राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर अंतर्गत प्रशिक्षण बाबत पुढील प्रमाणे नवीन निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करणेच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी एकाच वेळी जिल्हास्तरावर ०७ दिवसीय (५० तासांचे) प्रशिक्षण दिनांक ०४/११/२०२४ ते दिनांक ११/११/२०२४ कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.
तथापि MAII-TET परीक्षा नोव्हेंबर-२०२४ चे आयोजन रविवार दिनांक १०/११/२०२४ रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेत काही नवनियुक्त प्रशिक्षणार्थी शिक्षक परीक्षा देणार आहेत. राज्यस्तरावरून प्रशिक्षण कालावधीच्या पूर्व नियोजनामध्ये दिनांक १०/११/२०२४ रोजी रविवार असल्यामुळे सुट्टी गृहीत धरण्यात आलेली आहे. नवनियुक्त प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी TET परीक्षेकरता आपले मूळ गाव/जिल्ह्याची निवड केली असल्यामुळे परीक्षेच्या आधीचा दिवस दिनांक ०९/११/२०२४ व परीक्षेनंतरचा दुसरा दिवस दिनांक ११/११/२०२४ या दोन दिवशी प्रवासाकरिता काही नवनियुक्त प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी सुट्टी देण्याची विनंती केली आहे.
उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने TET परीक्षेसाठी ज्या नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांनी सुट्टीची मागणी केली त्यांना परीक्षेच्या आधीच्या दिवशी दिनांक ०९/११/२०२४ व परीक्षे नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिनांक ११/११/२०२४ रोजी सुट्टी द्यावी. अशा नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचे दोन दिवसांच्या कालावधीत होऊ न शकणारे प्रशिक्षण, नियोजित प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर लगतच्या सलग दोन दिवसात पूर्ण करून घ्यावे. तसेच उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल याची दक्षता घेण्यात यावी. (माननीय संचालक महोदय यांच्या मान्यतेने।
(डॉ. माधुरी सावरकर)
उपसंचालक,
सेवापूर्व शिक्षण विभाग,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र कार्यालयातून दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित आदेशानुसार प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांना नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम (Induction Program) अंतर्गत प्रशिक्षणाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत
संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर Download क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments