मुदतवाढ! राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन SCERT च्या अधिकृत सूचना लिंक वेळापत्रक या कालावधीत लिंक वर अपलोड करावे लागणार नवोपक्रम!

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी नवोपक्रम सादर करणे करिता मुदतवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

संदर्भ : १) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. जा२०२/नवोपक्रमस्पर्धा/संशोधन/राशैसंप्रपम.क्र.४/२५-०४६७५ दि.१९/०९/२०२४

२) मा. संचालक प्रस्तुत कार्यालय यांची मान्य टिपणी दि.१४/११/२०२४

राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार यावर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे पाच गटात आयोजन करण्यात आलेले आहे. प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ साठी स्पर्धकांना नावनोंदणी करावयाचा कालावधी दि.०५/११/२०२४ ते दि.२२/११/२०२४ देण्यात आलेला होता. तथापि सर्वच गटातील स्पर्धकांची नावनोंदणी अत्यल्प प्रमाणात झाली असल्याने शिक्षकांना व पर्यवेक्षकीय अधिकारी यांना नवोपक्रम स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी दि.०५/१२/२०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे.

आपल्या जिल्ह्यातील जास्तीत स्पर्धक उक्त नवोपक्रम स्पर्धेमध्ये सहभागी होतील यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.


(अनुराधा ओक) 

सहसंचालक 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे





 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५

सन २०२४-२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेकरिता स्पर्धकांनी शाळा तसेच यंत्रणेतील समस्या / आव्हाने यांवर आधारित नवोपक्रम,सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गटासाठी उपयोगात आणलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शिक्षक, विद्यार्थी व पालक केंद्रित नवोपक्रम तसेच शाळेच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा वाढीसाठी नवोपक्रम हाती घेण्यात यावे, अशा प्रकारचे नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर करण्यात यावेत. 

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे. 

१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका 

२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक

४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती

५. अध्यापकाचार्य, पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व  

अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

आपले नवोपक्रम नोंदवण्यासाठी लिंक देण्यात येत आहे. 

नवोपक्रम नोंदणी लिंक:   

https://forms.gle/X4eqdwFMz9JFotre7

दिलेल्या लिंकवर आपले नवोपक्रम दि.०५/११/२०२४ ते दि.२२/११/२०२४ या कालावधीत सादर करण्यात यावेत.      

                                                 

(राहूल रेखावार भा.प्र.से.)

 संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत SCERT च्या अधिकृत सूचना वेळापत्रक पुढील प्रमाणे.



राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक) 

४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात उपरोक्त गट क्र. १ ते ३ साठी जिल्हा स्तरावर व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats app, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, डाएट व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा, आपल्या स्तरावरून स्पर्धेबाबत आणि सोबत दिलेले माहितीपत्रक अवलोकन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी अधिनस्त कार्यालयातील सर्व गटातील स्पर्धकांना याबाबत अवगत करावे.

प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व) यांनी आपल्या कार्यालयातील एका सक्षम अधिकाऱ्याकडे नोडल अधिकारी म्हणून या स्पर्धेची जबाबदारी देण्यात यावी, तसेच सदर नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक यासह नवोपक्रम

स्पर्धेची माहिती पोहचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास researchdept@man.ac.in या ई-मेल पत्त्यावर कळविण्यात यावा. प्रस्तुत स्पर्धा ही सन २०२४-२५ साठी मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी आयोजित करण्यात येत आहे. इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करण्याविषयी संबंधितांना अवगत करण्यात यावे.

त्यानुसार आपल्या अधिनस्त उपरोक्त नमूद पाच गटात समाविष्ट अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांसह सर्व स्पर्धक नवोपक्रमशील घटकांना सोबतचे माहिती पत्रक निदर्शनास आणून द्यावे. संबंधित स्पर्धकांनी माहिती पत्रकाचे अवलोकन करावे. आपले नवोपक्रम नोंदवण्यासाठी लिंक देण्यात येईल. दिलेल्या लिंकवर नवोपक्रम सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे, दिलेल्या मुदतीत संबंधितांनी आपले नवोपक्रम सादर करण्याबाबत आपले स्तरावरून योग्य ती दक्षता घेण्यात यावी,

सोबत : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ संभाव्य वेळापत्रक आणि माहिती पत्रक

 

(राहूल रेखावार, भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.



संशोधन विभाग

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५

माहितीपत्रक

राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. याच बरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :

१. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांना प्रोत्साहन देणे.

२. शिक्षक व अधिका-यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.

१. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षक व अधिकारी यांना उत्तेजन देणे.

४. शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे. ५. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे.

नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.

नवोपक्रम अहवाल लेखन मुमुद्द

१) नवोपक्रमाचे शीर्षक उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.

२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व उपक्रम निवडण्याचे कारण, गरज, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. तपशील.

३) नवोपक्रमाची उद्दिष्टे हा उपक्रम मी का करतो आहे, उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा, कोणत्या स्वरुपात,

कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.

४) नवोपक्रमाचे नियोजन -

१) उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण

२) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा

३) आवश्यक साधनांचा विचार

४) करावयाच्या कृतींचा क्रम

५) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण

७) उपक्रमासाठी इतरांची मदत

६) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)

7) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे

५) नवोक्रमाची कार्यपद्धती -


1. पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंद

।।. कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन ।।।. उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

IV. कार्यवाही करताना आलेल्या अडचणी

v. माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)

) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) ६

या उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती स्पष्ट करावी.

७) समारोप - आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला, हे स्पष्ट करावे.

८) संदर्भसूची व परिशिष्टे नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.

९) नवोपक्रम अहवाल लेखनाबाबत मार्गदर्शनासाठी https://youtu.be/7 BjMmcx1Hc या लिंकवर जाऊन व्हिडीओ पाहावा. (लिंक वरील माहिती फक्त अहवाल लेखन मार्गदर्शनार्थ देण्यात आली आहे.) स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी

१. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६ वी ते ८वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील,

२. राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती/ सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.

३. डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, जेष्ठ विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.

अधिव्याख्याता) या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. ४. स्पर्धक सध्या SCERT/ प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) / DIET मध्ये विषय सहाय्यक / DIET अंतर्गत ५. सन २०२३ २४-पासून मराठी माध्यमासह इतर शिक्षक व अधिकारी यांचेसाठी देखील सदर स्पर्धा सुरु करण्यात येत आहे. इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी, किंवा इंग्रजी भाषेमध्ये च सादर करावा,


• स्पर्धेचे नियम

नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :

१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.

२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)

३. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा. याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत खालील नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.

५. नवोपक्रम लेखन मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.

६. नवोपक्रम टाईप केलेला असावा. टाईपिंग साठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू १.५ इंच व उजवी बाजू, वरील बाजू, तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी १ इंच मार्जिन/समास असावा.

७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

८. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२३-२४ किंवा २०२४-२५ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.

९. नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ६ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.

१०. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये १०० शब्द मर्यादेत नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.

११. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. नवोपक्रम फाईल PDF व MS WORD स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.

१२. स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.

१३. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ साठी स्पर्धकांनी आपले नवोपक्रम दिलेल्या लिंकवर अपलोड करावेत.

१४. जिल्हास्तर, विभाग स्तरावर प्रथम ७ व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे सादरीकरण करणे बंधनकारक असेल.

१५. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गुणानुक्रम पारितोषिके व उत्तेजनार्थ पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधनकारक राहील.


नवोपक्रम अहवालाचे मूल्यांकन:

नवोपक्रम स्पर्धेचे मूल्यांकन प्रत्येक स्तरावर दोन गेलरीमध्ये केले जाणार आहे. जिल्हा व विभाग रजगवर द्वितीय फेरी ही पहिल्या फेरीत गुणानुक्रमे पहिल्या १ ते ७ क्रमांकासाठी तर राज्यस्तरावर पहिल्या फेरीतील गुणानुक्रमे पहिल्या १ ते १० क्रमांकासाठी राबविण्यात येईल.

प्रादेशिक विद्या प्राधिकरण

अहवाल सादरीकर

नवोपक्रम सादरीकरण

राज्य

आहवाल परीक्षण

नवोपक्रम सादरीकरण

जिल्हास्तर व प्रादेशिक विद्या प्राधिकरण स्तरावर प्रथम फेरीत नवोपक्रम अहवालांचे मूल्यांकन करून प्रथम १ ते ७ क्रमांकावर असलेल्या नवोपक्रमांचे सादरीकरण कार्यालयात करून द्वितीय फेरीत मूल्यांकन करण्यात येईल. द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारावरच जिल्हा व विभाग प्रथम पाथ क्रमांक निर्धारित करण्यात येऊन तेब पुढे राज्यस्तरावर पाठविण्यात येतील.

(टीप : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही गटाचे मूल्यमापन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल.)

नवोपक्रम अहवालाचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारावर करण्यात येईल.l

स्पर्धेचा निकाल सर्वस्वी परीक्षकांवर अवलंबून राहील.


निकष

प्रथम फेरी गुण द्वितीय फेरी गुण विचारात घ्यावयाचे गुण

नवोपक्रम उद्दिष्टे, गरज व महत्व

२५

उपक्रमातील नाविन्यता

२५

नियोजन व प्रत्यक्ष कार्यवाही यशस्विता व उपयुक्तता

(किती मुलांना/शिक्षकांना उपयुक्त)

२५

अहवाल लेखन, संदर्भसूची व परिशिष्टे

२५

एकूण गुण

१००

राज्यस्तरावर वरीलप्रमाणेच नवोपक्रम अहवालावरून प्रथम फेरीतील गुणांच्या आधारे प्रत्येक गटातील १० उत्कृष्ट नवोपक्रम काढण्यात येतील. त्या स्पर्धकांना नवोपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी बोलविण्यात येईल, द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारे पाच गुणानुक्रम व पुढील पाच उत्तेजनार्थ क्रमांक निश्चित करण्यात येतील.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही :

पहिला टप्पा :

अ) जिल्हास्तरावरील पुरस्कार 

पूर्व प्राथमिक गट, प्राथमिक गट, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५ % पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जातील. त्यामुळे केवळ उत्कृष्ट नवोपक्रम राज्यस्तरावर येण्यासाठी उपयोग होईल. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोपिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. आ) विभागस्तरावरील पुरस्कार -

विषय सहायक व विषय साधन व्यक्ती तसेच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी यांचे नवोपक्रम प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या लिंकवर जातील व त्यामधून प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जातील. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. (टीप : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही गटाचे मूल्यांकन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल)


दूसरा टप्पा :

राज्यस्तरावरील पुरस्कार -

नवोपक्रम अहवाल लेखन व नवोपक्रम सादरीकरण या आधारित पुढील पाच गटातील पारितोषिकांचे वितरण केले जाईल.

सादरीकरण प्रमाणपत्र

पूर्व प्राथमिक गट

प्रथम ५

पुढील २

पुढील ३

प्राथमिक गट

प्रथम ५

पुढील २

पुढील ३

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट

प्रथम ५

पुढील २

पुढील ३

विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती गट अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट

प्रथम ५ प्रथम ५

पुढील २ पुढील २

पुढील ३ पुढील ३

नवोपक्रम बँक :

राज्य स्तरावर पुरस्कार प्राप्त सर्व नवोपक्रमांचा तसेच जिल्हा व विभाग स्तरावरील प्रत्येक गटातील गुणानुक्रमे पहिल्या पाच नवोपक्रमांचा समावेश राज्याच्या नवोपक्रम बैंक (Innovation Bank) मध्ये करण्यात येईल. हे नवोपक्रम SCERT, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या वेबसाईट वर Innovation Bank मध्ये प्रसिध्द करण्यात येतील.



(राहूल रेखावार, भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.