NMMS Examination Dec 2024 Final Answerkey Download - एन एम एम एस परीक्षा डिसेंबर 2024 अंतिम उत्तर सूची उपलब्ध अधिकृत सूचना व लिंक.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४

प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूची

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://2025.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर परीक्षेच्या MAT व SAT विषयाच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन दि. ०८/०१/२०२५ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक ०१/०१/२०२५ रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

दिनांक :- १४/०१/२०२५

(अनुराधा ओक)

 आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ४११००४





NMMS Exam 2024 Answer Key महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रोत्साहन परीक्षा (NMMS) ची उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेची उत्तरतालिका पाहण्यासाठी व त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावेः

उत्तरतालिकेचा प्रवेशः विद्यार्थ्यांना उत्तरतालिका पाहण्यासाठी

[https://www.mscepune.in] किंवा [https://2025.mscepuppss.in] या अधिकृत संकेतस्थळांवर भेट द्यावी.

2. आक्षेप नोंदवण्याची प्रक्रियाः उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिन आयडीद्वारे डॅशबोर्डमध्ये प्रवेश करावा. तेथून संबंधित उत्तरांवर आक्षेप नोंदवता येईल.

3. शुल्क भरण्याची प्रक्रियाः प्रत्येक आक्षेपासाठी विद्यार्थ्यांनी ₹50 शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे.

आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीखः उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2025 असून, त्यानंतर आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.

5. अंतिम निकाल प्रक्रियाः विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची शहानिशा करून अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी वेळेत आक्षेप नोंदवून आपली शंका स्पष्ट करावी. NMMS परीक्षा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची आहे.

आक्षेप नोंदण्यासाठी अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे आहे

https://www.mscepune.in

महत्त्वाची सूचना- आक्षेप नोंदविताना पुरावे जोडणे अनिवार्य आहे

NMMS interim Answerkey Download

Download




महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनाद्वारे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर, २०२४ बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साटी परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७४४ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३,४५७ शाळा व एकूण २,४८,३१२ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिपदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ७ डिसेंबर २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. २१.१२.२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाटर्यायलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.


(अनुराधा ओक)

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे-४.

प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी

https://mscenmms.in  या संकेतस्थळावर जाऊन शाळेचे अर्थात शाळेचे मुख्याध्यापकाची लॉगिन करू त्यानंतरच शाळेतील सर्व अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करता येतात विद्यार्थ्यांचे वैयक्तिक प्रवेश पत्र डाउनलोड करता येत नाही.


जाहीर प्रकटन

दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.



विषयः- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर २०२४ प्रसिध्दी निवेदनाबाबत. संदर्भ :- १) या कार्यालयाचे जा.क्र. मरापप/NMMS/इ.८वी/२०२४-२५/४३९६

दि. ०४.१०.२०२४ रोजीची अधिसूचना. २) या कार्यालयाचे जा.क्र. मरापप/NMMS/इ.८ वी/२०२४-२५/४३९७ दि. ०४.१०.२०२४ रोजीचे प्रसिध्दी निवेदन.

महोदय,

उपरोक्त संदर्भ क्र. (१) व (२) अन्वये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ या परीक्षेची ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढ देण्यात येत आहे.


याबाबतचे जाहीर प्रकटनाची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन या परीक्षेच्या जाहीर प्रकटनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी अशी विनंती आहे.


आपली विश्वासू,

(अनुराधा ओक) आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४.




राष्ट्रीय आर्थिहोतील घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर, २०२४ होणार असल्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


प्रसिध्दी निवेदन राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी

सन २००७- ०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

१. अर्ज करण्याची पध्दत दिनांक ०५/१०/२०२४ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

२. पात्रता :-

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

c) विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.

• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.

• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.

• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

३. विद्यार्थ्यांची निवड : विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

४. परीक्षेचे वेळापत्रक :- महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

५. परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT): ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT) ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण-३५) ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

> उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

a. सामान्य विज्ञान ३५ गुण भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.

b. समाजशास्त्र ३५ गुण : इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण c. गणित २० गुण.

६. माध्यम :- परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

७. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या: अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी 

निवड केली जाते. दिव्यांगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

८. शुल्क :- परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.

९. निकाल घोषित करणे : सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

१०. शिष्यवृत्ती दर: शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते इ. १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.

> शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वी व इ. ११ वी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.

> इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्याध्यर्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)

➤ सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचे मार्फत केले जाते.

११. अनधिकृततेबाबत इशारा -

शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.


(अनुराधा ओक) आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०४.


संपूर्ण माहिती पत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

 

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.