीची कार्यवाही शासनाच्या पूर्व परवानगीने करावी. शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२, दि.०७.०३.२०१९ च्या प्रपत्र व मधील कार्यपध्दती अटी व शर्तीनुसार रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी. समायोजन पूर्ण झाल्याशिवाय अशी मंजूर व अनुज्ञेय पदे भरता येणार नाहीत.
सन २०२३-२४ च्या शिक्षकेतर संच मान्यता दि. ३०.०९.२०२३ रोजीच्या पटावरील अनुदानित व अर्शतः अनुदानित आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आली असून सदरची अनुज्ञेय पदे पूर्वलक्षी प्रभावाने देय ठरणार नाही. याची नोंद घ्यावी.
(संपत सूर्यवंशी)
शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांनी संयुक्तरीत्या दिनांक 17 मे 2019 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना सन २०२३-२०२४ ची संचमान्यता व शाळा प्रणाली (स्कूल पोर्टल) मध्ये कार्यवाही करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सन २०२३-२०२४ ची ड्राफ्ट स्वरुपात संचमान्यता आपल्या लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. सदर उपलब्ध करुन दिलेल्या संचमान्यतेची तपासणी करुन, ज्या संचमान्यता दुरुस्ती करावयाच्या आहेत त्याच्या नोंदी करुन ठेवण्याबाबत आपणास सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार आपल्यास्तरावर सदरची कार्यवाही पूर्ण झालेली असेल. सन २०२३-२०२४ च्या ड्राफ्ट संचमान्यता सरल प्रणालीतून सद्यःस्थिती रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे Change Management, Shifting of Post, Medium Change, Shifting of Student, Working Post, Change Category. Add Post यांच्या व इतर दुरुस्ती करण्याची सुविधा आपल्या लॉगिनवर उपलब्ध झालेली आहे.
तरी ज्या शाळेचे विनाअनुदानित, अंशःता अनुदानित, अनुदानित Management मध्ये बदल करावयाचे आहे, Medium बदल करावयाचे आहेत, Class Category बदल करणे, शिक्षकांची मान्य पदे वेगवेगळया टप्पा अनुदानस्तरा मध्ये Shifting करावयाची आहेत, तसेच चुकीच्या माध्यमामध्ये विद्याथी भरले असल्यास सदर विद्यार्थ्यांना योग्य माध्यमा मध्ये शिफ्ट करणे, कनिष्ठ महाविद्यालय Add Post करणे या व इतर सुधारणा आपल्यास्तरावर दिनांक १८.०५.२०२४ ते २८.०५.२०२४ या कालावधी मध्ये पूर्ण करुन घ्याव्यात म्हणजे योग्य व अंतिम संचमान्यता देणे सोईचे होईल.
शिक्षणाधिकारी यांच्या स्कूल/शाळा प्रणालीत सुपर लॉगिन मध्ये Saral School Data Verification हा टेब उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर टैब मध्ये आपल्या अंतर्गत सर्व शाळांची दिलेल्या मुद्याची तपासणी करुन योग्य माहिती असलेल्या शाळांना अंतिम मान्यता द्यायची आहे व ज्या शाळांची माहिती चुकीची/अयोग्य आहे त्या शाळाबाचत जी माहिती सुधारणा करावयाची आहे ती आपल्या लॉगिन मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधेचा उपयोग्य करुन माहिती सुधारित करुन घेण्यात यावी व त्यानंतर अशा शाळांना अंतिम मान्याता द्यावी.
सरल प्रणाली मध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनवर त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या शाळांची यादी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यांचे अवलोकन केले असता इतर विभागाच्या (उदा. समाज कल्याण, अंपग कल्याण, आश्रम शाळा व इतर) शाळा दिसून येत आहेत. तसेच आपल्या विभागाच्या मान्यताप्राप्त शाळा इतर विभागाकडे असल्याबाबत वेगवेगळ्या जिल्हयातून पत्र प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शाळेच्या सुपर लॉगिन मध्ये Transfer of School from or To another Department हा टॅब उपलब्ध करुन दिला असून त्यामध्ये आपल्या अंतर्गत इतर विभागाच्या शाळा असतील अथवा आपल्या विभागाच्या शाळा इतर विभागाकडे असतील तर या शाळांची माहिती मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सुविधेचा उपयोग्य करुन आवश्यकती कार्यवाही उक्त कालावधी मध्ये पूर्ण करुन घेण्यात यावी.
उपरोक्त कार्यवाही दिलेल्या कालावधी मध्ये तातडीने पूर्ण करुन घेण्यात यावी. अन्यथा आपणावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.
(संपत सूर्यवंशी) शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments